पाककृती स्पर्धा क्रमांक ३ : पेय - फळ + फूल + मसाला : जयु : जश्न - ए - बहार

Submitted by जयु on 23 September, 2026 - 13:41

मायबोलीकर रसिकहो नमस्कार.
सादर आहे : चवींचा त्रिवेणी संगम :- पेय - फळ + फूल + मसाला : जश्न - ए - बहार.
सादरकर्ते : जयु

मायबोली गणेशोत्सव २०२६ सुरु झाल्यावर नेहमीप्रमाणे लगेचच सहभागी झाले.
मी फक्त फोटोच्या झब्बूत २-४ फोटो टाकते. पण आज अचानक माझ्या मनात पेय बनवण्याच्या कल्पनेला धुमारे फुटून बहार आला.
एकदम ३-४ त्रिवेणी संगम सुचले. पण सर्व गुण ( फळ + फूल + मसाला ) जमवणे ह्या पेयासाठीच शक्य होते.
तर पेश आहे: जश्न - ए - बहार
WhatsApp Image 2026-09-23 at 19.17.34.jpeg
साहित्यः
फळ: सफरचंद , डाळींब
फूल : गुलाब : वाळलेल्या पाकळ्या
मसाला : दालचिनी, लवंग, वेलची ,केशर
कृती:
मला काश्मिरी कहवा करायचा होता . पण त्यात फळ येत नव्हते. म्हणून थोडे बदल करून जश्न - ए - बहार बनवला. जन्नत - ए - कश्मिर ला मिळतेजुळते म्हणून हे नाव Happy
१. प्रथम सगळे मसाले एका भांड्यात घेऊन थोडेसे ठेचून घेतले. त्यात थोड्या गुलाब पाकळ्या चुरडून घातल्या. आणि एक कप पाणी आणि एक छोटा चमचा साखर घालून उकळत ठेवले.
२. पाणी उकळतंय तोपर्यंत डाळिबाचे दाणे सोलून घेतले. लागतील तेव्हढेच( एक फोड कापून त्याचे) :). ते मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून, गाळून घेतला.
३. उकळलेल्या पाण्याचा गॅस बंद केला .
४. नंतर रस काढण्यासाठी लागेल तेव्हढ्याच सफरचंदाची साल काढून, गर मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून, गाळून घेतला.
५. आता सादरीकरणाची तयारी :
टेबलवरचा पसारा काढून फोटो काढण्यासाठी जागा केली. प्लेट ग्लास मांडून बघीतले. सफरचंदाच्या फोडीचे पातळ काप करून त्याला पिसाऱ्यासारखे पसरवून प्लेटमधे मांडले.  थोडे डाळिंबाचे दाणे सोलून प्लेटमधे पसरले. मसाल्यातला एक एक घटक शेजारी ठेवून दिला.
६. आता मुख्य पात्राची असेंब्ली:
ग्लासमधे प्रथम डाळिंबाचा रस घातला. त्यावर सफरचंदाचा रस ओतला. ( थोडा डार्क झाला होता. थोडासा लिंबू पिळायला हवा होता रस काढताना) हे ओतल्या नंतर लक्षात आले Sad . जाऊदे . आता मसाल्याचे गार झालेले पाणी गाळून हळूच ग्लासमध्ये ओतले. त्याला मात्र मस्त सोनेरी रंग आला होता केशरामुळे.
७. ग्लास प्लेटमधे ठेवला. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि केशरकाड्या घातल्या.
आता वेगवेगळ्या अँगलने , झूम इन, झूम आऊट करून १०-१२ फोटो काढले. झाले .त्यातले निवडक येथे देतेय.

WhatsApp Image 2026-09-23 at 19.17.33.jpegWhatsApp Image 2026-09-23 at 19.17.33 (1).jpegWhatsApp Image 2026-09-23 at 19.17.32.jpeg

घरातले गिनीपिग  टेस्ट बघायला तयार नव्हते . ( हे आधिच माहित होते म्हणूनच थोडेच पेय बनवले होते) हा हा हा. मग बाप्पाचे नाव घेऊन एक घोट घेतला. छानच लागले . न लागायला काय झाले. सगळे छानछान पदार्थ एकत्र केले होते. मस्त  मॉकटेल सारखे. बर्फ घातला असता तर एकदम हॉटेल सारखे लागले असते. नवऱ्याला सांगितल्या वर त्याने उरलेले अर्धे एका घोटात संपवून टाकले.

कधीही पाककृती न करणारी आणि कुठलेही ललित लेखन न करणारी मी, श्रीगणरायाच्या कृपेने पाककृती स्पर्धेत आणि पाककृती लिखाण स्पर्धेत भाग घेत आहे हो .
हि पाककृती लिखाणची लिंक - https://www.maayboli.com/node/88934
रसिकजनहो आपला लोभ असावा . आपला अभिप्राय जरूर कळवा ही विनंती. धन्यवाद!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाए ये रंग केसरिया

छान आहे मॉकटेल. तुम्ही मसाले बरेच वापरले आहेत.

Apple juice तसेही खूप versatile मटेरियल आहे, छान चव असणार.

हे मस्त झाले आहे. या स्पर्धेतील सर्वच एंट्री दिसायला छान आहेत, वॉलपेपर ठेवाव्यात अशा, पण हे पटकन प्यावेसे सुद्धा वाटत आहे हे विशेष Happy

धन्यवाद ऋतुराज.
ऋन्मेष विशेष आभार. Happy
धन्यवाद केया. नक्की करून बघा. आवडेल तुम्हाला. बर्फ घालून बघा ,अजून चांगले लागेल.