शशक स्पर्धा - चीकू - स्फूर्ती

Submitted by चीकू on 23 September, 2026 - 07:56

'या वर्षी तरी शशक स्पर्धेत बक्षीस मिळायला हवं. पण काही सुचत नाहीये.' ती वैतागाने म्हणाली.

'अगं सुचेल काहीतरी नक्की. मी काही मदत करू का?' पत्नीला प्रत्येक बाबतीत शंभर टक्के साथ देणाऱ्या तिच्या प्रेमळ कर्तव्यदक्ष नवऱ्याने विचारले.

'इतका वेळ विचार करतेय. मला रस आणि अलंकार हवेत. त्याशिवाय काही नाही जमणार.'

'हात्तिच्या! एवढंच ना? आधीच सांगायचंस की!' प्रेमळ नवऱ्याने लगेच आत जाऊन ग्लासभरून ऑरेंज ज्यूस आणून तिच्यापुढे ठेवला. आणि एका मखमली पेटीतला मोत्यांचा सर तिच्या गळ्याभोवती प्रेमाने घातला.

'हा परवा तुला देणार होतो आपल्या अनिव्हर्सरीसाठी. पण म्हटलं आत्ताच देऊया. आता मिळाला ना रस आणि अलंकार. मग लिही काहीतरी जबरदस्त. नक्की बक्षीस मिळेल!'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

तुमचा नवरा भारी गुणाचा दिसतो हां. शिकवणी लावायची झाली तर किती घेणार? Wink>>

शशक स्पर्धेत बक्षीस मिळालं तर शिकवणी फ्री Happy

मी प्रयत्न करते मग तुम्हाला बक्षीस मिळवून देण्याचा - माझे मत देउन आणि संयोजकांना ब्राईब देउन Wink
---------
नाही नाही मी माझ्या 'भूपाळी' लाच मत देणार. मी ड्यु आय डीज पण काढलेत त्याकरता Happy

नाही नाही मी माझ्या 'भूपाळी' लाच मत देणार. मी ड्यु आय डीज पण काढलेत त्याकरता Happy>>>

बिच्चारा नवरा! ऑरेंज ज्युस आणि मोत्यांचा सर वाया गेला म्हणायचा Happy