Submitted by चीकू on 21 September, 2026 - 18:51
नोकरीचा पहिला दिवस. तो उत्साहाने बॅज स्वाईप करून आत आला. सगळीकडे शुकशुकाट. तो गोंधळला. दिवस बरोबर होता. आज सुट्टीही नव्हती. सांगितलेल्या वेळीच आला होता. बॅजही चालत होता.
अचानक एक महिला सिक्युरिटी ऑफिसर त्याच्या दिशेने येताना दिसली.
'बाहेर निघा!' तिने फर्मान सोडले.
'अहो नोकरीचा पहिला दिवस. बॅज बघा, बॉसना बोलवा.'
'कोणीच नाहीये इथे!'
'म्हणजे? गेलेत कुठे सगळे?'
'घरी पाठवलंय. आज बाहेरच्या देशातून महत्वाचं डेलिगेशन येतंय कंपनीबरोबर बिझनेससाठी. सगळ्याच बायका. त्यांनी रिक्वेस्ट केलीय त्यांच्या प्रथेनुसार त्यांना कोणी पुरुष दिसायला नकोय. पाचशे लोकांच्या कंपनीत मीच एकटी बाई. तेही बाप इथे ड्युटीवर असताना गेला म्हणून नाईलाजाने घेतलेली. आज मीच बिग बॉस बिझनेसची बोलणी करणारी!'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप वर केलेली कोटी एकदम सही
बाप वर केलेली कोटी एकदम सही
कमाल!!!
कमाल!!!
भारी...
भारी...
भारी
भारी
मस्त जमली आहे
मस्त जमली आहे
जबरदस्त...
जबरदस्त...
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
मस्त
मस्त
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
धन्यवाद लोकहो!
धन्यवाद लोकहो!