लपाछपी

लपाछपी

Submitted by पुरंदरे शशांक on 17 March, 2013 - 03:59

लपाछपी

चला चला खेळू या गं
लपाछपी तू गं मी गं

लपणार आधी मीच
लवकर डोळे मीट

पटापटा लपा लपा
शोधेन मी बाळ माझा

इथे नाही तिथे नाही
कुठे गेला बाई बाई

थकले मी शोधताना
कुठे गेला माझा कान्हा

हळुहळु पावलांनी
बाळ येई तो मागुनी

रेशमाचे मऊ हात
गळा गुंफितात गोफ

मांडीवरी बसे कान्हा
मैया मैया म्हणे पुन्हा

अवखळ कान्हा पाही
पूर यमुनेला येई

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लपाछपी