अमित

स्पर्धा आणि मी

Submitted by अमित अरुण on 19 November, 2010 - 20:04

मी खर सांगु, मला ना उंच आकाशात उडायचय
पार अगदी क्षितिजापलिकडे जाउन पोचायचय
जिथे कुणीच नसेल माझ्याशी स्पर्धा करायला
अशा अनोख्या जागी जाउन पोचायचय

तुला माहीत्येय, तसं मला स्पर्धेचं भय नाही
नाही...खरच नाही...
आजही नाही आणि आधिही नव्हतं कधी
पण काय सांगु तुला,
आजकाल कधी नव्हे तो मी धावताना दमायला लागलोय
धावता धावता मधेच मागे वळुन बघायला लागलोय
मी पुढे जाण्यापेक्षा बाकीचे मागेच आहेत ना
याची खात्री करायला लागलोय

कुठुन आलो ते पहायला आता वेळ नसतो
कुठे चाललो त्याचे आताशा भान नसतं मला
अक्शरश: काळ मागे लागल्यासारखा पळत असतो मी
डोळ्यावर झापडं चढल्येत गं माझ्या
पाठीवर आसूड कुणाचा उडतोय

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अमित