
मूगडाळीचा महिमा
मुगडाळ पौष्टिक आणि पचायला सोपी असली तरी चणाडाळी एवढी ती लोकप्रिय नाहीये. तरी ही मुगडाळ वापरून सौम्य चवीची तरी ही स्वादिष्ट अशी थाळी तयार केली आहे.
१) शेपूची भाजी : भिजवलेली मुगडाळ , कांदा , हिरवी मिरची आणि जिरं घालून .
२) काकडीच्या कोशिंबिरीत भिजवलेली मुगडाळ घातली आहे. नारळाचा चव, लिंबू आणि फोडणी गार करून घातली. डाळ अजिबात कच्ची लागत नाही. अशी पडवळाची ही छान लागते. नक्की करून बघा.
३) आम्ही रोजच तूर, मूग मसूर मिक्स डाळीचं वरण करतो आज फक्त मूग डाळीचं. टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता थोडी लसूण फोडणीत घातली. आणि गोडा मसाला घातला आहे.
४) मूगडाळीचा सर्वात लोकप्रिय गोड पदार्थ हलवा पण तुपामुळे आमच्याकडे बिग नो. एवढं तूप खाऊच शकत नाही, म्हणून मुगडाळ पायसम केलं. मुगडाळ धुवून सुकवून भाजून घेतली आणि शिजवली, साधारण घोटून त्यात गुळाच पाणी घालून दोन उकळ्या काढल्या. शेवटी नारळाचा रस घातला. रस काढायचा कंटाळा आला तर साधं दूध ही घालू शकता. स्वादासाठी जायफळ आणि वरून थोडा सुकामेवा.
५) मुगडाळ बोंड : नवीन काही नाही.
६) मुगडाळ डोसा: मुगडाळ भिजवून बारीक वाटून घेतली, वाटताना मीठ, लसूण हिरव्या मिरच्या घातल्या. डोश्याच्या पीठा इतपत पातळ करून पानात नीट वाढता यावेत म्हणून छोटे डोसे घातले. डोसे खूप छान झाले होते. जरा ही चिकटत वगैरे नव्हते आणि कुरकुरीत झाले होते. हाय प्रोटीन डाएट साठी मस्त ऑप्शन आहे.

हे पूर्ण ताट
मस्त दिसतंय ताट!
मस्त दिसतंय ताट!
काय भारी भारी रेसिपीज येतायत... एरवी अ ति परिचयामुळे अवज्ञेत गेलेली मूगडाळ इतकी सालंकृत होऊन आली आहे की वाह!
थँक्यु प्रद्न्या..
थँक्यु प्रद्न्या..
मी अळू ठरवलं होतं पण कोकणातून अळू न आल्याने आणि विकतच अळू विशेष आवडत नसल्याने आयत्या वेळी हिरवीण बदलावी लागली.
सुंदर ताट.
सुंदर ताट.
हे पदार्थही एकेकट्याने भेट देतात माझ्या घरी.
मस्त ताट
मस्त ताट
पदार्थ नेहमीचे माहितीचे वा करण्यातले असले तरी ते इथे ज्या प्रकारे पेश केलेत ते खरच एकदम मस्त वाटत आहे. ताट तोंपासूच नाही तर डोळ्यांनाही सुखावणारे आहे
फोटो बघून लगेच जेवायला यावे
फोटो बघून लगेच जेवायला यावे असे वाटले
मस्त दिसतंय ताट.मुगाचे डोसे
मस्त दिसतंय ताट.मुगाचे डोसे आवडीचे, बघूनच भूक लागली.
मूगडाळीचा महिमा हे शीर्षक
मूगडाळीचा महिमा हे शीर्षक बदलून म मो चा महिमा असे ठेवण्यात यावे ही विनंती !
हे इतके पदार्थ एका वेळेस करुन त्याचे प्रेझेंटेबल फोटो काढणे, पा कृ लिहिणे......केवळ म हा न !!!
हे इतके पदार्थ एका वेळेस करुन
हे इतके पदार्थ एका वेळेस करुन त्याचे प्रेझेंटेबल फोटो काढणे, पा कृ लिहिणे......केवळ म हा न !!! >+१
सुरेख ताट.
हिरवीण बदलली>>
हिरवीण बदलली>>
मस्तच! हे प्रॉपर ताट दिसत आहे
मस्तच! हे प्रॉपर ताट दिसत आहे हे विशेष
मूगडाळ डोसे मुलांना लहानपणी आवडायचे म्हणून केले जायचे तेव्हापासून माझ्याही आवडीचे झाले आहेत.
पाकृ स्पर्धातील सर्वच एन्ट्री मस्त आहेत तुमच्या... नेहमीप्रमाणे.
हेमाताई , मस्तच !! तुमच्या
हेमाताई , मस्तच !! तुमच्या सगळ्याच रेसिपी छान आहेत. मी मूग डाळी चा विचार करत होते. तुम्ही पहिला नंबर लावलात. आता वेगळा विचार करावा लागणार
झकास. कितीतरी प्रकार केलेत !
झकास.
कितीतरी प्रकार केलेत ! यातले पेसरट्टू आणि कांदा नसलेली मूग भजी तर ऑटाफे आहेत 🤤
लेखिकेचे नाव बघून कैरलम् स्टाइल मुगडाळीच्या पुरणाची पुरणपोळी ताटात दिसेलसे वाटले होते. After all, मनीमोहर पुरणपोळी क्वीन 👑 आहेत माबोच्या.
मुगाचे आप्पे, सालीच्या मुगडाळीची खिचडी, मूंगलेट, सालविरहित मुगडाळीचा ढोकला, हांडवो, दहिवडे असे प्रकार (मूग इकडच्या स्वारीचे आवडते असल्याने) अनेकदा होतात पण एकावेळी एकच.
छानच!
छानच!
मला सादरीकरण जास्त आवडले.
मस्त!
मस्त!
आज मूग गिळून गप्प बसा असं घरच्यांना सांगितलंत की नाही!
मस्त! तुमचं करणं निगुतीचं आणि
मस्त! तुमचं करणं निगुतीचं आणि प्रेझेन्टेशन सुंदर असतं.
अमित
अमित
काय सुंदर दिसतंय ताट!!यातले
काय सुंदर दिसतंय ताट!!यातले काही पदार्थ घरी होतात.
भारीच दिसतंय ताट . भरलेलं.
भारीच दिसतंय ताट . भरलेलं. प्लेटिंग मस्त.
वरण तुरीच्या डाळीचेच आवडतं भले मुगाची डाळ कितीही पौष्टिक असुदेत.
पालेभाज्यांमध्ये भिजवलेली मूगडाळ आवडते.
हलवा मस्त दिसतोय वेगळ्या पद्धतीने, करून बघणार
मस्त!
मस्त!
मस्त दिसतंय ताट. बघूनच भूक
मस्त दिसतंय ताट. बघूनच भूक लागली.
सगळेच प्रकार आवडले. प्लेटिंग नेहेमी प्रमाणे सुरेख.
मूगडाळीचा महिमा कमी आणि ममोंचा महिमा जास्त आहे यात .
छान दिसतंय ताट. रेसिपीही
छान दिसतंय ताट. रेसिपीही इंटरेस्टिंग आहेत.
छान आहे पूर्ण ताट
छान आहे पूर्ण ताट
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.

म मो महिमा
माबो च्या पुपो क्वीन > असं काही नाही हो अनिंद्य
मूग गिळून गप्प बसा .. शीर्षक ह्या वरून काहीतरी द्याव असं वाटत होतं पण सुचलं नाही.
पदार्थ खूप असल्याने वाढण्यासाठी स्टीलची प्लेट घेतली होती पण घासणीचे चरे आपल्याला दिसले नाहीत तरी कॅमेरा ते बरोबर टिपतो. म्हणून काचेची प्लेट घेतली.वाट्या काचेच्या घेतल्या त्यातून पदार्थ नीट दिसतो म्हणून. नैसर्गिक सूर्य प्रकाशात फोटो काढला आहे.
वाह! मस्त पदार्थ.
वाह! मस्त पदार्थ. आठवडाभराच्या आता खायला काय करू चे उत्तर.
डिश किती चारी ठाव दिसते आहे.
मूगडाळ पायसम करून बघणार.
आज मूग गिळून गप्प बसा असं
आज मूग गिळून गप्प बसा असं घरच्यांना सांगितलंत की नाही! Proud>
मस्त सात्विक थाळी.
मस्त सात्विक थाळी.
पारिजाता, कविन आणि जयू
पारिजाता, कविन आणि जयू धन्यवाद
आहाहा सुरेख नीटनेटकी मांडणी.
आहाहा सुरेख नीटनेटकी मांडणी. सर्वच आवडलं.
अंजू धन्यवाद
अंजू धन्यवाद
Wow
Wow
मस्त आहे
माबोवर मुगडाळला ग्लॅमर आलंय ममो आणि अनामिका मुळे