Pudina (पुदीना)- a plant to start kitchen gardening

Submitted by अक्षता08 on 8 March, 2020 - 00:29

एका संध्याकाळी बाल्कनीमध्ये चहा पीत असताना अचानक विचार आला. आपण का म्हणून balcony/kitchen garden सुरु करु नये ?
पण ज्या गोष्टीत आपल्याला शुन्य अनुभव किंवा माहिती आहे त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ?
मग videos बघुन, blogs आणि पूस्तकं वाचून
प्राथमिक माहिती मिळाली.
पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत पूस्तकी ज्ञान (therotical knowledge) उपयोगी नाही.
तर, शेवटी पुदीना लावायच ठरलं
पण पुदीनाच का?
ज्यांना बागकामामधला काही अनुभव नाही ते ही पुदीना लावुन, जगवुन वाढवु शकतात म्हणुन.

फक्त पुदीना लावताना घ्यावयाची काळजी ही की
त्यांना सुर्यप्रकाशाची गरज असते पण उन्हाळ्यात ज्या वेळेस सुर्याची प्रखरता खुप असते तेव्हा मात्र त्यांना थोड्या आडोश्याच्या जागी ठेवावे.पुदीन्याला खत दिले नाही तरी चालण्यासारखे आहे परंतु १५ दिवसांमधुन एकदा खत दयावे.

पुदीना लावण्याच्या दोन पध्दती आहेत.
१.पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे.
२. ४५° मध्ये कापलेल्या काड्या एका कुंडीत लावाव्या. साधारणतः १०-१५ दिवसात नवीन पानं यायला सुरुवात होते.

आपण लावलेल्या रोपाला/झाडाला जेव्हा नवीन पालवी फुटते/नवीन पानं येतात; ते बघण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कशात नाही

WhatsApp Image 2020-03-08 at 10.55.37 AM.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पुदिना फार जलद वाढणारी वनस्पती आहे. जमिनीवर लावली तर खूप पसरते. फेसबूकवर गच्चीवरची बाग हा गृप छान आहे. तसेच एसव्हीएस सीडस् ह्या गृपवर मोफत फुलझाडे, शोभेची झाडे, औषधी वनस्पती यांच्या बिया, कंद, फांद्या मिळतात. आपल्या कडील देऊन बदल्यात पण मिळतात. संजय नरोटे, श्रृती ओझा हे संस्थापक/अॅडमीन आहेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! Happy
(@Shraddha, कनिका, BLACKCAT, Srd)

@परशुराम परांजपे
सहमत !(पुदिना फार जलद वाढणारी वनस्पती आहे. जमिनीवर लावली तर खूप पसरते)
मी नक्की भेट देइन Facebook page la
माहिती बद्दल धन्यवाद !!

@अश्विनी के
पुदीन्याचे cuttings उथळ व पसरट कुंडीत लावुन बघेन
Thanks for suggestion !!

>>पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे.
२. ४५° मध्ये कापलेल्या काड्या एका कुंडीत लावाव्या. साधारणतः १०-१५ दिवसात नवीन पानं यायला सुरुवात होते.

या प्रकारे बेसिलही छान होतो घरी.

@सामो
सहमत !
परंतु तो कुंडीत लावला तर पसरण्याची/फोफावण्याची भिती नाही

@वर्षा
मी Greek Basil च्या बीया लावल्या होत्या. परंतु रोपट तग धरत नव्हत.
मी cutting लावुन बघेन
माहिती बद्दल धन्यवाद !

यूट्यूबवर मातीविरहीत पुदीना आणि कोथिंबीर उत्पादनाचे दोन मस्त व्हिडिओ मिळाले.
पुदीना
https://www.youtube.com/watch?v=dmjXzq-DGNk
कोथिंबीर
https://www.youtube.com/watch?v=_qpuQ87Oxtg

छान माहिती.
मी एकदा बाजारातून पुदिन्याची जुडी आणली होती. त्यातल्या एक-दोन काड्यांना किंचित मुळं असलेली दिसली. सहज एका कुंडीत त्या काड्या खोचल्या. तो पुदिना आता चांगला रुजलाय. Happy

@ललिता-प्रीति

मी पहिल्यांदी पुदीना लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयोग फसला.
नंतर परत काड्या लावल्या तेव्हा रुजला आणि आता चांगला वाढत आहे!

@वर्षा
हे करुन बघायला हरकत नाही
धन्यवाद !

काल बाजारातून आलेली पुदीना जुडीपैकी १० काड्या ४५° मध्ये कापून पाण्यात घातल्या तर आज त्यातील अर्ध्याहुन जास्त काड्या ज्या काल उथळ भांड्यात असल्याने पाण्यात गपगुमान पडून होत्या त्या आज सकाळी मोडेन पण वाकणार नाही स्टाइल मध्ये किमान इंचभर तरी सरळ ९०° मध्ये उभ्या राहिल्यात. बहुतेक त्याना मुळे फुटण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने असेल हे !

मीही एका मोठ्या पसरट कुंडीत बाजारातून आणलेल्या पुदीना च्या काड्या पाने काढून घेऊन लावल्या होत्या. त्यातल्या 2-3 च काड्याना पाने आली व पूर्ण कुंडीभरून फोफावल्या .
ती पुदिन्याची पाने मी बरेचदा स्वयंपाकात वापरली.
त्यानंतर मी थोडा मूर्खपणा केला. एक छोटा कोंब आलेला आल्याचा तुकडा फेकून देण्याऐवजी पुदिन्याची कुंडी बरीच रुंद असल्याकारणाने त्याच कुंडीत घाई घाईत कोपर्यात पुरला. नंतर काही दिवसानी पाहिलं (आठवण आली तेव्हा) तर आल्याने हातपाय पसरले होते व पुदीन्याने काही दिवसात मान टाकलेली . आत्ता नवीन पुदिन्याच्या काड्या नवीन कुंडीत लावल्यात.

कुंडीत पुदीना लावणे व त्याची हवी तेवढीच पाने खुडणे मला बरच सोयिस्कर वाटते कारण बाजारातून आणलेला पुदिन्याची जूडी एकदम वापरली जात नाही (माझ्यासारख्या कधीतरी स्वयंपाक करणार्यांसाठी ) व मला पाने सुटी करायला सुद्धा वेल लागतो

@MeghaSK
एखाद झाडं मरतं तेव्हा जीवाला लागत.

सहमत !!
(कुंडीत पुदीना लावणे व त्याची हवी तेवढीच पाने खुडणे मला बरच सोयिस्कर वाटते कारण बाजारातून आणलेला पुदिन्याची जूडी एकदम वापरली जात नाही )

@अज्ञानी
होय !!
म्हणजे अजून ७-८ दिवसात नविन पानही येतील

पुदिना पाण्यात चांगला वाढतो. पाण्यातून कुंडीत शिफ्ट केल्यावर माझा पुदिना खराब झाला होता. कदाचित तो पॉटमिक्सचा प्रॉब्लेम होता.

पाण्यातून कुंडीत शिफ्ट केल्यावर माझा पुदिना खराब झाला होता. >> मातीत शिफ्ट केले की मलाही पाण्याच्या ५० टक्के सर्व्हायवल मिळाले. बहुतेक जमिनीची आर्द्रता किती असावी ह्यावर थोड़े कन्फ्यूजन होते मनात म्हणून घडले असेल. नंतर मात्र मस्त चिखल केला तेव्हा सर्व फांद्या तजेलदार झाल्या आणि पुढे ३ दिवसात वाढीचा छान जोर धरलाय. मातीमध्ये ५० टक्के भाग घरगुती कंपोस्टचा घातलाय.