Succulents & hoya (सक्युलेंट्स आणि होया)

Submitted by अक्षता08 on 1 March, 2020 - 09:14

मला succulents हा प्रकार फार प्रीय आहे.
एक तर त्यांना पाण्याची जास्त गरज लागत नाही. म्हणजेच, रोज पाणी घालण्याची चिंता नाही.आणि दूसर म्हणजे ते इतके गोंडस असतात की ते घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवल्यावर घराची शोभा वाढवतात.

तर, succulents म्हणजे नक्की काय ?
succulents हा झाडांचा असा वर्ग आहे ज्यांना भरपुर सुर्यप्रकाश आणि खुप कमी पाण्याची आवश्यकता असते. प्रामुख्याने वाळवंटात व कमी पाण्याच्या प्रदेशात हे बघायला मिळतात.

बरेचसे Succulents हे hoya मध्येही बघायला मिळतात. म्हणजेच त्यांच्या खोड/पानांमध्ये पाणी साठवुन ठेवण्याची क्षमता असते. परंतु, सगळेच hoya हे succulents ह्या र्वगात येत नाही.

हया वर्गातील झाडांचे खोड वा पानं जाड असतात.ते पाणी साठवुन ठेवण्याचे काम करतात.
आधी सांगीतल्याप्रमाणे ह्यांना पाण्याची कमी गरज लागते‌ त्यामुळे माती पुर्ण कोरडी झाल्यावरच पाणी घालावे (साधारणतः ५-६ दिवसातुन एकदा पाणी घालावे) व अशा जागी ठेवावे जिथे भरपुर आणि थेट सुर्यप्रकाश (direct sunlight) मिळेल.१५-२० दिवसातुन एकदा खत दयावे.

ह्या झाडांची काळजी घेण अगदी सोप्प आहे. त्यामुळे ज्यांना झाडांची आवड आहे पण त्यांची निगा राखण्याचा ‌वेळ नाही त्यांच्यासाठी succulents हा उत्तम पर्याय आहे.

IMG20200202083309_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सध्या आमच्याकड़े succulents चा एकमेव प्रकार आहे. आणि त्या वनस्पतीवर माझे खूप म्हणजे खूपच प्रेम जडलेय. नुसत्या रूपावरच नाही तर गुणांवर.
मिस अलो वेरा.. आपल्या कोरफड ताई Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

@आर्यन वाळुंज होय खर आहे. इतरांच्या तुलनेने ही जरा महाग असतात(अपवाद - कोरफड). कारण succulents नर्सरी मध्ये बाहेरुन मागवली जातात.

@मनिम्याऊ हो माझीही कोरफड फार प्रीय आहे

प्रत्येक प्रकाराबद्दल फोटोनिशी लिहावे. सर्वसाधारण किंमत ( माहिती असल्यास) लिहा. धन्यवाद.

Akshay छान आहे धागा
प्रत्येक प्रकाराबद्दल फोटोनिशी लिहावे. सर्वसाधारण किंमत ( माहिती असल्यास) लिहा. >>>> सहमत

@आर्यन वाळुंज,
@ऋतुराज ~धन्यवाद !!
(खालील किंमती approximate आहेत. Online घ्यायच झाल तर succulents ची किंमत २५०-३००₹ आहे )
१.कोरफड सर्वात स्वस्त आहे (४०₹-५०₹)
२. होया - १००₹
३. Succulents - १५०₹ (ह्याचा फोटो वरील लेखात आहे)

इथे photo attach नाही होत आहेत (मायबोली वर नवीन असलयाने अजुन बरेच features माहित नाही)

@आर्यन वाळुंज,
@ऋतुराज ~धन्यवाद !!
(खालील किंमती approximate आहेत. Online घ्यायच झाल तर succulents ची किंमत २५०-३००₹ आहे )
१.कोरफड सर्वात स्वस्त आहे (४०₹-५०₹)
२. होया - १००₹
३. Succulents - १५०₹ (ह्याचा फोटो वरील लेखात आहे)

इथे photo attach नाही होत आहेत (मायबोली वर नवीन असलयाने अजुन बरेच features माहित नाही)