बागकाम

बाटलीतलं झाड -भाग 3 (Growing edibles)

Submitted by अक्षता08 on 2 August, 2020 - 00:19

एखाद्या बाल्कनीमध्ये किंवा ग्रील मध्ये किचन गार्डन सुरू करणं म्हणजे थोड फार अवघड काम आहे कारण एकमेव "लिमिटेड स्पेस" (नाममात्र जागा). त्यामुळे horizontal space म्हणजेच आडवी जागा संपल्यावर पर्याय उरतो तो vertical space चा (उभी जागा) पुरेपूर वापर करण्याचा. आणि त्यात टाकाऊ बाटल्या ह्या खूप सहकार्य करतात.

विषय: 

घरच्या बागेत कमळाची लागवड कशी करावी?

Submitted by मी चिन्मयी on 29 July, 2020 - 03:21

चिपळूणला सासरी एक तलाव आहे. त्यात अत्यंत सुंदर अशी फिकट गुलाबी रंगाची कमळं फुलतात. त्यातले एक-दोन कांदे आणुन बागेत लावायचा विचार आहे. कुंडीत लावता येतील का? आणि काय काय तयारी लागेल? चिखलात लावायचे की स्वच्छ पाण्यात? कुणाच्या बागेत आहेत का?

विषय: 
शब्दखुणा: 

एन पी के

Submitted by सई केसकर on 28 July, 2020 - 01:06

माझ्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये खत घालायचे आहे.
काही झाडं आहेत ज्यांना फुलं येतच नाहीत. झाडं मात्र वाढताहेत.
सोनटक्का, एक गुलाबाचं झाड आहे आणि जुई. तर कुंडीत खत घालताना त्याचं डायल्युशन कसं करायचं?
मी एनपीके १९:१९:१९ असं मागवलं आहे. आणि गुलाबासाठी काहीतरी फ्लॉवरिंग बूस्टर का काय.
माझ्या मते प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये पॅक्लोब्युट्राझोल वगैरे वापरतात नियमित. पण तो पुढचा प्रश्न आहे. आधी खत कसं घालावं याबद्दल सल्ला हवा आहे.

विषय: 

Admiring beauties - गोकर्ण आणि गणेशवेल

Submitted by अक्षता08 on 19 July, 2020 - 01:07

आपण नर्सरीमध्ये जातो. आपल्याला सुंदर फुलझाडं दिसतात आणि आपण त्यांना घरी आणतो. त्यातली काही seasonal flowering plants असतात म्हणजेच वर्षातला काही काळच त्यांना फूलं येतात, काहींची बरीच काळजी घ्यावी लागते तर काही अचानक कोमेजून जातात. पण, काही अशीही फुलझाडं आहेत जी वर्षभर फुलतात काही काळजी न घेता. त्यातली दोन फुलझाडं म्हणजेच गोकर्ण आणि गणेश वेल.

विषय: 

Indoor झाडं

Submitted by अक्षता08 on 5 July, 2020 - 01:15

Indoor आणि Outdoor झाडं ह्यांच वर्गीकरण मुख्यत्वे त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या गरजेवरून होतं. ज्या झाडांना प्रखर सूर्यप्रकाशाची (direct sunlight) गरज नाही ती झाडं आपण घरातीही लावू शकतो. जर आपण निसर्गाजवळ जाऊ शकत नाही तर किमान या काँक्रिटच्या (concrete) जंगलात आपल्या घरातला छोटासा कोपरा हिरव्या सजीवांना नक्कीच देऊ शकतो. ज्यात फायदाही आपलाच आहे. Indoor झाडं म्हणजे जी झाडं आपण घराच्या आत लावू शकतो. त्यातही खूप प्रकार आहेत (हवा शुद्ध करणारी झाडं, कीटक/ डास दूर ठेवणारी झाडं, इत्यादी). syngonium, cymbidium goeringii, eranthemum pulchellum ही झाडं काळजी घेण्यास अगदी सोप्पी आहेत.

विषय: 

Container gardening- लेट्यूस

Submitted by अक्षता08 on 28 June, 2020 - 01:32

लेट्यूस हे जरी पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीरीसारखी रोज लागणारी गोष्ट नसली तरी सध्या ह्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. Burgers आणि salads मध्ये हे नसलं तर काहीतरी कमतरता नक्कीच जाणवते (निदान मला तरी...!). तर, हेच लेट्यूस आपण घरी देखील लावू शकतो. पुदिना, कोथिंबीर इतक लावायला सोप्पं जरी नसलं तरी अगदीच अवघडही नाही.

विषय: 

Container gardening - कोथिंबीर

Submitted by अक्षता08 on 21 June, 2020 - 01:39

कोथिंबीर घरी लावताना बागकामाची खूप कमी माहिती असूनसुद्धा आपण यशस्वीपणे कोथिंबीर लावू शकतो. कोथिंबिरीची मुळं जास्त खोलवर जात नसल्यामुळे उथळ व पसरट कुंडी घ्यावी. कोथिंबीरीच्या बिया/ धणे घरी उपलब्ध असतील तर ते वापरू शकतो किंवा नर्सरीमध्येही कोथिंबिरीच्या बिया /धणे मिळतात (त्यांचा germination rate जास्त असतो). कोथिंबीरीसाठी माती तयार करताना माती,कोकोपीट आणि शेणखत ह्यांचे (५०:२५:२५) असे प्रमाण घ्यावे. परंतु, फक्त मातीत सुद्धा कोथिंबीर चांगल्या प्रकारे लागते. धणे घेताना ते थोडे भरडून घ्यावे म्हणजेच एका धण्याचे दोन भाग करून घ्यावे. व तसेच मातीत पेरावे किंवा १-२ तास पाण्यात ठेवून मग मातीत पेरावे.

विषय: 

थीम गार्डन्स, परसदारची बाग, घरातील बाग, भाजीपाला उगवणे - युट्युब चॅनेल्स

Submitted by मामी on 19 June, 2020 - 06:02

या धाग्यावर बाग फुलवणे आणि जोपासणे, गार्डन इम्प्रुवमेंट, घरच्या घरी भाज्या फळे उगवणे विषयावरील व्हिडिओज इ. शेअर करूयात.

विषय: 

Budget Gardening - अंडे का फंडा

Submitted by अक्षता08 on 14 June, 2020 - 00:54

जेव्हा आपण एखाद्या झाडाची/रोपट्याची सुरुवात बी पासून करतो तेव्हा आपण बी एकदम कुंडीत न पेरता छोट्याशा seedling tray मध्ये लावतो. seedling tray मध्ये "बी" चा germination rate जास्त असतो. अंड्याचे कवच (egg shell) हे seedling tray च घरगुती आणि स्वस्त स्वरूप आहे. एकदा "बी" ला अंकुर फुटुन true leaves दिसले की ते आपण ज्या कुंडीत रोपट लावायचं आहे त्यामध्ये (अंड्याच्या कवचासकट) लावू शकतो.
ह्याच बरोबर, वापरून झालेल अंड्याच कवच टाकून न देता ते १-२ दिवस उन्हात ठेवून त्याचा चुरा करून आपण मातीत एकत्र करू शकतो. ह्याचा मला खूप चांगला असा फरक दिसून आला नाही परंतु वाईट फरकही दिसला नाही

विषय: 

घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या

Submitted by हस्तर on 10 June, 2020 - 11:21

घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या
एकटे राहणाऱ्या आणि खास करून पुरुष माणसाने खोली मध्ये मध्ये काय काय फळे किंवा भाज्या लावता येईल ?
मला काही माहीत आहे जसे
गाजर ,कडीपत्ता, लिंबू, मिरची आल, कोथींबीर, पुदिना,टोमॅटो

ह्यातील कुंडीशिवाय कोणती लागवड करता येते ?
नेहमी उपयोगी पडणारे लागवड कोणते ?

Pages

Subscribe to RSS - बागकाम