गाणीच गाणी...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2013 - 23:59

गाणीच गाणी...

छान छान गाणी गोड गोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी

वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी

पर्‍यांची गाणी जादू कहाणी
राजा-राणीची मजेची गाणी

पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी

बागेची गाणी झोपाळ्यावाणी
झूऽम झूऽप अवखळ गाणी

पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लासच !!!
फार अवघड काम बालगीते लिहिणे म्हणजे
असे एखादेतरी बालगीत लिहावे आयुष्यात असे मला वाटते तुमची बालगीते वाचून

धन्यवाद शशांकजी अशा गाण्यांसाठी