३ मुलं जी वस्तीगृहात रहात असतात सकाळी उठून तयारीला लागतात. एक होता जाडा जो जरा जास्तच खादाड असतो. दुसरा होता लुकडा जो खूप खट्याळ असतो. आणि शेवटचा होता साधा भोळा जो त्या दोघांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा. सकाळी सकाळी त्यांची पार शर्यत लागत असे की पहीले आंघोळ कोण करणार. कसे बसे प्रत्येकजण आपापली आंघोळ आटपत तयारी करून कामाला जातात. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी थकून भागुन सगळे घरी परततात.
नागराजचा सिनेमा रिलीज झाला आणि मायबोलीवरचे सगळे सैराट झालेत. नागराजच्या सिनेमाला एवढी प्रसिद्धी मिळाली /तो अगदी धो धो चालला त्यात नागराजच्या दिग्दर्शनाच जितकं कौशल्य आहे ते आणि तितकंच त्या सिनेमाची जी काही प्रसिद्धी झाली ( झी मराठी ने केलेली) त्याच बरोबर अजय- अतुलने जे काही सैराट संगीत दिलंय /जी काही सैराट गाणी दिलेली आहेत त्याचा पण जबरदस्त वाटा आहे. गाण्याचे बोल पण अजय -अतुल यांचेच आहेत आणि सिनेमॅटोग्राफर रेडडी यांना कसं विसरून चालेल ?
Suits (legal drama -TV series) https://en.wikipedia.org/wiki/Suits_(TV_series) ही टीव्ही सिरिज २०११ पासून केबल नेटवर्क युएसे वरून प्रसारित केली जात आहे. कुणी ती पहात असेल तर त्या संदर्भात चर्चा करण्यासाठीचा हा धागा...
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!
कधीपासून मनातल लिहायच होत पण काय करणार कागदाचा वापर कमीत कमी करतो ना मी ...अगदी ऑफिसमध्ये पण कागद वापरत नाही ....अहो अस काय करताय जंगल संपत आली आहेत,झाडांच्या कित्तेक प्रजाती नष्ट होत आहेत (म्हंटल हिथे लिहूया विजेचा अपव्यय झाला तरी काही हरकत नाही तो झाला तरी चालतो बर मला)..
जुन्या तुळशी वृंदावनात ठेवलेली आशेची नवी वात . . . वात विझवायला कोसळणारा पाऊस . . सोसाट्याचा वारा . . निसर्गापुढे वाकलेली तुळस . . विजांचा खेळ पहात झुलणारा एक झोका . . आशेतून निराशेत अन निराशेतून आशेत झोक्यासह हेलकावणारे मन . . दिव्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व हुडकणारे दोन डोळे . . . पावसासोबतच बरसणारे . . वाऱ्यासह भिरभिरणारे . . विजांसह कडाडणारे . . अस्तित्वाच्या संघर्षात वातीची साथ देणारे . . अनंत भावना आपल्यात सामाऊन समाजाला प्रश्न विचारणारे . . अन सिनेमा संपल्यावरही माझी साथसोडायची 'अनुमती ' न देणारे . . . !
डोळ्यांना सुखावणारं आल्हाददायी निसर्गचित्रण, श्रवणेंद्रियांना शांत करणारं मधुर पार्श्वसंगीत, मनाची पकड घेणारी व गुंतवून टाकणारी पटकथा आणि आपल्या कसदार, विलक्षण ताकदीच्या अभिनयाने हा सारा पट जिवंत करणारे, मनावर ठसा उमटवून जाणारे अभिनेते.... 'अनुमती' चित्रपटात ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात! एक संपन्न, समृद्ध अनुभव देताना तुमच्या-आमच्या मनात ही 'अनुमती' घर करून जाते हे निश्चितच!
सगळेच गाण्यांच्या भेंड्या खेळतात. पण आपण चित्रपटांच्या नावाच्या खेळू.
जसे,
कभी ख़ुशी कभी गम---- मै हुं ना
आज ५ आक्टोबर २०१२. एरव्ही निरुपद्रवी वाटणारी ही तारीख, पण माझ्या दृष्टीने [तसेच जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात रसिकांच्या दृष्टीनेही] या तारखेला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. बरोबर ५० वर्षापूर्वी... म्हणजेच ५ आक्टोबर १९६२ रोजी एका 'पात्रा'ने इंग्लंड आणि अमेरिकेत चंदेरी पडद्यावर जन्म घेतला आणि त्याच्या जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली.
घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.