माझी कार

माझी कार

Submitted by पुरंदरे शशांक on 1 April, 2013 - 01:05

माझी कार

कस्ली भारी माझी कार
झुईंऽऽ झूम्म.... रेसर कार

गाँऽ गाँऽ.... पळते कार
वळणे घेत सुसाट पार

समोर येताच कोणी पण
अस्सा मारतो मी पण टर्न

हॉर्न देत पाँ पाँ पाँ पाँ
बाजूला व्हा, बाजूला व्हा

बदल्तो गिअर्स खटाखट
स्पीड कंट्रोल फटाफट

"थांब रे जर्रा, कित्ती धावतोस ....
कस्ले कस्ले आवाज काढतोस ???"

"ओर्डू नकोस आई मला
तो बघ रोह्या पुढे गेला....."

मी नै ऐकत अज्जीबात
पुन्हा धावतो हे ज्जोरात

भूक लागता एक्दम
ब्रेक लागतात खचाक्कन

थांबते दमून माझी कार
पाणी पितो गारेगार..

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझी कार