Submitted by मॅगी on 22 September, 2026 - 05:24
डोळे उघडले. कालच्या सक्सेस पार्टीमुळे दोघेही अस्ताव्यस्त झोपलो होतो. सरकून तिच्या गळ्यात हात टाकले. माझ्याकडे पहाताच ती किंचाळली. "कोण आहेस तू? "
मी तुझा नवरा, बिझनेस पार्टनर हे पुनःपुन्हा सांगितले. तरीही "नाही. तू दुसराच कोणी आहेस."
थोड्या वेळाने पोलिस आले. माझे id चेक केले, तिला समजावले. तरीही नाहीच. रात्री तिच्या हातात सुरी दिसली. कसेबसे तिला बेडरूममध्ये ढकलून लॉक केले.
शेवटी तिचे आईवडील आले. तरीही तेच. डॉक्टर म्हणाले, कॅपग्रास सिंड्रोम! ते काय असतं? शेवटी सासरेबुवानीच तिला एका फॅसिलिटीमध्ये ठेवले, निघताना माफी मागितली. मी कशाला? म्हणत शेवटचा नमस्कार केला. तोंडावर पाणी मारलं. आरशात बघत चेहरा चाचपला.
तरीही, हाऊ डिड शी नो??
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त!
जबरदस्त!
अरे कसल मस्त शशक आहे.
अरे कसल मस्त शशक आहे.
जबरदस्त
जबरदस्त
ट्विस्ट खतरनाक आहे..
ट्विस्ट खतरनाक आहे..
कोई तो छिलो. सोला.
कोई तो छिलो. सोला.
बापरे, जबरदस्त !
बापरे, जबरदस्त !
अरे ग़ज़ब…. एखादी मायक्रो
अरे ग़ज़ब…. एखादी मायक्रो वेबसिरीज बघितल्याचा फ़ील आला.
माझ्यादृष्टीने ही Winner कथा 👍
धन्यवाद अनिंद्य आणि सगळ्यांना
धन्यवाद अनिंद्य आणि सगळ्यांना. यावर्षी नियमांत बसवून काही नीट सुचत नव्हतं. शेवटी आज जमली लिहायला.
जबरदस्त
जबरदस्त
कोई तो छिलो. सोला.> कॅपग्रास
जबरदस्त !
कोई तो छिलो. सोला.> कॅपग्रास सिंड्रोम हा एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचा मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला असा तीव्र भ्रम होतो की त्यांच्या जवळच्या व्यक्तीची (जसे की पती, पत्नी, आई-वडील किंवा मित्र) जागा हुबेहूब दिसणाऱ्या दुसऱ्याच एखाद्या कपटी किंवा बनावट व्यक्तीने घेतली आहे.
पण इकडे वास्तवात असेच आहे ......नवरा वेगळा आहे
जबरदस्त! शेवटचा ट्विस्ट मस्त.
जबरदस्त!
शेवटचा ट्विस्ट मस्त.
कळली आता. सामी आभारी आहे.
कळली आता. सामी आभारी आहे.
भारी.
भारी.
जबरदस्त. सामी,धन्यवाद!
जबरदस्त.
सामी,धन्यवाद!
जबराट!
जबराट!
जशी आवडते तशी लिहायला यंदा अजिबात जमत न्हवती. तुला मस्तच जमली आहे, शशक हवी तर अशी!
सुरी का दिली? तो भाग नाही समजला.
सुरी>> imposter म्हणून त्याला
सुरी>> imposter म्हणून त्याला जखमी करून/घाबरवून तो कोण आहे ते वदवून घेणार होती.
Solid...
Solid...
संपूर्ण मोठ्या कथेच्या प्रतीक्षेत...
ओह्ह! 'दिसली' मी घाईत 'दिली'
ओह्ह! 'दिसली' मी घाईत 'दिली' वाचलं आणि गोंधळात पडलो.
मेक्स सेन्स!
भन्नाट!! शंभर शब्दांत किती
भन्नाट!! शंभर शब्दांत किती मोठं अवकाश निर्माण करता येतं!!
अर्रे ही सॉल्लिड जमली आहे !
अर्रे ही सॉल्लिड जमली आहे !
धन्यवाद
धन्यवाद
वेल, हो मोठी कथा लिहिण्याचा प्रयत्न आहे.
भारी.
भारी.
खतरनाक आहे.
खतरनाक आहे.
जबरदस्त!
जबरदस्त!
भारी झाली आहे कथा.
भारी झाली आहे कथा.
खास मॅगी टच!! मस्त जमलीये..
खास मॅगी टच!! मस्त जमलीये.. कॅपग्रास बद्दल गुगललं.. आणि संत्र पण सोललेलं मिळालं
सही!! शेवटच्या एका वाक्यात
सही!! शेवटच्या एका वाक्यात जबरदस्त कलाटणी..
वाह! मस्त twist आहे
वाह!
मस्त twist आहे