एक होता दगड! जाता जाता एका पांडूने पान खाऊन टाकली पिंक त्यावर! दगड हिरमुसला. कारण त्याच्यावर लालसर डाग पडला. बाकीचे दगड हासले. पांडू रोजच यायचा जायचा. रोज पिंका! कारण पांडूचे घर जिथे होते तिथून बरोब्बर पान थुंकायला येईल अशा ठिकाणी हे चार पाच दगड होते. वर्षभरात त्या दगडांचा म्हसोबा झाला.
आज तिथे जत्रा भरते.
पंचक्रोशीतले दगड मिरवत येतात. बायकांच्या अंगात येतं! व्यवसाय निघतात. फुगे, साखरफुटाणे, फुलाच्या वेण्या, बिड्या इत्यादी! आता कुणाची टपरी कुठे हे ठरले आहे तरी जागेवरून भांडतात.
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. वसंत चिंचाळकर यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रं 'सगे सोयरे' या पुस्तकात संकलित केली आहेत. यांपैकी काही शब्दचित्रं चरित्रात्मक आहेत. या व्यक्तींमध्ये वसंत सोमण, आलमेलकर, पद्मजा फेणाणी, उ. झाकीर हुसेन यांसारखे कलाकार आहेत, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. व्ही. गिरी यांसारखे राजकारणी आहेत, बाबा आमटे, डॉ. विकास महात्मे, गाडगेबाबा, शाहू महाराज आहेत. बापूंची कुटी आहे आणि पाऊस, उन्हाळाही आहे.
'सगे सोयरे' या नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकातील 'तुळसा काकी' हे शब्दचित्र..
२००५ च्या ऑगस्ट मध्ये उत्तर भारतातील एकवीस वर्षांच्या वास्तव्यानंतर घरी परततांना मनात आलेल्या भावना ,आलेले विचार पत्ररूपात मी शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रिय मुलीनो,
एका सुंदर पर्वाची इती---माझा मुजरा