मनोरंजन

ढाक-भैरी ते राजमाची ... !

Submitted by सेनापती... on 16 January, 2011 - 20:10

२००५...जुलै महिना... कर्नाळा अभयारण्याजवळ माझा आणि शामिकाचा बाईकवरून पडून अपघात झालेला. जोरदार पडूनही तिचे फक्त मुक्यामारावर निभावले होते. एस.टी. वाल्याच्या चुकीचे बक्षीस म्हणून मला उजव्या हाताला एक प्लास्टर बक्षीस... Happy महिनाभर विश्रांती घेतल्यावर ऑगस्टमधला हा ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. मोजून २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते.

नटरंग

Submitted by आशूडी on 6 January, 2010 - 23:17

काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.

विषय: 

Submitted by शैलजा on 22 March, 2009 - 03:54

एक झोका, चुके काळजाचा ठोका ll धृ. ll
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका ll १ ll
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका ll २ ll
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका ll 3 ll

गीतः सुधीर मोघे

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन