मराठी भाषा दिवस (२०११) - स्पर्धा आणि कार्यक्रम

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:44

२७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून मागच्या वर्षी पहिल्यांदा आपण मायबोलीवर साजरा केला. यापुढे करत रहाणार आहोत. यंदाही 'संयुक्ता' हा कार्यक्रम सादर करीत आहे..

यावर्षी खालील उपक्रम/स्पर्धा निवडल्या गेल्या आहेत. सर्व मायबोलीकर भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे.

१. केल्याने भाषांतर..

२. ये हृदयीचे ते हृदयी

३. "बाल"कवी

४. निबंध - माझे आवडते पुस्तक

५. बोलगाणी

पोस्टर्स -
"केल्याने भाषांतर..", बोलगाणी - अंजली
ये हृदयीचे ते हृदयी, निबंध स्पर्धा - मिनी
"बाल" कवी - बस्के

संयोजक - प्राजक्ता_शिरीन, मंजिरी, सशल, सावली, सुनिधी, सायो.

२०१० चा उपक्रम आपण इथे पाहू/ऐकू शकता.

http://www.maayboli.com/marathibhashadin/2010

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतिश..
नाही. मायबोलीवरचे सगळे सदस्य यात भाग घेऊ शकतात.

उत्तराबद्दल धन्यवाद रैना

अरे वा! जोरदार आहेत कार्यक्रम. सर्वांना या उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा!
पोस्टर्स छानेत आणि रुपरेषाही.

काय होणार? स्पर्धेचे जसे नियम दिलेले आहेत, तसेच परिक्षकांचे नावही दिले तर घोषणा संपूर्ण होईल, असे माझे मत. कोणतीही स्पर्धा असते, तेव्हा त्याचं परिक्षण कोण करणार आहे, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. स्पर्धेनंतर 'अमूक अमूक ह्यांनी परिक्षण केले' असं सांगतातच ना?

नावं गुप्तच ठेवायची असं संयोजकांनी ठरवले असेल, तर तसं सांगावं. त्यात काय?

अरे वा, चांगले कार्यक्रम आहेत याहीवर्षीचे.

सगळी पोस्टर्स छान आहेत. कलाकारांचे अभिनंदन. संयोजकांना शुभेच्छा.

>>स्पर्धेनंतर 'अमूक अमूक ह्यांनी परिक्षण केले' असं सांगतातच ना?

पौर्णिमा, हो. ते नंतरच सांगितलं जाईल. याप्रमाणे- Happy
http://www.maayboli.com/node/14307

धन्यवाद.

अरे वा! सगळ्या स्पर्धा / कार्यक्रम मस्त आहेत.
पोस्टर्सही आकर्षक झालीयेत.

संयोजकांना शुभेच्छा! Happy

एक भा.प्र.
हे फक्त माबोकरांसाठीच आहे का?
म्हणजे मी ही लिंक माबोकर नसलेल्या परिचितांना पाठवली, आणि त्यांना सहभागी व्हावंसं वाटलं तर काय करता येइल?
(माबोकर होणं हा ऑप्शन छानच आहे, पण ते त्यांच्यावर अवलंबून आहे. Happy )

चांगल्या स्पर्धा आहेत. ह्या उपक्रमाला गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
संयोजकांना ( मी धरुन) शुभेच्छा. Proud

भुसारे,
मायबोलीकर कवींना स्वतःच्या (आधी लिहिलेल्या किंवा नवीन) कवितेचे रसग्रहण, ओळख लिहिता येईल की. Happy किंवा इतर मायबोलीकरांना मायबोलीकरांच्या कवितेचे रसग्रहण करता येईल. Happy

Pages