१२ डिसेंबर २००८. फारसं काही घडलं नाही या दिवशी, पण मी 'उच्चशिक्षित' झालो.कसा झालो याची चर्चा करण्यात फारसा अर्थ नाही.मातापितरांच्या अपेक्षेपेक्षा खुपच शिकलो म्हणुन त्यांना आनंदाचं भरतं आलं.पण शाळेमधे 'पास' आणी 'नापास' यामधली 'वर घातला' ही एक स्थिती असते, तसं काहीसं feeling होत. ( माझ्या मते 'वर घातला' यासारखा दुसरा संतापजनक प्रकार नसेल.एक तर सन्मानानी पास तरी करा नाहीतर अपमानानी नापास तरी करा ! पण ' वर घातला' म्हणजे " आपण लावलेले दिवे बघता खर तर शाळेच्या दारात उभं रहायचीही आपली लायकी नाही...पण आपल्या आईबापांवर उपकार म्हणुन वर ढकलत आहोत.." ही मिठाची चोळणी फार वाईट.) त्यातच दैवयोगानी 'उच्चशिक्षित बेकार' होण्याची वेळ न येता एका company नी पोटापाण्याची सोय केली होती. त्यामुळे थोड्याच दिवसात मला आजुबाजुंनी 'लग्न...लग्न..कधी...विचार...." असले शब्द ऐकु येऊ लागले. कुठलीही जबाबदारी आणी खर्च नसल्यानी मी खाऊनपिऊन सुखात होतो. त्यामुळे हे भलतं लचांड मागे लचांड मागे लाऊन घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. मी सोयिस्करपणे दुर्लक्ष करत होतो.त्यातुन आमच्या मित्रांच्या group मधल्या आठ पैकी तिघांच लग्न झालेल असल्यामुळे ते अनुभव गाठीला होते. आता खर तर या तिन्ही लग्नांवर स्वतंत्र लेखमाला प्रसिध्द करता येईल. पण स्थळकाळाच भान ठेऊन 'थोडक्यात आणी महत्वाच' सांगतो. ( ही तिन्ही लग्न 'ताजी' असल्यामुळे नावं घेण्यात अर्थ नाही...)
यातला सगळ्यात जुना खेळाडु म्हणजे आमचा MBBS डॉक्टर. लहानपणापासुनच डॉक्टर व्हायचं याचं स्वप्न होत. पण आता मागे वळुन बघता असं लक्षात येत की त्याबरोबर जास्तीजास्त लफडी करणं हेही याचं ध्येय असावं. कारण आपल्या 'inning' ची सुरवात याने शाळेपसुनच केली. शाळा, ज्युनियर कॉलेज अशी मैदान गाजवत नंतर यानी medical college मधे 'चौकार षटकारांची' आताषबाजी केली.शेवटी एका station वर याची गाडी थांबली. अनेक 'अडीअडचणीं'वर मात करुन, 'प्रतिस्पर्धां'ना नामोहरम करत शेवटी यानी शर्यत जिंकली ! ( असं सांगतात की एकदा एका ट्रेकला गेला असताना हा girlfriend शी बोलायला range मिळते का ते बघण्यसाठी मोबाईल उंच हातात धरुन त्या दर्याखोर्यात भटकत होत...). पण लग्नाआधी बोलावताक्षणी कट्ट्यावर हजर होणारा हा, आता फोन केल्यावर दबक्या आवाजात "अरे नको..आज जमणार नाही' हे एकच वाक्य कसबस बोलुन फोन खाली ठेवतो.एक पान खाण्यासाठीही बायकोकडुन परवानगी काढावी लागते अस म्हणतात. (दारुसाठी तर घरात एक आठवडा स्वयंपाक आणी धुणीभांडी करावी लागतात असं बोललं जातं..) चुकुन बाहेर पडलाच तर "येताना हॉलमधे ठेवायला फुलांचा गुच्छ घेऊन ये..." असले फोन येतात आणी टपरी वरच्या अण्णाला फुलचंद लावायची order द्यायची सवय असलेल्या तोंडानी हा फुलवाल्याला फुलांची order देतो.त्यामुळे बायको माहेरी बाहेरगावी गेली की हा पुण्यात उधळलेल्या सांडासारखा मोकाट भटकत असतो.
दुसरा BAMS डॉक्टर. याच्या आधीच्या २१ पिढ्या शुक्रवार पेठेत गेल्या आणी पुढचा २१ जाण्याचीही दाट शक्यता आहे.BAMS झाल्यावर पुणेरी परंपरेला स्मरुन याने ९:३० ते १२ clinic , १२ ते १ जेवण, १ ते ४ वामकुक्षी आणी संध्याकाळी कट्टा असा धंदा सुरु केला. पहिल्यापासुनच मुलींच्या बाबतीत स्वतःला कार्तिकेयाचा अवतार समजुन लफड्यांमधे कार्यरत असणार्या आमच्या इतर मित्रांना उपदेशाचे डोस पाजणे, येता जाता घालुन पाडुन बोलणे, 'गेला असेल duty वर' अशी जहरी टीका करणे असले पेठी धंदे केले. त्यामुळे याचं लफडं बाहेर आल्यावर, 'याने पोरगी पटवली' यावर आमच्यातल्या एकानीही प्राण गेला तरी विश्वास ठेवला नाही. उलट 'पोरीनी याला पटवला' हेच जहाल सत्य आम्ही स्विकारल आहे. अशा दगडाला प्रेमात पडायला लावणारी ही मुलगी आमच्या मते झाशीची राणी, इंदिरा गांधी इत्यादींच्या पंक्तीला जाऊन बसते आणी तिचा शनिपारावर जाहीर सत्कार करण्यात यावा अशी सुचना मी लवकरच मांडणार आहे. पण लग्नानंतर याची अवस्था दरवेशाकडच्या माकडासारखी झाली आहे.दोन दोन दवाखाने, दुपारची झोप बंद, रात्री ९ च्या आत घरात असे हलाखीचे दिवस आले आहेत. कट्ट्याच नाव काढताच उपाशी रहावं लागतं असही कळल आहे.कुत्राचा मालक जसा काही काळ कुत्र्याला पट्टा काढुन मोकळा सोडतो तस याला दिवसा कामासाठी मोकळं सोडलं जातं. बायकोच माहेरही पुण्यातच असल्यामुळे MBBS डॉक्टरच्या नशिबातल दुर्मिळ स्वातंत्र्यही याच्या नशिबात नाही. हे सगळे त्याने आधी केलेल्या वाचाळपणाचे भोग आहेत अस लोक सांगतात.
तिसरा MBA. (हा MBA आहे असच सगळीकडे माहिती आहे. कारण त्याआधी त्यानी केलेल्या डिग्रीला फारसा अर्थ नाही...).पोरीबाळींच्या मागे शेपुट हलवत हिंडण्याची याची सवयही शाळेच्या दिससांपासुन होती. २१ वय उलटल्यावर हा कुठल्याहीक्षणी लफड जाहीर करुन लग्नाची घोषणा करेल अशी परिस्थिती होती. पण नंतर हा अचानक MBA झाला..MBA झाल्यावर आपल्याला जगातल्या सर्व गोष्टींबद्द्ल सगळं काही कळतं असा एक गैरसमज निर्माण होतो हे माहित होत पण माणुसच बदलतो हे पहिल्यांदाच बघत होतो. कारण त्यानंतर त्यानी एकदम नांगी टाकली आणी वधुवरसुचक मंडळात नाव घालणे, पत्रिका बघणे, चहापोहे चरणे असले सोपस्कार करुन लग्न केल. लग्नानंतर १५ मिनिट कोपर्यावर जायलाही परवानगी काढावी लागते असं कळलं आहे.
तर हे असं सगळ असल्यामुळे 'लग्नाच काय?' असा थेट प्रश्न आईनी विचारल्यावर विचारत पडलो. बराच विचार करुन 'लग्न का करायच नाही ? ' या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न सापडल्याने 'चालेल..' अस आईला सांगितल. पडत्या फळाची आज्ञा समजुन ती कामाला लागली. मी हो म्हटल खरं, पण पुढे काय वाढुन ठेवल आहे याची खरच कल्पना नव्हती.
यानंतर विविध ठिकाणी नाव नोंदवणे, स्थळांची online आणी offline चाळणी करणे वगैरे काम सुरु झाली. एकतर बहुसंख्य profiles ही आईवडिलांनी तयार केलेली असल्यामुळे त्यात दिलेल्या अपेक्षा मुलीच्या आहेत की आईवडिलांच्या हे कळायला मार्ग नसतो. बरीच profiles बघितल्यावर आईवडिलांच्या ( किंवा मुलीच्या ...) मते साधारणपणे " मुलगा शांत, मनमिळऊ, नम्र, आज्ञाधारक, निर्व्यसनी, सरळमार्गी, IT वाला, पगारदार, विश्वासु, social, friendly, humorous, well settled, well educated, smart , simple, confident, positive, independent, fun loving, warm hearted ('hearted' असा शब्दही असतो हेही या निमित्तानी कळल !!) ,caring, intelligent, ambitious, well-cultured, considerate, supportive, articulate, down to earth" असावा असं लक्षात आलं ! आता एवढ्या अपेक्षा आमच्या वडिलांनीही कधी आमच्या कडुन ठेवल्या नाहीत. (अर्थात त्यांनी कुठल्याही अपेक्षा ठेवणं, आमचे पाय पाळण्यात दिसले तेव्हाच सोडुन दिलं होतं.) एका profile मधे तर मुलगा 'dashing' असला पाहिजे अशी अपेक्षा होती. आता 'dashing' म्हणजे 'किमान रस्त्यावर मारामारी करता आली पहिजे' , 'विमानातुन parachute नी उडी मारणं जमलं पहिजे, कमितकमी कराटे black belt हवा असं अपेक्षित होत का ते महित नाही. एकीच्या आईनी फोनवरच 'आम्हाला hi-fi मुलगा पहिजे' असं सांगुन टाकलं ! एकीने आपल्या profile मधे 'I am not Angelina Jolie, so you need not to be Brad Pitt !' असा प्रामाणीक कबुलीजबाब दिला होता. एक दोघींनी तर job साठी पाठवला जाणारा resume च लग्नाचा profile म्हणुन पाठवला होता (त्यामधे १० वी पासुनचे marks दिलेले होते. ते बघुन कोण त्यांना response देईल याची मला आजही काळजी लागुन रहिलेली आहे...). हे सोडुन, phone/email ला उत्तर न देणे, आपल्याला आवडलेल्या मुलींनी आपल्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवणे आणी न पसंत पडलेल्या मुलींच्या पालकांचे परत परत phone येणे हे नेहेमीचे अनुभव होतेच.
Profile मधले photos हा तर वेगळाच विषय आहे. आपण कसे दिसतो याच फोटो बघणार्याला अंदाज यावा, या फोटोच्या मुलभुत उद्दिष्टाशी पुर्णपणे फटकुन काढलेले बरेच फोटो असतात. धुसर, लांबुन काढलेले, खुप वर्षांपुर्वीचे, असले नमुनेदार फोटो बघुन ही मुलगी सध्या कशी दिसत असेल हे डोक्याला बराच ताण देऊन imagine कराव लागत होत. काही जणींनी तर group फोटो लाऊन यावरही कडी केली होती. आता फोटोमधे उभ्या असलेल्या चार जणींपैकी लग्नाला नेमकी कोण उभी आहे हे बघताक्षणी ओळाखण्याइतकी 'तयार' नजर माझी नाही. अश्याच एका profile वर दोन मुलींचे गळ्यात गळे घातलेला फोटो बघितल्यावर वैतागुन अधिक चौकशी केली तर त्यातली जरा बरी दिसणारी मुलगी लग्नाळु मुलीची मैत्रिण निघाली. त्यावर 'मग मैत्रिणिचा contact number मिळु शकेल का?' हा प्रश्न मी जिभेच्या टोकावरुन मगे ढकलला.
या सगळ्यातुन प्रत्यक्ष मुलीपर्यंत पोचण्यासाठी जे अडचणींचे डोंगर पार करावे लागतात त्यातला पत्रिका हा सगळ्यात मोठा डोंगर. त्यातुन मी पडलो कट्टर नास्तिक. पत्रिका, भविष्य, ज्योतिष सोडुनच द्या पण देवही न मानणारा. या आधी कधीही पत्रिकेच्या वाटेला गेलो नव्हतो व नंतरही जाणार नाही हे ठरलेल असल्यामुळे आईबाबांना 'तुम्ही या पत्रिकेच्या भानगडीत पडु नका, ज्यांना बघायची असेल त्यांना बघु द्या' अस सांगितल.पण हे पत्रिकेच थोतांड हल्ली फारच वाढल आहे हे लक्षात आल. यापुर्वी कधिही पत्रिकेच्या वाटेला न जाणारी लोक लग्न म्हटलं की पत्रिका बाहेर काढतात. लोकं चोर-दरोडेखोरांना घाबरत नसतील इतके पत्रिकेला घाबरतात.त्यामुळे पत्रिका बघणार्या कुडमुड्या ज्योतिषांच आणी भटजींच चांगलच फावल आहे. एकीकडे नावामागे डिग्रांची रांग लावयची आणी फलज्योतिष्यासरख्या तर्कबाह्य आणी आधारशुन्य गोष्टीवर आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या निर्णयासाठी डोळे झाकुन विसंबुन रहायच. 'शिक्षणानी अंधश्रध्दा कमी होईल आणी या देशाच्या अनेक समस्यांपैकी एकाची तीव्रता थोडी तरी कमी होईल' या माझ्या भाबड्या समजुतीला सुरुंग लावणारा हा अनुभव होता. काय गंमत आहे बघा. विश्वाच्या अफाट अफाट पसार्यात एक बिंदुहुनही छोटी असलेली आपली पृथ्वी आणी उणपुरं शंभर वर्षाचही आयुष्य नसलेल्या त्यावरच्या टीचभर माणसानं या अवकाशात धीरगंभीरपणे अनादी काळापासुन फिरत असलेल्या ग्रहगोलांचा आपल्या जीवनावर आणी भविष्यावर परिणाम होतो हे मानणं याला टोकाचा अहंकार म्हणावं की मुर्खपणा ? असो.
तर अश्या अनेक अडचणींमधुन मार्ग काढल्यावर प्रत्यक्ष मुलींबरोबर बोलण्यातही छोटीशी अडचण होती. 'पोटासाठी भटकत..' या न्यायानी शिक्षण आणी नोकरीसाठी काही काळासाठी परदेशी वास्तव्य असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा (chatting,email, skype वगैरे) वापर करुन प्रार्थमिक बोलणी करावीत आणी मग प्रत्यक्ष भेटीत निर्णय घ्यावा असं ठरवलं.असं बोलण आणी प्रत्यक्ष भेटुन बोलणं यात घोडा आणी गाढवाइतक अंतर आहे, पण इलाज नव्हता. पहिलाच अनुभव धक्कादायक होता. याआधी मैत्रिणिंशी chatting करायची सवय होती, पण 'असलं' chatting करायची पहिलिच वेळ होती. पहिलीच मुलगी खानदानी वकिल होती.म्हणजे ती, तिचे वडिल, आजोबा सगळेच वकिल.ती या बाबतीत बरीच 'अनुभवी' असावी. कारण 'hi hello' होतं न होतं तोच तिनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. खरं सांगतो, त्यातले अनेक प्रश्न मला गेल्या २६-२७ वर्षात पडले नव्हते. मी विचार करकरुन शब्द जुळवुन उत्तर देत होतो आणी ती माझ्या प्रत्येक उत्तराची उलटतपासणी घेत होती. 'Professional' आणी 'Personal' life ची थोडीशी गल्लत झालेली दिसत होती. लवकरच माझ्या छोट्याश्या मेंदुला हा ताण सहन होईना.शेवटी या रोजच्या प्रश्नोत्तरांना कंटाळुन आणी पुढचं सगळं आयुष्य कोर्टाच्या कटघरात उभं राहिल्यासारखं काढायची इच्छा नसल्याने मी नम्रपणे नकार कळवला. अजुनही काही बोचणारे अनुभव अधुनमधुन आलेच. "अमेरिकेत रहातोस म्हणजे स्वयंपाक येत असेलच...धुणी भांडी करायची सवय असेलच ..(म्हणजे नंतर कामवाल्या बाईची गरज नाही...) हे ऐकुन घ्यावं लागल. आईला ती बॅंकेत असताना जेवढ काम पडलं नसेल तेवढ या स्थळांची उस्तवारी करताना पडल.
पण मी लवकरच सरावलो. प्रश्नांच्या सरबत्तीचा सामना कसा करायचा, उलटी प्रश्नांची फैर कशी झाडायची, कोणते आणी कश्या पध्दतीने प्रश्न विचारल्यावर नेमकी उत्तर मिळतात हे कळलं. पण प्रत्यक्षात भेटल्यावर काय होईल हा suspense होताच.
(सुचनाः हा लेख अर्धवट आहे..याला शेवट नाही असा आरडाओरडा करुन कृपया उगाच दंगा करु नये. ..चाणाक्ष वाचकांनी लेख अर्धवट का सोडला आहे ते ओळखल असेलच !)
(No subject)
पुर्ण झाल्यवर पत्रीकासकट
पुर्ण झाल्यवर पत्रीकासकट कळवा.....
(No subject)
(No subject)
आता ह्या लेखाची दुसरी बाजू
आता ह्या लेखाची दुसरी बाजू :
मुली पहायला जाताना/जाहिरातीमध्ये मुलं नक्को नक्को त्या अपेक्षा व्यक्त करतात. मग अर्थातच मुलींचीसुद्धा गोची होतेच. ''वधू पाहिजे'' या सदरावरून कधीतरी नजर फिरवा. म्हणजे व्हरायटी ऑफ अपेक्षाज दिसून येईल. '' गौरवर्णी, स्मार्ट, उच्चशिक्षित, संस्कारी, सुशील, स्वयंपाकाची आवड असलेली, प्रेमळ, एकत्र कुटुंबात रहायची तयारी असलेली, सुस्वभावी मनमिळाऊ, समजूतदार वधू पाहिजे.'' मराठी भाषेत असतील नसतील तेवढी सगळी छान छान विशेषणं त्या दोन ते चार इंचाच्या जाहिरातीत कोंबलेली आढळतात. मुलेसुद्धा चहापोहे समारंभास भलते प्रश्न विचारून मुलींना पहिल्याच वेळेत गारद करतात. कधीकधी एक से एक नग सापडतात. स्वानुभव नाही पण एका मैत्रीणीला बघायला आलेल्या मुलाने त्यांना दोघांना एकत्र बोलायला पाठवले तेव्हा, भाषणच द्यायला सुरूवात केली '' हे बघ, मला कामाच्या व्यापात अजिबात वेळ मिळत नाही, हे आधीच सांगतोय कारण लग्नानंतर मी कुरकुर खपवून घेणार नाही. तू नोकरी केलीस तरी हरकत नाही माझी, पण घराकडे दुर्लक्ष झालेले मला चालणार नाही.''
ती मैत्रीण मनातल्या मनात बोलत होती. तुझ्याशी लग्नच कोण करणारे
" मुलगा शांत, मनमिळऊ, नम्र,
" मुलगा शांत, मनमिळऊ, नम्र, आज्ञाधारक, निर्व्यसनी, सरळमार्गी, IT वाला, पगारदार, विश्वासु, social, friendly, humorous, well settled, well educated, smart , simple, confident, positive, independent, fun loving, warm hearted ('hearted' असा शब्दही असतो हेही या निमित्तानी कळल !!) ,caring, intelligent, ambitious, well-cultured, considerate, supportive, articulate, down to earth" असावा असं लक्षात आलं ! >>>


लेख लवकर पुर्ण करा.
सॉलिड लिखाण ! वाचत असतांना
सॉलिड लिखाण !
वाचत असतांना क्षणोक्षणी मनात 'मोदक.. मोदक... मोदक' असा जप चालू होता. ते पत्रिका वगैरे तर अगदी अगदी !
एखाद्या लिखाणाने किती किती म्हणून वास्तवदर्शी असावं, म्हणतो मी !!
बापरे!! मस्तच लिहिलेस.....
बापरे!! मस्तच लिहिलेस..... भन्नाट....
मस्त MBA मित्राची परिस्थिती
मस्त
MBA मित्राची परिस्थिती त्यातल्या त्यात बरी कशी काय राहिली?
मस्त लिहलय छान >>काय गंमत
मस्त लिहलय छान
>>काय गंमत आहे बघा. विश्वाच्या अफाट अफाट पसार्यात एक बिंदुहुनही छोटी असलेली आपली पृथ्वी आणी उणपुरं शंभर वर्षाचही आयुष्य नसलेल्या त्यावरच्या टीचभर माणसानं या अवकाशात धीरगंभीरपणे अनादी काळापासुन फिरत असलेल्या ग्रहगोलांचा आपल्या जीवनावर आणी भविष्यावर परिणाम होतो हे मानणं याला टोकाचा अहंकार म्हणावं की मुर्खपणा ?<<
वरिल वाक्ये आवडली.
भारी रे मित्रा........ अर्धवट
भारी रे मित्रा........
अर्धवट लेख पूर्ण करण्याचे भाग्य तुझ्या नशिबी असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...........:;)
जहबहरा विनोदी
जहबहरा विनोदी
लिखाणाची शैली छान आहे. बाकी
बाकी मित्रांच्या कथा आणि स्वताला येणारा अनुभव यात फार फार फरक असेल हो. एवढ काही डांबून नाही ठेवल जात हं लग्नानंतर.
सर्वांना धन्यवाद !.. @भरत
सर्वांना धन्यवाद !..
@भरत मयेकर - असतं काहींचं नशीब बरं ! :)..
@स्वाती :)..बघुयात..
@टोकूरिका - दुसरी बाजु दाखविल्याबद्द्ल धन्यवाद...त्याच काय आहे, आजच्या online युगात आम्हाल एकच बाजु दिसते ना ! 'वधू पाहिजे' ला access नसतो..:)
मस्त लिहिलयसं. देव तुझं लवकर
देव तुझं लवकर वाजवो !
मस्त झालाय लेख. टोकू अग
मस्त झालाय लेख.
टोकू अग दुसर्या बाजुबद्दलसुद्धा काय लिहु आणी किती लिहु अशी परिस्थिती असते.
माझ्या एका मैत्रिणील तर बघायला आलेल्या मुलाला 'काही विचारायचे असल्यास विचारा' अस म्हटल्यावर त्याने गितेच्या अध्यायाबद्दलच माहिती द्यायला सुरवात केली.
आता बोला.
छान छान... खरेतर असेच काहीतरी
फोटो ला १००% अनुमोदन.. मी सुरुवातीला २-३ प्रसंगी एकदम पडायचाच बाकी होतो ईतका वेगळा फोटो
आताशा काही वाटत नाही म्हणजे एखादी दुसरीच मुलगी उभी केली तरी काही वाटणार नाही..
मला आलेले काही अनुभव इथेच देतो ;
प्रसंग १ :- असेच एक स्थळ 'पत्रिका जुळत नाही' म्हणून नाकारले. मुलीचा फोटो पत्रिका परत न्यायला तिची मोठी बहिण आली, रागातच मातोश्रींना म्हणाली, माझ्या आईला पण मुलगा आवडला नव्हताच तुमचा अजिबात...आणि निघून गेली. मातोश्री अवाक
मी मात्र प्रचंड हसलो 
प्रसंग २ :- (उद्या !!) ....
खुप छान लिहिले आहे.
खुप छान लिहिले आहे.
सौरभ, मस्त॑ लिहिलं आहेस.
सौरभ, मस्त॑ लिहिलं आहेस.
लंपन, मुलांची पण बाजु असते हे माहितच नव्हतं. CS बद्दल वाचुन मजा वाटली. गुड लक !
टोकु,
लंपन, >> माझ्या आईला पण मुलगा
लंपन,
>> माझ्या आईला पण मुलगा आवडला नव्हताच तुमचा अजिबात...
त्या मुलीशी लग्न करणारा नवरामुलगा तिच्या आईला पण पसंत पडायला पाहिजे...? मग काय आई आणि मुलगी एकाच मांडवात एकाच बोहोल्यावर...?
बरं झालं, थोडक्यात सुटलात! अभिनंदन!!
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
> वधू पाहिजे' ला access
> वधू पाहिजे' ला access नसतो..
<<एखाद्या लिखाणाने किती किती म्हणून वास्तवदर्शी असावं, म्हणतो मी !! >>
अरे अगदी १००%!
(No subject)
मला आलेले काही अनुभव प्रसंग
मला आलेले काही अनुभव
प्रसंग १ :-
मुलगा: तू Mechanical Engineer ना?
मी :हो
मूलगा: Welding, lathe machine operate करने येते का?
प्रसंग २ :-
मुलाचे वडिल : बेटा तुझे weigth किति?
मी : मोजले नाहि (काय सान्गु मी जरा जाड आहे ?)
प्रसंग ३ :-
मुलाची बहिण : तूला Noodles बनवता येतात?
मी : हो (तूला खाता येतात?)
प्रसंग ४ :-
मुलाचे वडिल : माझ्या मुलाचा पगार १५००० आहे (अभिमानाने ऊर ऊन्च झालेली बाहुली).
मी : ... (हो का? माझा ६०००० आहे).
प्रसंग ५ :-
मुलाचे वडिल : ते काय आहे मुलाला मुलगी पसन्त आहे, मुलाच्या काकाला पण दाखवायला लागेल. त्याना पण पसन्त पडायला पाहिजे.
माझी आई : आम्हि दोन दोन वेळा मुलगी दाखवनार नाहि (मुलाला लग्न करायचे आहे कि काकाला?)
असे अनेक प्रसन्ग आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मग पडल्या कारे अक्षता? छान
मग पडल्या कारे अक्षता? छान आहे हे पण. लोक हा त्रास का सहन करतात हे मला न सुटलेलं कोडं आहे.
@लंपन, @अरिखा - @
@लंपन, @अरिखा -
@ अश्विनीमामी : नाही अजुन..:)...प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
" चाऽयला परत तिचा फोन!" असं
" चाऽयला परत तिचा फोन!"
असं काहीतरी आहे, ते ही वाचा शेठ.
या अनुभवावरून माझ्या
या अनुभवावरून माझ्या आत्त्याच्या मैत्रीणीचा अनुभव आत्त्याने सांगितला होता तो आठवला.
आत्त्याच्या मैत्रिणिचा कांदेपोह्याचा कार्यक्रम चालू असताना, मुलाच्या आईने विचारले 'मुलगी गाणं गाते असंही सांगितल तुम्ही, मग मुलीला गायला सांगा एखादं गाणं!'
असं म्हंटल्यावर तिला थोडा आग्रह झाला आणि मग तिने जे गाणं गायलं ते ऐकून नवर्यामुलाकडची मंडळी ताबडतोब 'येतो आम्ही' असं म्हणून निघून गेली.
तीने गाणं गायलं होतं... .. "तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी.." (हे बहुधा तिने शब्दांमध्ये गोंधळ होऊन असं गायलं होतं असं आत्त्या म्हणते)
अर्थातच लग्न ठरलं नाही ते. पण हा किस्सा मात्र आमच्या घरी चांगलाच गाजलेला आहे. =)) =))
(No subject)
Pages