हळदी चे पान
हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.
हळदी ची कुंडीत लागवड,त्याच्या पानांन ची पाककृती,आयुर्वेदिक महत्व इत्यादि ची माहिती हवी आहे.
बुलबुल येती आमच्या घरा...
(The Bulbul Babies At Our Balcony)
(Red Vented Bulbul)
पर्यावरण हा एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे..... त्यावर निसर्गातील सहजीवन जीवन अवलंबून आहे..... आजच्या आपल्या जीवनशैलीमुळे सर्वच बाबीत समतोल बिघडत चालला आहे व त्याचे परिणाम सर्वत्र जाणवू लागले आहेत.... त्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण संवर्धनाचे पर्याय निवडले पाहिजेत, हे तर सर्वच सुजाण नागरिकांना पटत असते मात्र नकी काय करायचे ह्याची माहिती व शास्त्र शुद्ध ज्ञान बरेचदा नसते. इच्छा शक्ती उत्तम असली तरी योग्य माहितीच्या अभावाने उचित कार्य घडत नाही व हताश उद्गार काढून हे विषय काळाच्या ओघात विस्मरणात जातात. ह्यासाठी आधी निसर्गाच्याच आपल्या छोट्या मित्रांची थोडी ओळख करून घेवूया.
कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?
ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.
मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.
वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.
बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.
परागिभवनात मदत करणार्या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides
घर असावे घरासारखे - भाग २ - केनया
केनया मधे मी एकंदर पाच घरात राहिलो ... शिवाय अनेक हॉटेल्स मधेही राहिलो, पण तो या मालिकेचा भाग नाही.
४) सामत सोजपार हाऊस, किसुमू - साल १९९३
लग्न होऊन केनयात गेल्यावर आम्ही या घरात राहिलो. दुसर्या मजल्यावरचा ३ बेडरुम्स, दोन किचन्स, ३ टॉयलेट्स सिंटींग रुम, डायनिंग रुम, स्टोअर रुम.. असला अवाढव्य फ्लॅट होता तो. दुसर्याच मजल्यावर होता तरी
तळमजल्यावर एक गोदाम होते आणि त्याची उंची बरीच असल्याने, घरी जाण्यासाठी बरेच जिने चढावे लागायचे.
अगदी मोजक्याच भांड्यांनी आणि वाणसामानानी सुरु केलेला संसार मी दोन महिन्यातच भरपूर वाढवला होता.
एक कळी उमलतानां..... :
घराच्या बाल्कनीत झाडं लावताना ती देशी असावीत किंवा निदान इथे रूळलेली असावीत अशी इच्छा होती.
कारण ही घरची बाग पक्षी, फुलपाखरं, विविध प्रकारच्या माश्या, किटक यांना आकर्षित करणारी, त्यांना काहीतरी देणारी असावी अशी संकल्पना होती.
फुलपाखरं, छोटे पक्षी आणि मुंग्यांना आकर्षित करणारं झाड म्हणून पावडर पफ लावलं.
3 फुटाची फांदी होती. एकही कळी नव्हती.
पहिल्या 15, 20 दिवसात तर त्याला कुठेही पालवी पण नाही फुटली. रुजल्याचं एकही लक्षण दिसत नव्हत.
हळुहळु मुख्य खोड सोडून बाकीच्या फांद्याना पालवी फुटु लागली. आणि त्यानंतर महिन्याभरानी चक्क एक इवलुशी कळी नवीन फुटलेल्या फांदीवर दिसली. दिसामाजी तिचा आकार वाढु लागला. तिच्या मागेमागे आणि आजूबाजूला छोट्या छोट्या जोडीदारीणीही दिसु लागल्या.
01 पहिली कळी....
मग तिची रोज खबरबात ठेवणं हा अॅडिशनल कामधंदा होउन बसला...
02... कळी उमलायची सुरूवात...
गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिंपी पक्षाने सोनटक्क्याच्या झाडात पानं शिवून घरटं केलं आहे.
रचना इतकी सुंदर आहे की पावसाचं पाणी आत जात नाही.
आतुन कापसाचं मऊ कोटिंग आहे
ते घरटं पानांमध्ये इतकं बेमालूम केलेलं असतं की पटकन कळत नाही
पुढच्या डेव्हलेपमेंटचे फोटो परत टाकीन
असा पोटुशी पाऊस
शोधे मायेच अंगण
तिच्या लेकरांची दाटी
तिथे तिचं माहेरपण
तिच्या येण्याने अंगण
पुन्हा झाले लेकुरवाळे
इवल्या तृणांच्या पायी
साजे थेंबाचे गं वाळे
थेंबा थेंबांनी ती पापे
घेते मुक्या लेकारांचे
त्या लेकरांच्या कुशीत
गाती थवे पाखरांचे
आली माहेरवाशिण
तीच लिंबलोण करा
तिची वृक्षलतावल्ली
त्यांच लाडंगोडं करा
चारमासाची पाहुणी
पुन्हा जाईल सासुरा
तिच्या लेकरांची तिने
तुझ्या हाती दिली धुरा