भटकंती

मुंबई टु भिमाशंकर व्हाया जुन्नर

Submitted by जिप्सी on 15 August, 2010 - 23:56

"झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा"
असेच काही वर्णन करता येईल आमच्या तीन दिवसाच्या भिमाशंकर-जुन्नर्-लेण्याद्री-शिवनेरी-माळशेज घाटाच्या भटकंतीचे. आठवड्याभराच्या कामाचा कंटाळा आणि त्याच त्याच नेहमीच्या रूटिनने आलेला मनाचा दुबळेपणा घालवण्यासाठी आम्ही चार मित्र, मी, प्रसाद कुलकर्णी (माबो आयडी प्रकुल२४), राहुल क्षीरसागर आणि अभिषेक पाताडे असे निसर्गाच्या सान्निध्यात "गटारी" साजरी करण्यासाठी निघालो. निसर्गाची बेफाम नशा सोबतीला असल्यावर "फेसाळणारे प्याले" हवे कुणाला?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साद सह्याद्रीची

Submitted by मेघनाद नाटेकर on 23 May, 2010 - 08:26

ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली.

विषय: 

धाकोबा आणि दुर्ग

Submitted by जीएस on 30 December, 2009 - 06:51

१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.

मडिकेरी-कुर्ग

Submitted by डॅफोडिल्स on 13 October, 2009 - 05:59

एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.

विषय: 

लाँग ड्राईव्ह.. !

Submitted by बस्के on 31 July, 2009 - 19:24

काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्‍यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं..

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती