स्पर्धा

माझे गाजलेले व़क्तृत्व....

Submitted by मी विडंबनकार on 12 October, 2011 - 02:11

"अहो सर, ह्याचं हिंदी खूप छान आहे. हिंदी फारच छान बोलतो" पांडे सरांनी पाटील सरांना आश्वासन दिले.

"खरंच ना? नाहीतर साहेबांपुढे धांदल उडायची" पाटील सरांच्या चेहर्‍यावर थोडा ताण होता.
वकृत्व स्पर्धेचं आयोजन शेवटी त्यांच्याच हातात होतं. "सर, ट्रस्ट मी " पांडे सरांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास होता.

"ठीक आहे , याचं नाव मी फायनल यादीत टाकतो , काय नाव म्हणालात याचं ? रोहित ना?" पाटिलजी उवाच!
पांडे सर तत्परतेने- "होय"
सरांचा आत्मविश्वास त्यांच्या आवाजातून जाणवला आणि मला माझी जबाबदारी कळाली. त्यावेळी सहावीत होतो मी.

गुलमोहर: 

फोटोतली व्यक्ती ओळखा स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 11 October, 2011 - 04:02

हे बघा... अगदी परग्रहावरचं कुणीतरी दिसतंय ना? नाही हो, व्यक्ती इथलीच आहे. ओळखू येतेय का तुम्हांला?

deooldis.jpg

'देऊळ'च्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा गमतीशीर खेळ. छायाचित्रातली व्यक्ती ओळखायचा हा खेळ आहे.

वर दिलेल्या छायाचित्रातला कलाकार ओळखा आणि बक्षीस म्हणून मिळवा 'देऊळ'ची ध्वनिफीत!!!

एकापेक्षा अधिक स्पर्धकांनी बरोबर उत्तर दिलं, तर कोणाला बक्षीस द्यायचं हे लकी ड्रॉनं ठरवण्यात येईल.

अचूक उत्तर उद्या सकाळी जाहीर केलं जाईल.

ई प्रसारण स्पर्धा - नाट्य दर्पण २०११

Submitted by prashant_the_one on 20 September, 2011 - 17:49

नाट्यप्रेमी माबोकरांनो,

एक आगळी वेगळी स्पर्धा आहे ही. खालील लिंकवरती टिचकवा...

http://www.eprasaran.com/NatyaDarpan/

विषय: 
शब्दखुणा: 

मीमराठी.नेट कविता स्पर्धा (प्रथम क्रमांक)

Submitted by अभय आर्वीकर on 21 April, 2011 - 05:25

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे

गुलमोहर: 

मराठी भाषा दिवस (२०११) - स्पर्धा आणि कार्यक्रम

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:44

२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून मागच्या वर्षी पहिल्यांदा आपण मायबोलीवर साजरा केला. यापुढे करत रहाणार आहोत. यंदाही 'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर करीत आहे..

यावर्षी खालील उपक्रम/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.

१. केल्याने भाषांतर..

२. ये हृदयीचे ते हृदयी

३. "बाल"कवी

स्पर्धा आणि मी

Submitted by अमित अरुण on 19 November, 2010 - 20:04

मी खर सांगु, मला ना उंच आकाशात उडायचय
पार अगदी क्षितिजापलिकडे जाउन पोचायचय
जिथे कुणीच नसेल माझ्याशी स्पर्धा करायला
अशा अनोख्या जागी जाउन पोचायचय

तुला माहीत्येय, तसं मला स्पर्धेचं भय नाही
नाही...खरच नाही...
आजही नाही आणि आधिही नव्हतं कधी
पण काय सांगु तुला,
आजकाल कधी नव्हे तो मी धावताना दमायला लागलोय
धावता धावता मधेच मागे वळुन बघायला लागलोय
मी पुढे जाण्यापेक्षा बाकीचे मागेच आहेत ना
याची खात्री करायला लागलोय

कुठुन आलो ते पहायला आता वेळ नसतो
कुठे चाललो त्याचे आताशा भान नसतं मला
अक्शरश: काळ मागे लागल्यासारखा पळत असतो मी
डोळ्यावर झापडं चढल्येत गं माझ्या
पाठीवर आसूड कुणाचा उडतोय

गुलमोहर: 

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३ - 'आधार' प्रवेशिका

Submitted by संयोजक on 13 September, 2010 - 05:14

*****************************************************
ह्या स्पर्धेचे नियम इथे बघता येतील. - http://www.maayboli.com/node/18690
*****************************************************

प्रवेशिका क्र. २६
मायबोली आयडी : प्रिया

विषय: 

प्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ - 'विरुद्ध' : प्रवेशिका

Submitted by संयोजक on 11 September, 2010 - 19:22

******************************************************
या स्पर्धेचे नियम इथे पहाता येतील - http://www.maayboli.com/node/18989
******************************************************
प्रवेशिका क्र. २९
मायबोली आयडी : डॅफोडिल्स
फोटोचे शिर्षक : दिव्याखाली अंधार

कॅमेरा : सोनी एरिक्सन मोबाईल सायबरशॉट ३.२ मेगा पिक्सेल
पिकासा वापरून इमेज रिसाईज आणि मायबोली लोगो टाकला आहे.

prachi_viruddha_entry_daffodils_0.jpg

विषय: 

गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ४

Submitted by संयोजक on 3 September, 2010 - 14:27

आजचा विषय : पल्लवी जोशी आणि साडी

2010_MB_Jahiratbajee_PallaviSaree_Poster3.jpg

नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.

विषय: 

गणेशोत्सव २०१० स्पर्धा - अशीही जाहिरातबाजी - ३

Submitted by संयोजक on 3 September, 2010 - 14:08

आजचा विषयः लालूप्रसाद यादव आणि अरमानीचे सूट

2010_MB_Jahiratbajee_LaluPrasadAramaniSuit_Poster4.jpg

नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - स्पर्धा