अक्षम्य तू..

Submitted by निवडुंग on 8 July, 2011 - 04:38

बागेश्रीबाईंची क्षमा मागून.. Wink
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/27186
वर्षा_म - शीर्षक सुचवल्याबद्दल खूप आभार.. Happy

इतक्या झोकांड्या
खाऊनही, उभाच राहतोस..
कित्येकदा ठेचाळतोस,
धरपडतोस,
तरफडतोस,
पण, पुन्हा उभाच!

चेहर्‍यावर तीच धुंदी लेवून!
ब्रम्हानंदी टाळी लागल्याची,
बेबंद, बेफाम,
सुसाट चढणारी!!

कसं जमतं तुला?
सगळ्यांना सावरायला लावणं?
बिनबुडाचं हसणं?
चारचौघांच्या आधाराने उभं ठाकणं?

अगं,
मी काहीही विशेष करत नाही,
निसर्गापासून बनलेला "सोमरस"
रोज टाकण्याशिवाय!!

गुलमोहर: 

मंडळी खूप खूप धन्यवाद.. पहिलाच प्रयत्न होता इथे विडंबन करण्याचा.. Happy

बागे, तुझे विशेष आभार, विडंबनासाठी मटेरिअल पुरवल्याबद्दल.. Wink Proud