चांदणे आहे खरे की भास नुसता

Submitted by निवडुंग on 14 August, 2011 - 04:45

पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे. काही चुकलं असेल तर, मार्गदर्शनाची अपेक्षा!
===================================================

चांदणे आहे खरे की भास नुसता?
पैंजणी पाऊल की आभास नुसता?

निसटली नाती, अडकले शब्द ओठी,
भावनांचा काय अट्टाहास नुसता?

चोर बनले साव, मांडत डाव खोटे,
प्राक्तनी मीरा, तुझा, उपहास नुसता..

रात्र आली पोटुशी, ही दु:ख लपवत,
रोज सोशीला कळांचा, त्रास नुसता..

मागता इच्छामरण मी, हसत त्याने,
जीवनाचा काचला गळफास नुसता..

(बोचता "निवडुंग" सरले सर्व मागे,
उमजला मजही उशीरा, फार्स नुसता..
अलामत भंग होतेय बहुतेक, पण "फार्स" चा मोह आवरला नाही.. Happy )

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांदणे आहे खरे की भास नुसता?
पैंजणी पाऊल की आभास नुसता?
>>
हे वाचुन पहिला प्रयत्न नाही वाटला.... Happy
मस्तच! Happy