तीव्र कोमल
फक्त एक घर तर घ्यायचं होतं.
या ‘फक्त’पाशी येऊन पोहोचायला चंद्रकांत काशिनाथ फाटक ऊर्फ चंदाला गेले चार-सहा महिने फार घाम गाळावा लागला होता...
आपला फारच घाम गळतोय हे लक्षात आल्यावर त्यानं कारचा ए.सी. अजून वाढवला. ए.सी.वाढवणे या शब्दप्रयोगाचा ऐश्वर्याला राग येतो. "तो काय आवाज आहे का वाढवायला किंवा कमी करायला?" असं तिचं म्हणणं.
"मग काय म्हणायचं?"
"Drop the temperature."
"म्हणजे तेच ते ना?"
"नाही!"