ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुश्का शर्मा, दीपिका. त्रासदायक बायका.

रणबीर कपूर हृतिक रोशन अभिषेक बच्चन निष्प्रभ माणसे.
नताशा पूनावाला. क्वीनि सिन्ग.

सगळेच हो! its a human nature. सेलेब्रिटी झालं की यश डोक्यात जायला लागतं . असा एकही नाही की ज्याचे पाय जमिनीवर आहेत.

महागुरुला विसरलात काय रे? आमची मुंबय आमची मुंबय माझी मुंबय माझी मुंबय चांगली मुंबय चांगली मुंबय सबकी मुंबय सबकी मुंबय .

मला झांवी (असंच लिहायचं असतं इंग्लिश मध्ये) च्या कपड्यांची, विमानतळा वरून येण्याची वर्णने वाचून जाम वैताग येतो.

वाचु नये मग. Light 1 Happy
एकाला ओव्हररेटेट वाटेल ते दुसर्‍यासाठी फेव्हरेट असतात.
त्यांच्या हमुपा सगळ्या स्टोर्‍या फॅन्सना आवडतात

त्यापेक्षा मला रिडिफ चे spotted सेक्शन वाचायला आवडते.प्रचंड करमणूक असते.झांवी/श्रद्धा वगैरे कोण्या परीबरोबर एखाद्या धिप्पाड कमीकिंवाशून्यकेशीय माणसाने फोटो काढलेला असतो आणि पब्लिक मुद्दाम 'निळा शर्ट घातलेली टक्कल वाली पोट सुटलेली श्रद्धा आहे का, मी ओळखत नाही' वगैरे कमेंट टाकत असतात ☺️☺️☺️

अरे रे, ती होय, समजलं Proud काय काय येऊन गेलं मनात :फेस्पामः
मला पण जाम इरीटेट होते ती बया

ओतिलाकैबोलायचंनैसांगूनठेवतेहां.
आहे का त्या काळात तसे कुरळे तरीही मऊ केस, नाच, ते सुंदर प्रफुल्ल हास्य असलेली दुसरी?आपले केस माधुरी सारखे असावे, म्हणजे कपाळाच्या सुरुवातीपासून सूर्य न बनता सोयीस्कर 6 इंच सरळ रेशमी आणि त्याच्या पुढे लेंथ ला मस्त गोल गोल कुरळे.(मी त्या कुरळ्या वळणांपायी एक रोलरकोंब गॅस वर जाळला आहे.ते परत कधीतरी.)
आताची प्रतिमा माफ करून टाका.

उकडलेल्या बटाट्यासारखा दिसणारा तो मराठी हिरो
जस्टिन बिबर
स्टार वॉर्स सिरीज
गारंबीचा बापू नंतरच्या पेंडश्यांच्या बहुतेक कादंबर्‍या
एक मराठी नेता (नाव लिहायची सोय नाही Happy )

सोफी चौधरी का कोण ती, आणि सोनम कपूर आणि ह्या सर्व गरजेपेक्षा जास्त प्रसिद्ध लोकान्ची लग्ने !

सोफी चौधरी ला तर तिच्या ड्रेसिंग सेन्स वरून फॅशन पोलीस वाले जाम फटके टाकतात.
झांवी ने किंवा आलिया ने गोणपाटाला 3 भोके पाडून तो अंगात अडकवला तरी तिला स्वर्गतुल्य सौंदर्य मानतात.

Pages