भटकंती

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट

Submitted by Discoverसह्याद्री on 20 July, 2013 - 12:27

धुवांधार पावसातल्या लोभस घाटवाटा – मढे अन् उपांड्या घाट

...एके दिवशी तापलेल्या मातीवर धुळीची वावटळं उमटू लागतात, पाचोळा सैरभैर उडू लागतो, काळ्या ढगांचा काळोख दाटून येतो, विजांचं तांडव सुरू होतं, मृदगंध दरवळू लागतो, अन् वळवाच्या पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात
– टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
MadheUpandya_DiscoverSahyadri_01.jpg

भटक्यांचा सह्य मेळावा...

Submitted by सेनापती... on 28 June, 2013 - 05:23
तारीख/वेळ: 
12 July, 2013 - 15:01 to 14 July, 2013 - 14:59
ठिकाण/पत्ता: 
केळद, मढे घाट.

सह्य मेळावा संपन्न झालेला आहे.
*******************************************

नमस्कार मंडळी,

मुंबई, नाशिक आणि पुणेकर भटक्यांचा सह्य मेळावा शनिवार १३-जुलै-२०१३ रोजी मढे घाटात आयोजीत करण्यात आलेला आहे. सगळ्या भटक्यांनी शनिवारी रात्री नसरापूर - वेल्हे मार्गे केळदला जमायचे आहे. रात्रीचा मुक्काम केळदच्या शाळेत करायचा आहे.

दुसर्‍या दिवशी रविवारी १४-जुलै-२०१३ला केळद - मढे घाट - कर्णवाडी मार्गे शिवथर घळ गाठायची. दुपारचे जेवण करुन मुंबईकर महाड मार्गे परतणार आहेत. तर नाशिक आणि पुणेकर वरंधा मार्गे परतणार आहेत.

एक शान्त सुन्दर सकाळ

Submitted by अमित M. on 12 June, 2013 - 03:00

फार दिवसांपासून डोक्यात होत की कुठेतरी सकाळी सकाळी एकट जाव नी शांत बसून निसर्गाची गुंजरव कान देऊन ऐकावी. अक्टोबर उजाडला आणि थंडीची जाहिरात करण्यासाठी पुण्यात सगळीकडे धुक्याने हजेरी लावायला सुरूवात केली. तेव्हा हि संधी साधून मी माझ्या मित्राबरोबर गुंजवणे dam च्या परिसरात भटकायच final करून टाकल. गुंजवणे dam तसा काही फार लांब नाही. पुण्यापासून अगदी 40 - 50 km परिघात हे ठिकाण आहे. पुण्याहून सिंहगड रोड ने सरळ जायचं आणि मग सिंहगडाच्या पायथ्याकडे न जाता डोणजे फाट्याला उजवीकडे वळायच.

विषय: 
शब्दखुणा: 

अपरिचित, पण अफलातून - ‘कांब्रे लेणी’

Submitted by Discoverसह्याद्री on 1 May, 2013 - 11:31

सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!

कोकणवारी..

Submitted by डीडी on 21 April, 2013 - 02:17

दर वर्षी भारतात येणं होतं, पण ह्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये घरी जाण्याचा योग आला. कोकणांत ह्या दिवसांत म्हणजे नुसती धम्माल. ह्या वेळी बाहेर खूप फिरणं नाही झालं, बहुतेक वेळ घरीच गेला. त्यातूनही घरी आणि आजूबाजूला काढलेली काही छायाचित्रं टाकत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 19 March, 2013 - 20:28

चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर

स्वप्नवत सह्यभ्रमंती::: पाच दिवसांची खडतर, भन्नाट अन् कसदार भ्रमंती (पूर्वार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 11 March, 2013 - 19:55

चावंड - कुकडेश्वर - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड - नारीवली घाट - भीमाशंकर

...चला निसर्ग व अध्यात्माच्या सान्निध्यात हाडशीला

Submitted by ferfatka on 26 February, 2013 - 09:36

24 Feb. 2013

शब्दखुणा: 

‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...

Submitted by Discoverसह्याद्री on 19 February, 2013 - 10:42

कधी वाटतं, दोन-चार दिवस फुरसत काढून, निवांत एखाद्या जुन्या-जाणत्या गडावर शोधयात्रा काढावी..
..वा-यां-वादळांत टिकाव धरून राहण्यासाठी गडावरच्या शिबंदीची, पाण्याची, चोरवाटांची, संरक्षणाची कशी व्यवस्था असेल, याचे आडाखे बांधावेत..
..माचीवरच्या कारवीतून, तिरपांड्या घसा-यावरून घुसत जाताना जीव मेटाकुटीला यावा, अन् अवचितंच पहा-यासाठी खोदलेली विवरं सापडावीत...
..खो-यात उतरणारी दुर्घट वाट सुगम करावी, अन् झाडीत दडलेलं देवीचं ठाणं गवसावं..
..एखादं बुजलेलं वैशिष्ट्यपूर्ण टाकं तास न् तास खपून श्रमदानानं मोकळं करावं, अन् टाक्यावरच्या कोरीव कामानं अचंबित व्हावं..

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)

Submitted by Discoverसह्याद्री on 30 January, 2013 - 20:18

दुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..
वाचा पूर्वार्ध: http://www.maayboli.com/node/40397

Pages

Subscribe to RSS - भटकंती