गद्यलेखन

पाऊस - एक प्रियकर

Submitted by नीत्सुश on 28 February, 2013 - 07:12

Paus – ek priyakar…

Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..

Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara

Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava

Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

Submitted by सुज्ञ माणुस on 27 February, 2013 - 05:49

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.

गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.

शब्दखुणा: 

माझी पहिली डेट

Submitted by अपरिचित on 27 February, 2013 - 02:18

पुणे. मार्च २००७. शुक्रवार संध्याकाळ. वेळ ६-६:३० ची. नेहमीप्रमाणे नेहमीच्याच बालाजीनगर मधील नेट कँफ़ेत गेलो. नेहमीप्रमाणे १० मिनिटात मेल चेक केले. मी पाठवलेल्या नौकरीसाठीच्या अर्जाला कुठुन तरी उत्तर मिळाले असेल, अशी आशा असायची. उर्वरित ५० मिनिटे याहुसाठी राखीव ठेवलेले असायचे. याहुवर वेब कँमेरा लावुन देशी/परदेशी मित्र-मैत्रिणिसोबत गप्पा मारणे, ह्यातच इतका गुंग असाय़चो की, ओर्कुट किंवा मायस्पेस वगैरेकडे ढुंकुनसुद्धा बघत नव्हतो. मेल चेक केल्यानंतर याहु चँटला लाँगीन केले. कोण-कोण हजर आहे ह्यावर नजर भिरवली. होते तसे बरेचशे आँनलाईन. पण त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी मी नव्हतो आलो.

आमचें गोंय -समारोप -आजचा गोवा

Submitted by टीम गोवा on 25 February, 2013 - 18:05

मुलांना घरातील कामाचे पैसे...?

Submitted by मोहना on 25 February, 2013 - 16:44

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात घरात."

शब्दखुणा: 

शून्य प्रहर

Submitted by झुलेलाल on 21 February, 2013 - 23:07

पैसा आणि पोट...

रात्र चढलेली. मुंबई परतीच्या प्रवासाला लागलेली. सकाळी रेल्वेतून उतरणाऱ्या गर्दीचे लोंढे आता रेल्वेत चढण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेच्या तयारीत. मीही याच गर्दीतला एक. रांगेतून चालणाऱ्या, पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणाऱ्या मुंगीसारखा. पुढचा थबकला तर थबकायचं. नाही तर चालत राहायचं. आसपास काही वेगळं जाणवलं, तरी तिकडे बघायचं नाही..
कारण, वेळ नसतो. गाडी चुकली, तर पुढे बस चुकते. मग स्टॉपवर रखडावं लागतं. सगळंच वेळापत्रक कोलमडतं.
त्यापेक्षा, आसपास न बघितलेलंच बरं.

सिग्नल ची झांसीराणी....

Submitted by मी मी on 21 February, 2013 - 01:45

मला आठवतंय...फस्ट इयर चा शेवटचा पेपर होता त्या दिवशी..ताई घ्यायला आलेली..मी स्कुटी च्या मागल्या सीटवर बसून पेपर चेक करत होते (पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका बर का....नागपूर युनिवर्सिटी ला एकदा बदनामी चा डाग लागलेला असला तरी उत्तर पत्रिका नाही दिली आमची आम्हाला तपासायला त्यांनी कधी Wink आणि हो हि खंत नाही बर का...:D ) दोन सिग्नल पार करून तिसर्या कुठल्याश्या मोठ्या सिग्नल वर गाडी थांबली होती....तेवढ्यात सायकल वर एक मुलगी शेजारी आली अगदी त्वेषात येउन सायकल वरून उतरली....सायकल stand वर लावून झपाझ

आवाहन (कविता पाठवा) : कै. सुचेता जोशी स्मृतीप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा...

Submitted by अ. अ. जोशी on 20 February, 2013 - 23:45

नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४थे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास १५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन असे विषय गेले तीन वर्ष दिले होते.

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

Submitted by बावरा मन on 20 February, 2013 - 05:32

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन