एक उनाड दिवस - विहिगावच्या धबधब्यात

Submitted by जिप्सी on 1 September, 2010 - 05:56

एक दिवस आनंदात, विहिगावच्या धबधब्यात Happy

<फ्लॅशबॅक मोड ऑन>
जुलै महिन्याच्या शेवटी यो रॉक्सचा ईमेल आला, कि ट्रेकमेट्सतर्फे विहिगाव येथे १४ ऑगस्टला वॉटरफॉल रॅपलिंग आयोजित केले आहे. पहिल्यांदाच रॅपलिंग करणार्‍यांकरीता सोप्पे आहे. उंची जवळपास १२० फूट. मेलमध्ये फोटोची लिंकही होती. फोटो पाहताच पहिले उद्गार आले, वॉव्व!!!!! दोन दिवसानंतर यो चा फोन आला, "तु रॅपलिंगला येतोय आणि मी तुझे नाव नोंदवले आहे. :). जवळपास अर्ध्यातासाने नीलवेदचा फोन, "अरे योगेश, मी, मोदक आणि मोदकचे दोन मित्र असे चारजण रायगडला जातोय, तेंव्हा तु पण चल". इकडे यो ने नाव नोंदवले आणि तिकडे नील रायगडला येण्यासाठी आग्रह करत होता. नीलला समजावले कि यो ने आधीच नाव नोंदवून ठेवले आहे. तेंव्हा त्याने पुढच्यावेळेस मात्र नक्की रायगडाला यायचे या बोलीवर रॅपलिंगसाठी परवानगी दिली :). माझ्याबरोबर माझ्याच ऑफिसमधले अजुन तीन जण येणार हे यो ला सांगुन माझे येणे कन्फर्म झाले. यो ने पाठवलेले फोटो पाहुन कधी एकदा १४ तारीख येते असे झाले होते. शुक्रवारी ऑफिसमधुन लवकर निघायचा प्लान होता. रॅपलिंगला जायचे म्हणुन कॅमेरा फुल्ल चार्ज करून ठेवला आणि पावसाचे दिवस म्हणुन त्याला रेनकोटही घातला होता :).
पण .......
संध्याकाळी ६:३०च्या सुमारास क्लाईंटचा मेल आला, सोबत एक अर्जंट जॉब पाठवला, ज्याची डेडलाईन होती सोमवार १६ ऑगस्ट, जे एका दिवसात शक्य नव्हते. झाले!!!! सोमवारची डेडलाईन मीट करण्यासाठी शनिवारी यायचे असे सर्वानुमते ठरले. संध्याकाळी सात वाजता माझा यो रॉक्सला फोन गेला, "उद्या कामावर बोलवलेय सो येत नाही आम्ही.. " तेंव्हा मी नि माझे तीन मित्र असे चारजण कटाप..... Sad
< /फ्लॅशबॅक मोड ऑफ>

बुधवारी, २५ ऑगस्टला आमचा एक मित्र अभिषेक याचा मेल आला, "अरे माझी या विकएण्डची ट्रेनिंग कॅन्सल झाली आहे. तेंव्हा या विकांताला बाईकने कुठेतरी जायचे का?". पटापट इतर मित्रांचे रीप्लाय आले कि, आम्ही सगळे तयार आहोत. चला या विकएण्डला जाऊ कुठेतरी. माझाही काही प्लान नव्हता, त्यामुळे मीही तयार झालो.
पण जायचे कुठे???
सगळ्यांची मते विचारून झाल्यावर ५-६ स्पॉट ठरले :). जर ट्रेकिंग करायची असेल तर आजोबा डोंगर, कोराईगड, कर्नाळा, प्रबळगड किंवा पेब आणि जर धबधब्यात भिजायचे असेल तर माळशेज घाट, लोणावळा किंवा कर्जत जवळील कोंडाणे लेणी. माझ्या मनात मात्र विहिगावचा धबधबा जोरात कोसळत होतो Proud त्यामुळे मी तोच सुचवला. सोबत यो ने काढलेले १-२ फोटो देखील पाठवले. शेवटी मनात होते तेच झाले सर्वानुमते विहिगावलाच जायचे ठरले. Happy (अर्थात हे शक्य व्हायला यो ने काढलेले फोटोही कारणीभूत ठरले ;-)). मी, प्रसाद-१ कुलकर्णी , प्रसाद-२ गावडे , अभिषेक-१ पोळ , अभिषेक-२ पाताडे, विजय, प्रशांत, कुशल, किशोर असे एकुण ९ जण तयार झाले.
पण जायचे कसे?
सर्वानुमते असे ठरले कि पाऊस नाही तर बाईकनेच जायचे. पण बाईक चार आणि आम्ही ९ जण!!!! (अगदी शोलेमधल्या गब्बरसारखा डायलॉग आठवला, आदमी नौ और बाईक सिरफ चार!!!! बहोत नाइंसाफि है रे!). तेंव्हा प्रसाद-१, अभिषेक-२, विजय असे तीनजण रेल्वेने कसार्‍यापर्यंत येणार आणि पुढे टमटमने विहिगावपर्यंत असे ठरले. आदल्या दिवशी आपल्या यो रॉक्सला आणि सुन्या आंबोलकरला सगळी माहिती विचारून ठेवली. सुन्या एक दिवस विहिगावला राहिला असल्याने त्याने अगदी डिटेल माहिती दिली आणि सांगितले कि गावात "अनंता"ला भेटा. तो जेवणाची सोय करून देईल.

जाण्याच्या आदल्या रात्री ११ वाजता प्रसाद-२ चा फोन, "किशोर नाहि येत", त्यामुळे मी बाईक नाही आणत." (यावेळी मात्र प्रकर्षाने आयत्यावेळेस यो ला नाही सांगणारे आम्हीच आम्हाला आठवलो :(). झाले आता ८ जण आणि तीन बाईक्स. रात्री सगळ्यांना फोनाफोनी करून असे ठरले कि, मी, प्रसाद-२ कल्याणला रेल्वेने जाणार आणि तेथे अभिषेक-१ आणि कुशल आम्हाला बाईकने पिकअप करणार. पुढे पडघा नाक्यावर प्रशांत आम्हाला जॉईन करणार (बाकीच्या तिघांचा प्लान रेल्वेने जाण्याचा तसाच फिक्स होता). सकाळी ६ वाजता विक्रोळी स्टेशनला प्रसाद-२ आणि मी भेटण्याचे ठरले. पण कुठलीहि पिकनिक, ट्रेक, आऊटिंग "टांगारू" आणि दिलेल्या वेळेत न येणारे यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही :फिदी:, मग आमचाहि हा विकएण्ड प्लान त्यातुन कसा सुटेल? प्रसाद-२ फक्त दिड-दोन तास उशिरा आला :(. आणि आमची भटकंती दिड-दोन तास उशिरा सुरू झाली. कल्याणहुन आम्ही चौघे, कल्याण-पडघा रोडने निघालो. पुढे बाईक घेऊन खडवली नाक्यावर वाट पाहुन प्रशांत कंटाळला होता. त्याला तेथे पिकअप करून आम्ही कसार्‍याच्या दिशेने निघालो. पाऊस जरी नसला तरी वातावरण प्रसन्न होते.
बाईकने जाताना धम्माल येत होती. आमचे तीघे मित्र कसार्‍याला पोहचले होते तेंव्हा आम्ही आटगांवजवळ (म्हणजे अजुन अर्धा तास कसार्‍याला जाण्यास लागणार होता) होतो. साधारण दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही कसारा रेल्वे स्टेशनजवळ पोहचलो. बाकि तीघे आधीच तेथे पोहचले होते. तेथेच एका हॉटेलात नाश्ता उरकुन घेतला. (प्रसाद-२, विजय आणि मी, असा तिघांचा उपवास असल्याने फक्त चहाच प्यायलो ;-)).

कसार्‍याहुन सहाजण तीन बाईकवर आणि उरलेले तीघे टमटमने असे आधीच ठरले होते पण कसार्‍याला पोहोचल्यानंतर ट्रीपल सीट विहिगावला जायचा नेक विचार आमच्या मनात आला Wink (पण ३ ते ४ किमी रस्ता हा राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने नीट चौकशी करूनच जायचे ठरले). चौकशी केली असता दोघातिघांनी असे सांगितले कि, ट्रीपल सीट बाईकवर जाऊ शकता, कुणीहि विचारत नाहि. (आणि जर विचारले तर सांगा कि, एक बाईक पंक्चर झाली आहे म्हणुन ट्रीपल सीट जात आहोत Wink इति कसारा गावकरी). मग काय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा आपल्या तिर्थरुपांचा असल्याच्या आविर्भावात आम्ही २+३+३ इडियट बाईकवर स्वदेसच्या शाहरूखसारखे "ये जो देस है मेरा, स्वदेस है मेरा" म्हणत बेफाम निघालो. :-).

कसारा घाट सुरू होण्याआधी डावीकडे जव्हार फाटा (कसारा-जव्हार) आहे. त्याच रस्त्यावर पुढे साधारण १०-१२किमी अंतरावर वसले आहे "विहिगाव". या धबधब्याची पहिल्यांदा भेट झाली ते मिलिंद गुणाजी यांच्या "माझी मुलुखगिरी" या पुस्तकातुन. नंतर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात याविषयी वाचण्यात आले होते. यो ने पाठवलेल्या मेल आणि फोटोमुळे याला भेटण्याचे आकर्षण वाढले होते. कसारा ते जव्हार हा संपूर्ण प्रवासच स्वप्नवत आहे. मी स्वतः या रस्त्याने तीन्-चार वेळा जव्हारला गेलो होतो (पण त्यावेळेस विहिगाव माहित नव्हते). याच रस्त्याने टप्प्याटप्प्याने विहिगाव, शिर्पामाळ (हे एक ऐतिहासिक ठिकाण. शिवाजीमहाराज जेंव्हा सुरत लुटीसाठीसाठी चालले होते तेंव्हा ते विश्रांतीसाठी शिर्पामाळ येथे थांबले होते. तेथे एक छोटेसे स्मारक आहे.), सूर्यमाळ, देवबांध, खोडाळा, मोखाडा आणि जव्हार असे आदिवासे पाडे आणि निसर्गाने मुक्त हस्ताने लयलुट केलेली गावे एकामागोमाग एक लागतात. देवबांध येथे दोन नद्यांच्या संगमावर वसलेले सुंदरविनायक गणेशाचे एक नितांत सुंदर मंदिर खास जाऊन पाहण्यासारखे आहे. पुढे "ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर" म्हणुन प्रसिद्ध असलेले "जव्हार" विकएण्ड भटकंतीसाठी उत्तम पर्याय आहे.

साधारण अकरा-साडेअकराच्या सुमारास आम्ही विहिगावात पोहचलो. त्यातच आमचे दोन बाईकवीर सुसाट विहिगावच्या पुढे निघुन गेले आणि आम्हि तीघे गावात थांबलो. तेथे रस्त्यावरच गावची काही आदिवासे मुले "धबधबा धबधबा" असे जोरात ओरडत त्या पुढे गेलेल्या बाईकच्या मागे धावली आणि उरलेली आमच्याबरोबर आली. थोड्यावेळाने पुढे गेलेले पाचहीजण परत गावात आले. सोबतच्या मुलांनी आम्हाला "अनंताचे" घर दाखवले. तेथेच जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही दुतर्फा असणार्‍या हिरव्यागार निसर्गाच्या वाटेने, भातखाचरातुन, धबधब्याकडे निघालो. वाटेत धबधब्याचा खळखळाट सोबत करत होता. यो ने वृतांतात सांगितल्याप्रमाणे जवळपास १५ मिनिटे झाडीतुन, चिखलवाट तुडवित, १२० फुट खाली उतरल्यावर आम्हाला मुख्य धबधब्याचे दर्शन झाले आणि "प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला" अशी अवस्था झाली. त्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर काळ्या कातळाला फुटलेला तो पान्हा पाहुन सगळ्यांच्या
तोंडुन एकच उद्गार निघाले, "स्स्स्सही"!!!!!!!.

पूर्ण धबधब्याचे दर्शन होताच आम्ही चारही मित्र (जे वॉटरफॉल रॅपलिंगसाठी येणार होतो आणि आयत्यावेळी कॅन्सल झालो) एकमेकांची तोंड बघायला लागलो आणि त्या दिवशी का नाही आलो असा विचार करून पश्चाताप करू लागलो, पुढे त्याच धबधब्यात भिजुन आम्ही या पश्चातापापासुन "मुक्ती" मिळवली :फिदी:.

पटकन बॅग बाजुला ठेवून आमचे सगळे "वीर" धबधब्यात शिरले. त्यात भिजताना "स्पर्श होता तुझा विसरलो भान मी" असाच अनुभव सगळ्यांना येत होता. मी मात्र नेहमीप्रमाणे सगळ्यांचे फोटोसेशन करण्यात गुंग झालो Happy (एकदा पाण्यात शिरल्यावर फोटो काढता आले नसते ना!!). धबधब्यात जाताना शेवाळावरुन आमचे काहि मित्र मस्तपैकी घसरून आपटले (आणि अर्थातच कॅमेर्‍यात मी ते टिपले :फिदी:). फोटोसेशन आटोपल्यावर मी सुद्धा धबधब्यात शिरलो. वाट शेवाळ्याची असल्याने आरामात बसुन बसुन त्या पाण्यात शिरलो Biggrin (उगाच सांगितलंय कुणी हिरोगिरी करून दगडावर बुड आपटुन घ्यायला :)). जवळपास छातीएवढ्या त्या गार पाण्यात भिजताना, तेथुन धबधब्याच्या खाली जाताना आलेला अनुभव शब्दातीत आहे. पावसाने मात्र त्यावेळी आमच्यावर मेहरबानी केली होती, मस्तपैकी ऊन पडले होते. त्याच उन्हामुळे आम्हाला भर धबधब्याखाली सुंदर असे एक वर्तुळाकार "इंद्रधनुष्य" दिसले (चला एकतरी "मायबोलीकर" सोबत आहे असा विचार आला ;-)).
जर पावसाचा जोर असता तर कदाचित त्या धबधब्याखाली बसणे कठिण झाले असते. त्या संपूर्ण परिसरात आम्ही, निसर्ग आणि निरागस आदिवासी मुलं इतकेच काय ते होते. फक्त धबधब्याचा खळखळाट, बस्स्स्स, बाकी काही नाही.

मनसोक्त भिजल्यानंतर परत काठावर येऊन मस्तपैकी कांदाभजी पाव खाल्ला (आम्हा उपवासवाल्यांना टुकटुक करून :रागः). थोडा अल्पोपहार झाल्यानंतर पुन्हा एकदा धबधब्यात भिजायला गेलो. जवळपास दोन-अडिच तास मुख्य धबधब्यातुन वरच्या दोन धबधब्याकडे निघालो. विहिगावचा धबधबा हा तीन टप्प्यात कोसळणारा आहे. पहिला टप्प्यात एक छोटेसे धरण आहे, तेच ओसंडुन एक छोटा धबधबा, पुढे तेच पाणी जवळपास १०-१२ फुटांवरून कोसळुन दुसरा धबधबा आणि शेवटी "तोय कोसळे धबाबा" च्या आवेशात मुख्य धबधबा १२० फुटांवरून कोसळत होता. आम्ही सगळे आता दुसर्‍या धबधब्यात होतो, दिसायला जरी हा मुख्य धबधब्यापेक्षा खुपच छोटा असला तरी कोसळणार्‍या पाण्यात बसणे म्हणजे सर्वांगाला मालिश करून घेण्यासारखे होते :हाहा:. पण धम्माल येत होती :).

जवळपास अर्धा-एक तास तेथे भिजल्यानंतर परत विहिगावात निघालो. सोबतीला गावातील मुले होतीच. त्यांना पैसे दिले असता सगळ्यांनी आपले पैसे त्यांच्या "छोट्या म्होरक्या" कडे काहि न बोलता जमा केले. वाटेत फोटो काढत, मस्करी करत थोड्याच वेळात अनंताच्या घरासमोर आलो. कपडे बदलुन, फ्रेश झालो. अनंताने मस्तपैकी नाचणीची भाकर, पिठलं, पापड असा बेत घाटला होता. अंगणातच आम्ही अंगतपंगत मांडली. ती भाकरी आणि पिठलं इतकं टेम्प्टिंग दिसत होते कि पटकन त्याच्यावर उपवास सोडावा असा "मस्त विचार" आम्हा उपासकरांच्या मनात आला :फिदी:, पण सोबत आणलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमुळे तो तेथेच बारगळला. इतर मित्रांनी पिठलं भाकरीवर यथेच्छ ताव मारला. या सुंदर मेजवानीसाठी अनंताचे "अनंत" आभार मानुन विहिगावचा निरोप घेतला.


(आहे ना एकदम टेम्प्टिंग ;-))

विहिगावच्या मुख्य रस्त्याला जव्हारकडे जाताना एक स्पॉट असा आहे कि तेथुन या धबधब्याचे कुठलाही अडथळा न येता सुरुवातीपासुन शेवटपर्यंत संपूर्ण दर्शन होते. थोडावेळ तेथे रेंगाळलो, मस्तपैकी फोटोसेशन केले आणि परत २+३+३ इडियट्स निघालो.

पुढे ज्याची भिती होती तेच झाले. "मामांची गाडी" जव्हार फाट्याला उभीच होती (७-८ मामांसहित) :). मग काय, गुपचुप आम्ही दोघे मागेच उतरून चालत चाललो. कसारा घाट आता वन वे केल्यामुळे जव्हार फाट्याला एक्झिट नाही. तेंव्हा "मामांनीच" बाईकवाल्या मित्रांना सांगितले कि उलट्या बाजुने सावकाश जा :). मी आणि प्रसाद-२ मात्र "नेचर वॉक" करत असल्याच्या आविर्भावात त्यांच्यासमोरून चालत गेलो :फिदी:. पुढे मामांची गाडी दिसेनाशी झाल्यावर परत २+३+३ जायचे असा बेत होता ;-). बाईकवर बसल्यावर थोडे पुढे गेले असता मामाची गाडी आलीच कि आमच्या मागुन Sad आणि "आमच्या गाडीच्या मागे" या असे फर्मावले. झाले!! आता किती द्यायचे, किती फाईन पडणार याचे लगेच कॅलक्युलेशन आमच्यात सुरु झाले Happy अर्थात त्याला इलाज नव्हता. एकतर नॅशनल हायवे, त्यात ट्रीपल सीट आणि राँग साईटने चालवतो. त्यामुळे मनाची पूर्ण तयारी करून निघालो :). पण.........मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मागे निघालो खरं पण त्यांची गाडी खुप पुढे गेली आणि नंतर आमच्या लक्षात आले कि राँग साईड असल्याने त्यांनी सावकाशपणे आमच्या मागे या असे सांगितले होते (किती ती काळजी भाच्यांची Lol :फिदी:) आणि आम्ही मात्र "मुंवईचे मामा" भेटले असे समजुन मनातल्या मनात हिशोब करायला सुरुवात केली होती :हाहा:. रेल्वेने जाण्यार्‍या मित्रांना कसारा स्टेशनवर सोडुन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

दिवसभर नसलेला पाऊस मात्र आम्हाला निरोप द्यायला शहापुर तालुक्याच्या वेशीपर्यंत आला. तुफान पावसात बाईकवरून, हायवेवरून जातानाचा अनुभव देखील विलक्षण होता. अशा तर्‍हेने अजुन एक विकांत विहिगावच्या धबधब्याच्या रूपाने मनाच्या मेमरी कार्डमध्ये कायमचा आठवणीत राहिला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो रॉक्स, सुन्या खुप खुप धन्यवाद एका सुंदर जागेची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल.
तुमच्या सगळ्यांबरोबर आलो असतो तर अजुन धम्माल आली असती Happy

घ्या आता, माबोमुळे, लवकरच विही ला तीर्थक्षेत्राचे रूप येणार. योगेश२४, तुम्ही तर बरोबरच २ 'प्रसाद' आणि २ 'अभिषेक' घेऊनच गेला होतात. Happy

एकदा, शिर्डीला जाताना आम्ही चुकून घाटाऐवजी त्या रस्त्याला लागलो, जव्हारनंतर तो रस्ता उजवीकडे वळतो आणि पुढे घोटीच्या आसपास हायवेला मिळतो. पण तो प्रवास अप्रतिम आहे. आम्ही उन्हाळ्यात जाताना रस्ता चुकलो होतो. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या करवंदाच्या जाळीतून मस्त करवंद खाल्ली होती. आणि त्या वळणा-वळणाच्या रस्त्याच्या एवढे प्रेमात पडलो की मागच्या पावसाळ्यात नाशिकला जाताना आम्ही त्याच रस्त्याने गेलो आणि आलो. पूर्ण रस्ता केवळ आपल्याकरता. हिरव्या टेकड्या-टेकड्यातून वर्-खाली जाणारा रस्ता. अप्रतिम अनुभव.

परत येताना तर मिट्ट काळोखात, भर पावसात त्या रस्त्यावरून आलोय .. आणि मग, तुम्ही सांगितले तसेच एक्झीट नसताना (चुकुन) हायवेवर बाहेर पडलो. १-२ मिनिटांतच चूक लक्षात आली पण काही उपाय नव्हता. तशाच दोन्ही कार्स एकामागे एक ठेवत सावकाश उर्वरीत हायवे उतरलो. नशिबाने मामालोक नव्हते. उजवीकडे त्यांची चौकी दिसली पण भर पावसाळी रात्री असा वेडेपणा करणारे कोणी असेल असं त्यांना वाटत नसावं....

तुम्ही तर बरोबरच २ 'प्रसाद' आणि २ 'अभिषेक' घेऊनच गेला होतात. >>>>मामी, Lol
पण, आमच्यापैकी कुणीही "तिर्थप्राशन" करणारे नव्हते Lol

जव्हारनंतर तो रस्ता उजवीकडे वळतो आणि पुढे घोटीच्या आसपास हायवेला मिळतो>>>हो तोच रस्ता कसारा घाट बायपास आहे. तेथुनच त्र्यंबकेश्वरलाहि जाता येते.

व्वा व्वा.. सुंदर सुंदर प्रचिसंगे मस्त वृत्तांतही धावुनि आला.. Happy जबरी रे..
नि ए ते धन्यवाद बिन्यवाद तुझ्याकडेच ठेव.. !! Proud

जल्ला आम्हाला मामा बनवला म्हणून खुद्द मामानेच तुम्हाला मामा बनवला :p

मस्त वृत्तांत... Happy

माबोमुळे, लवकरच विही ला तीर्थक्षेत्राचे रूप येणार. >>> मामी, दा :d

योग्या खुप छान वर्णन शब्दात उतरवले आहेस...विहिगावच्या मतिचा सुवास या इथे तुझ्या शब्दातुन जाणवतो आहे...:-)

योगेश, नेहमीप्रमाणेच प्रसन्न करणारी प्रकाशचित्रे आणि प्रवासवर्णन. तुम्ही पर्यटन करा. आम्ही आनंद मनवतो.

मी सर्वात वरचे प्रकाशचित्र माझ्या अनुदिनीवर वापरणार आहे रे. अनुमती असावी!

योगेश , फोटो आणि वर्णन मस्तच ! Happy

नशिबाने मामालोक नव्हते >>>
मामी , योगेश..., त्या हायवेवर तेवढ्यापुरती उलट्या दिशेने जायला मामा लोकांचीच परमीशन आहे..
त्यांना तुम्ही जव्हारच्या रस्त्याने आलो एवढे सांगायचे आणि गाडी जपुन चालवायची.. Happy

(योगेश, ते धन्यवाद धन्यवाद सोडून दे रे आता. बरं नाही वाटत ऐकायला.. त्यादिवशी फोनवर तुझं असच काहीतरी चाललेल होतं... ते धन्यवाद सोड नाहीतर आपल्यात वाद होतील बघ Proud )

नशिबाने मामालोक नव्हते >>>
मामी , योगेश..., त्या हायवेवर तेवढ्यापुरती उलट्या दिशेने जायला मामा लोकांचीच परमीशन आहे..
त्यांना तुम्ही जव्हारच्या रस्त्याने आलो एवढे सांगायचे आणि गाडी जपुन चालवायची..

>>>>>> असं आहे का? अरे अरे ... आम्हाला वाटलं तेवढ ते जबरी adventure नव्हतं तर.... त्यातली हवाच काढून घेतली कि तुम्ही.... पण बरयं पुढल्या वेळी न घाबरता येऊ.

रच्याकने : जव्हार मार्गे आल्यावर हायवेवर यायला दुसरा काही रस्ताच नाहीये? हर हर महादेव!!!!!

त्या हायवेवर तेवढ्यापुरती उलट्या दिशेने जायला मामा लोकांचीच परमीशन आहे..>>>>सुन्या, अरे आधी माहित असते तर आमचा तो अर्धा-एक किमीचा "नेचर वॉक" वाचला असता रे :हाहा:.

योग्या एक उनाड दिवस पिक्चर मधे मला नाही घेतलसं त्या बद्दल निषेध !

1_6.jpg

(इमेज- गुगल फोटो सौजन्याने)

योग्या... तु पाण्यात उतरला नाहीस का रे ? नेहमीसारखा Uhoh

मामाला पण पुन्हा मामा बनवलस का रे ?

तु पाण्यात उतरला नाहीस का रे ? नेहमीसारखा >>>>उतरलो नां, आधी मस्तपैकी फोटो काढुन घेतले आणि मगच उतरलो पाण्यात. एकदा पाण्यात उतरलो कि मी ओला हात कॅमेर्‍याला लावत नाही रे :). म्हणुन आधी फोटोसेशन मग पाण्यात धम्माल. वविलापण तेच केलं ना (रेनडान्स मध्ये :))

पुन्हा एकदा उत्तम वर्णन. सुरेख

त्यातच आमचे दोन बाईकवीर सुसाट विहिगावच्या पुढे निघुन गेले

aamhi pudhe gelo khare pan pudhcha rasta baghunach tithech manat vichar ala ki ya rastyane pudhe jaichay? jaichya thikana parayant pochu na ani pochlo tari parat yeu na :):):). te ST vale driver tya rastayvarun gadi kashi netat kai mahit???

Pages