फुलझाडं (Nature's Beauty)

Submitted by अक्षता08 on 4 April, 2020 - 23:30

बागकामाची किंवा झाडांची कुणाला आवड असो वा नसो परंतु फुलझाडं किंवा फुलांची आवड नसणाऱ्या व्यक्ती तुरळकच.
फुलांचे विविध प्रकार आहेत.काही फुले फक्त शोभेची असतात तर काहींचा गंध अगदी सुरेख असतो, काहींचा उपयोग खाण्यासाठी केला जातो तर काहींचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
फुलं कोणत्याही प्रकारची असो ते आपलं मन प्रसन्न करण्याच काम नक्कीच करतात.
सकाळी उठल्या उठल्या जर आपल्याला उमललेले फूल दिसलं तर दिवसाची सुरुवात नक्कीच चांगली होते. Quarantine च्या काळात जेव्हा घरी राहुन कंटाळा आलेला आहे तेव्हा ही गोष्ट नक्कीच जाणवते, ह्यांना फुलताना किंवा उमलताना बघून मनाची मरगळ‌ काही अंशी तरी नक्कीच कमी होते.
जर एखाद्या फुलझाडाची सुरुवात आपण बी पासून केली असेल आणि फुलं उमलण्याची वाट आपण महिनोन महिने बघितली असेल तेव्हा ते फूल उमलताना बघण्यात जे सुख आहे ते कशातच नाही.
त्यामुळेच कुणाला बागकामाची आवड नसली तरी घरी एक तरी फुलझाड किंवा तुळस असायलाच हवी. झाडांची काळजी ही प्रत्येक फूलागणीक बदलते. परंतु, चांगला बहर येण्यासाठी calcium water १५-२० दिवसातून एकदा द्यावे आणि त्यांच्या मातीमध्ये egg shells एकत्र करावे. फुलझाडांची काटछाट (pruning) सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
गोकर्ण सर्वात सोप्प फुल आहे म्हणजे त्याची तितकीशी काळजी घ्यावी लागत नाही आणि ह्याच उलट जास्वंद, मोगरा, गुलाब यांची बर्‍यापैकी काळजी घ्यावी लागते.

ही बहुरंगी, बहुढंगी फुल प्रत्येकालाच एक सुखद आनंद देऊन जातात

PicsArt_04-04-01.41.45.jpgPicsArt_04-04-01.45.12.jpgPicsArt_04-04-01.52.31.jpgPicsArt_04-04-01.54.49.jpgPicsArt_04-04-02.00.40.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अक्षता मस्तच.
सदाफुलीच्या पाकळ्यांचा आकार काय सुंदर असतो.

@Srd, @मन्या ऽ
धन्यवाद ! Happy

@मी चिन्मयी
किती मस्त दिसत आहे.... Happy

@ssj
किती सुंदर फुलली आहे बाग Happy

@वर्षा

हो. खरच
मला सदाफुली underrated वाटते.

छान लेख..सगळ्यांची फुलं पण छान..
IMG_20210328_122142.JPG
मी हे रोप नर्सरीतून आणलेले.नाव माहिती नाही. कुणाला माहीत आहे का कोणती फुलं आहेत?
रोज सकाळी दहा बारा फुलं उगवतात आणि संध्याकाळी कोमेजतात...उठल्या नंतर फुललेली फुलं बघायला खरंच मस्त वाटते. Happy

Blue Daze
(Evolvus Glomeratus)
गुगल लेन्सचे उत्तर.

अक्षता, तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट विचारायची होती. मी जेव्हा जेव्हा भरत बलवल्ली यांचे हे गाणे ऐकले आहे
https://youtu.be/A4jPW8SC2mw
तेव्हा तेव्हा प्रकर्षाने असे वाटले आहे की
आपण सुद्धा वैजयंती माळ घातली पाहिजे. अगदीच माळ नाही करता आली तरी घरात वैजयंती चे रोप लावावे, जेणेकरून त्याच्या बिया जतन करता येतील.
मी असे वाचले आहे की वैजयंती ही विठ्ठलाला, विष्णुला खूप आवडते. आणि वैजयंती माळ घालणे किंवा त्याच्या बिया घरात असणे हे खूपच शुभ आहे.
मी आत्तापर्यंत दोन जणांना विचारलं आहे की वैजयंती चे रोपटे कुठे मिळेल किंवा त्याच्या बिया देतील का कुणी? त्या पेरून बागेत लावायला... पण कुणालाही वैजयंती च माहिती नाहीये. काही काही जण तर तुळशीच्या माळेला वैजयंती ची माळ सांगून विकत आहेत.
तुम्हाला वैजयंती माहिती आहे का? कुठे मिळेल? तुमच्याकडे आहे का? तुम्ही यावर एक लेख लिहाला का?

वैजयंती माळेबद्दल मला इथे वाचून कळले. वैजयंती माळ कवड्यांच्या माळेसारखीच दिसते. आमच्या नातेवाईकांमधे एक आजी आहेत त्यांच्या गळ्यात तशी माळ मी पाहिली होती. आतापर्यंत मी ती कवड्यांचीच माळ समजत होते.

प्रगल्भ,
वैजयंती म्हणजे,
Coix lacryma
रानमका
Job's Tears
भीमाशंकर येथे याच्या माळा असतात विकायला, आणखीही बऱ्याच ठिकाणी असतील. माझ्या एका ओळखीच्या स्नेह्यां कडे विचारून पाहतो, बिया, मणी मिळतील बहुधा. विपु करा.

माझ्या एका ओळखीच्या स्नेह्यां कडे विचारून पाहतो, बिया, मणी मिळतील बहुधा. विपु करा. >>> धन्स ऋतुराज सर just now मी संपर्कातून मेल केलाय Happy