लेखनसुविधा

गाणीच गाणी...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2013 - 23:59

गाणीच गाणी...

छान छान गाणी गोड गोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी

वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी

पर्‍यांची गाणी जादू कहाणी
राजा-राणीची मजेची गाणी

पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी

बागेची गाणी झोपाळ्यावाणी
झूऽम झूऽप अवखळ गाणी

पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....

शब्दखुणा: 

मनातलं काही ..

Submitted by वेडसह्याद्रीचे on 4 April, 2013 - 01:52

आज पुन्हा पत्र लिहायला घेतोय , काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहावयास घेतले होते , आई विषयी ते पूर्ण झाले , तसं त्या पत्रात अजून बर्याच गोष्टी मांडायच्या होत्या पण त्या राहून गेल्या , असो ,
आज जे पत्र लिहिणार आहे , ते देखील एका खास व्यक्तीला अनुसरून आहे , जिच्या कडून मी जीवनाच्या , जीवना बद्दलच्या अनेक गोष्टी शिकलोय , अजूनही शिकतोय , कधी सहवासात तिच्या , तर कधी दूर राहून ....

प्रिय ..........

पत्र लिहिण्यास कारण असे काहीच नाही ............बस्स मनात आलं आणि लिहावयास घेतले ,

शब्दखुणा: 

माझी कार

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2013 - 01:05

माझी कार

कस्ली भारी माझी कार
झुईंऽऽ झूम्म.... रेसर कार

गाँऽ गाँऽ.... पळते कार
वळणे घेत सुसाट पार

समोर येताच कोणी पण
अस्सा मारतो मी पण टर्न

हॉर्न देत पाँ पाँ पाँ पाँ
बाजूला व्हा, बाजूला व्हा

बदल्तो गिअर्स खटाखट
स्पीड कंट्रोल फटाफट

"थांब रे जर्रा, कित्ती धावतोस ....
कस्ले कस्ले आवाज काढतोस ???"

"ओर्डू नकोस आई मला
तो बघ रोह्या पुढे गेला....."

मी नै ऐकत अज्जीबात
पुन्हा धावतो हे ज्जोरात

भूक लागता एक्दम
ब्रेक लागतात खचाक्कन

थांबते दमून माझी कार
पाणी पितो गारेगार..

शब्दखुणा: 

सत्संगती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 March, 2013 - 23:09

सत्संगती

श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||

न लगे जावया | अन्य पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||

व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||

अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||

लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||

(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

शब्दखुणा: 

धन्य तुका देखियला...

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2013 - 05:20

धन्य तुका देखियला...

लळा इतुका लागला
करमेना विठ्ठलासी
धाडी विमान देहूसी
राही आता वैकुंठासी

भक्ति-वैराग्याच्या खुणा
अंगी ठाकल्या रोकड्या
देव स्वर्गींचे धाऊनी
घाली तुम्हा पायघड्या

मूर्तिमंत ब्रह्मरस
तुम्हाआंगी सामावला
शब्द कल्लोळ तेजाचे
वाटे वेद मुखे आला

माय-मराठी आपुली
धन्य धन्य तुवा केली
जन्म घेऊ वारंवार
तुम्हा शब्दांचीच भुली

धन्य संताजी मैतर
गाथाशब्द स्थिर केला
धन्य महाराष्ट्र भूमि
धन्य तुका देखियला

बाळ गुणाचं....

Submitted by पुरंदरे शशांक on 24 March, 2013 - 23:13

बाळ गुणाचं....

चिटकु पिटकु ........ नक्टु नक्टु
जिभ्लु लाल लाल ........ चुटकु चुटकु

काय काय बघ्ता ...... टुक्कु टुक्कु
चाल चाल करा ....... लुट्टु लुट्टु

भुर्रऽ म्हण्ताच ...... चमकलं हासु
हातपाय हल्वत ..... कित्ती नाचू

म्मं म्मं म्हणताच ..... मिटकु मिटकु
डेरकं भरताच ....... डोळे मिट्टु

बाळ गुणाचं .... सोनाटक्कु
कित्ती गोग्गोड .... चिक्कु पिक्कु

शब्दखुणा: 

जरा दूर जाऊ

Submitted by जो_एस on 19 March, 2013 - 01:10

जरा दूर जाऊ जनां पासुनी
नशीबास ताडू दिवा घासुनी

चला हस्तरेषा नव्या काढुया
मिटाव्या कशा पण जुन्या घासुनी?

विरे आठवांचा मनोरा तशी
पुढे वाट लागे दिसाया सुनी

जगाचा कसा गूण छायेसही
मला टाळते ती तमी हासुनी

जरा सत्यवाचा कुणी बोलला
पहातात सारेच आवासुनी

कळे भांडणाऱ्यांस ना शेवटी
सुरूवात झाली कशा पासुनी

खरा तोच ठरतो जगाच्या मते
असत्यास सांगेल जो ठासुनी

असा दगड कोणी, न चिंता करा
बना देव, शेंदूर घ्या फासुनी

नसे देव होणे सुखाचे तसे
अधी लागते घ्यायला तासुनी

सुधीर

शब्दखुणा: 

लपाछपी

Submitted by पुरंदरे शशांक on 17 March, 2013 - 03:59

लपाछपी

चला चला खेळू या गं
लपाछपी तू गं मी गं

लपणार आधी मीच
लवकर डोळे मीट

पटापटा लपा लपा
शोधेन मी बाळ माझा

इथे नाही तिथे नाही
कुठे गेला बाई बाई

थकले मी शोधताना
कुठे गेला माझा कान्हा

हळुहळु पावलांनी
बाळ येई तो मागुनी

रेशमाचे मऊ हात
गळा गुंफितात गोफ

मांडीवरी बसे कान्हा
मैया मैया म्हणे पुन्हा

अवखळ कान्हा पाही
पूर यमुनेला येई

शब्दखुणा: 

गुत्ते पे गुत्ता - २

Submitted by बाबूराव on 17 March, 2013 - 00:13

मारत्या लै वाईट व्हता अशातला भाग बी नव्हता. कुटलाच दारुडा वाईट नसतु. कधि कधि त्यो सोत्ताच रडत बसायचा मीच वाइट म्हनुन. पन दारुड्याचि नाटकं म्हनुन कुनी त्येच्या भावना समजुन घ्यायाचं नाय. समद्याच दारुड्यांच असं व्हतंय. मन बी खातं, लाचारि बी असतिय , कळतं पन वळत नाय अशि अवस्था असतिय पन घरच्यांना हे कळत नाय. मंग याच्यावर येकच विलाज असतु. आपल्याच सारखं दुख्खी आत्मं शोधुन येक येक पेग लावायचं. येका दारुड्याचं दुख्ख दुस-यालाच समजु शकतं.

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा