आपण ५ नंबर प्लॅटफॉर्मवर वेळेत जावं, पण नेमकी शेवटच्या क्षणी अनाऊन्समेंट व्हावी आणि काही ॲक्षन घ्यायच्या आत आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर ३ वरुन निघून जावी.
तशा असतात काही गोष्टी... ठरवतो करायचय करायचय म्हणून, पण नाही जमत करायला काही ना काही कारणांनी.
दुसरी गाडी येते, आपण ती पकडून मार्गस्थ होतो... मुक्कामीही पोहोचतो पण काही प्रवास हे मुक्कामासाठी नाही तर मधल्या प्रवासासाठी करायचे असतात ... ते मात्र गणित बदलतच दुसरी गाडी पकडल्यावर. छान होतो प्रवास अधिक? की वाईट होतो? की काही फरक नसतोच? हे ही खरेतर नाही सांगता येणार ठामपणे. जे सुटतं ते सुटतंच खरतर, जे मिळतं त्यात आपण पुर्ण आहोत का हा प्रश्न मात्र उरतो
कितीही आटापिटा करा काही गोष्टी या सुटणारच आहेत आणि त्या सुटल्या तशा तरी काही वेगळ्या गोष्टी नकळत समोरही येणार आहेत. उगीच हे वळण घेतलं असतं तर ... त्या तिथे डावीकडे वळायच्या ऐवजी उजवीकडे वळले असते तर... या जर तरच्या गुंताळ्यात स्वत:ला अडकवताना जे समोर आलय त्या क्षणाला आपण नकळत नाकारतोय का? हे मात्र स्वत:ला विचारायला हवय.
छे! छे! हा तुम्हाला उपदेश वगैरे नाहीये. हा स्वत:चा स्वत:शी संवाद आहे. एरव्ही मनातल्या मनात मोठ्याने सुरु असतो तो इथे उपक्रमाच्या निमित्ताने कागदावर खरडलं गेलाय इतकच.
कुठून आलो?, ठावूक नाही
कुठे जायचे ?, ठरले नाही
अनेक वाटा, अनेक वळणे
भुलभुलैय्या संपत नाही
गमतीचा भाग म्हणून खरेतर बरच काही सुचलं होतं राहून गेलेलं काय आहे स्वत:ला विचारताना. "बघ बघ बाया किती 'छान' तयार होतात, 'छान' गातात, 'छान' नाचतात ... हे 'छान' जे आहे त्यातलं, ते अनुभवायचं राहून गेलय... कारण स्वत:चा स्वर ताल ओळखून असण्याचा शाप कारणीभूत आहे. यातही फारसा खेद नाहीये खरतर. 'जे आहे ते आहे' या चालीत आहे ते. खरतर 'छान' हे सापेक्ष आहे हे मनाला माहीत आहे. पण मन कधीतरी हट्टी मुला सारखे धरुन बसते एखादी गोष्ट उगाचच.
गमतीचा भाग सोडला तर कधी कधी वाटतं नात्याला पैशापेक्षा महत्व देणं हे तरुण असताना कैच्याकै उच्च मुल्य वगैरे वाटायचं, पैशाला इतका कमीपणा देणं चुकलच ...बॅलन्स साधला जायला हवा. पण अर्थात प्रत्येक गोष्टीचं मुल्य समजायलाही मुल्य मोजावं लागतं. कधी ते मुल्य अनुभवलेल्या क्षणांचं असतं तर कधी न अनुभवलेल्या.
किंमत चुकवून शिकतो आपण इथेच सारे
कुणी कुणाच्या साठी केव्हा किती रडावे
आपण सोडलेली वळणे, निवडलेले थांबे, सुटलेल्या गाडीच्या बदल्यात पकडलेली गाडी हे सारे सारे निव्वळ आपले असते. सुटलेल्या गोष्टी हातात नसतात पण असलेल्या गोष्टीचा प्रवास ही आपलीच जबाबदारी असते हे नाकारुन चालणार नाही.
ते निवडण्याची कारणे, परिस्थिती, त्या वेळा या पलिकडे जाऊन बघितले तर लक्षात येते प्रवास थांबत नाही कधी... जे वळण घेऊ तिथल्या खाचखळग्यांतून तो सुरु रहातो, डावीकडे वळण्या ऐवजी उजवीकडे वळलो तरी आपण त्या रस्त्याने पुढे जात रहातो. वर्तुळाकार रस्ता जरी निवडला तरी त्यातही 'अंत: अस्ति प्रारंभ' म्हणण्यासारखे काही समोर येते आणि हे ही खरे की असे होत असतानाही मागे काही सुटून जाते. पण ते तसेच तर होणार असते ना?
माझ्यापुरते तरी मी इतकेच म्हणते -
'जे घडले; वा ना घडले ते तसेच लिहीले होते'
छान!घडले अथवा घडले नाही
छान!
घडले अथवा घडले नाही
खेद खंत ना उरली काही
आयुष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वहाणे ...
हे तर आहेच... पण तरी फिल्सॉफी झाडून पतली गली से सुमडी मे कोंबडी नय करनेका!
बाकी, पाच नंबरला जायला ब्रीज कोण करतो!
छान लिहिलं आहे, आवडलं.
छान लिहिलं आहे, आवडलं.
बाकी, पाच नंबरला जायला ब्रीज कोण करतो! >> हल्ली लागतो
सुमडी मे कोंबडी नय करनेका!>>
सुमडी मे कोंबडी नय करनेका!>>
कविन आवडलं हे मुक्तचिंतन.
कविन आवडलं हे मुक्तचिंतन.
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलाता चला गया
बाकी, पाच नंबरला जायला ब्रीज कोण करतो! >> कुठल्या ठेसनावर आहेस त्यावर अवलंबून आहे ना?
बाकी, पाच नंबरला जायला ब्रीज
बाकी, पाच नंबरला जायला ब्रीज कोण करतो!>> १ नंबरकडे रहाणारा
वाह छान अगदी कवीन टच
वाह छान
अगदी कवीन टच
छान लिहिलंयस.
छान लिहिलंयस.
मस्तच लिहिलं.
मस्तच लिहिलं.
बघ बघ बाया किती 'छान' तयार होतात, 'छान' गातात, 'छान' नाचतात ... हे 'छान' जे आहे त्यातलं, ते अनुभवायचं राहून गेलय.. >>> ही तर माझीच वाक्य वाटताहेत. ह्यात आणखी काय काय ऍड होत असतं.... स्वयंपाक करणे..., घर आवरणे... वगैरे...
आवडलं.
आवडलं.
The road not taken ही कविता आठवली.
< कारण स्वत:चा स्वर ताल ओळखून असण्याचा शाप कारणीभूत आहे. > मीही स्वतःवरच अशी अनेक बंधनं घालून घेतली. पण कधीतरी आपल्या नसलेल्या तालासुरात गाऊन नाचून बघायला हरकत नाही - फक्त आपल्यासाठी आणि आपल्यापुरतं ; हे कळलंय.
कविन,
कविन,
"छान" लिहिले आहे ते अनुभवले
शब्द n शब्द _/\_
शब्द n शब्द _/\_