लता-वेली (Vines)

Submitted by अक्षता08 on 18 April, 2020 - 23:48

वनस्पतींमधला सुंदर आणि आकर्षक प्रकार म्हणजे वेली.
वेली म्हणजे ज्या वनस्पती कोणत्याही गोष्टीचा आधार घेऊन वाढतात म्हणजेच त्यांचे खोड किंवा फांद्या मजबूत नसल्यामुळे त्या स्वबळावर वाढू शकत नाही आणि त्यांच्या याच वैशिष्ट्यामुळे आपण त्यांना ज्या जागी लावू त्या जागेला सुंदर बनवण्याचे काम नक्कीच त्या करतात.
आपण वेली हव्या त्या दिशेला वाढवु शकतो म्हणजेच उभ्या दिशेने (vertical travel) आणि आडव्या दिशेने (horizontal travel).
बऱ्याच प्रवेशद्वारांवर वेलींच्या सुंदर कमानी बघायला मिळतात. ते दृश्य नक्कीच विलोभनीय असतं (निदान मला तरी तसं भासतं). कमीत कमी जागेत जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करण्याच काम नक्कीच वेली करतात.
इमारतींमध्ये बाल्कनी railing आणि window (safety) grill इथे designing/decoration करण्यासाठी फार काही वाव नसतो. तिथे आपण ह्या वेली लावुन/सोडुन ती जागा नक्कीच सुंदर बनवु शकतो.
वेलींमध्ये सगळ्या विभागातील वनस्पतींचा समावेश होतो. म्हणजेच औषधी, फळझाडं, foliage, फुलझाडं.
तर, ह्या नाजूका (लता-वेली) नक्कीच जागेच सौंदर्य वृद्धिंगत करण्याचं काम करतात. आणि त्यांच सौंदर्य पाहून आणखी झाडं लावायची इच्छा होते

CollageMaker_20200418_220417220.jpgIMG20200418141907.jpgIMG20200418140822.jpgWhatsApp Image 2020-04-19 at 9.17.14 AM.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults