बाबूराव गुत्ता दारूडा

गुत्ते पे गुत्ता - २

Submitted by बाबूराव on 17 March, 2013 - 00:13

मारत्या लै वाईट व्हता अशातला भाग बी नव्हता. कुटलाच दारुडा वाईट नसतु. कधि कधि त्यो सोत्ताच रडत बसायचा मीच वाइट म्हनुन. पन दारुड्याचि नाटकं म्हनुन कुनी त्येच्या भावना समजुन घ्यायाचं नाय. समद्याच दारुड्यांच असं व्हतंय. मन बी खातं, लाचारि बी असतिय , कळतं पन वळत नाय अशि अवस्था असतिय पन घरच्यांना हे कळत नाय. मंग याच्यावर येकच विलाज असतु. आपल्याच सारखं दुख्खी आत्मं शोधुन येक येक पेग लावायचं. येका दारुड्याचं दुख्ख दुस-यालाच समजु शकतं.

Subscribe to RSS - बाबूराव गुत्ता दारूडा