माझी कार

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2013 - 01:05

माझी कार

कस्ली भारी माझी कार
झुईंऽऽ झूम्म.... रेसर कार

गाँऽ गाँऽ.... पळते कार
वळणे घेत सुसाट पार

समोर येताच कोणी पण
अस्सा मारतो मी पण टर्न

हॉर्न देत पाँ पाँ पाँ पाँ
बाजूला व्हा, बाजूला व्हा

बदल्तो गिअर्स खटाखट
स्पीड कंट्रोल फटाफट

"थांब रे जर्रा, कित्ती धावतोस ....
कस्ले कस्ले आवाज काढतोस ???"

"ओर्डू नकोस आई मला
तो बघ रोह्या पुढे गेला....."

मी नै ऐकत अज्जीबात
पुन्हा धावतो हे ज्जोरात

भूक लागता एक्दम
ब्रेक लागतात खचाक्कन

थांबते दमून माझी कार
पाणी पितो गारेगार..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३-४ वर्षे वयाच्या मुलासाठी छान बालगीत आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------

फक्त ते 'बंड्या' हे जुने नाव, नव्या संदर्भातील कवितेत थोडे ऑड वाटते.
सँकी (संकेत), विकी (विक्रांत) अशासारखे काही असते तर अधिक ठीक वाटले असते.
वैम. कृगैन.

मस्त Happy

झकास! मज्जाच अगदी!

अहो काका माझ्या कार बद्द्ल पण लिहा नं!

" कार माझी लालेलाल.."

पुढ्ची ओळ तुम्हीच संगा नं काय असेल ती....!

-यक्ष

नवीन प्रतिसाद लिहा