मलबेरी / तुती/ शहतूत ह्याची फळे कशी प्रिझर्व करावीत?
Submitted by sneha1 on 8 April, 2020 - 21:14
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. घरच्या मलबेरी च्या झाडाची फळे आता काही दिवसात पिकतील. ती कशी टिकवता येतील? माझ्याकडे dehydrator नाही आणि घरात अजून एक उपकरण वाढवायचे नाही. नेटवर ओव्हन मधे सुकवण्याबद्दल वाचले काही ठिकाणी, पण ती खूप वेळाची प्रक्रिया वाटली. उन्हामधे वाळवता येतील का? नवरा म्हणतो की पिकलेल्या रसाळ फळांपेक्षा थोडी आंबट फळे सुकवणे सोपे जाईल. नेट वर काही रेसिपीज दिसल्या पण सगळ्या गोडच होत्या.
शब्दखुणा: