पण लक्षात कोण घेतो ?
Submitted by मिरिंडा on 21 November, 2012 - 06:31
गणपतीच्या दिवसात बाजारात गेलो तेव्हाचे प्रसंग. घरातून बाहेर पडताना बायकोने, " अहो, जरा केवडा, लाल फुलं, दूर्वा वगैरे घेऊन या अस बजावलं आणि... नुसते भटकून येऊ नका अस प्रेमाचा सल्लाही देण्यास ती विसरली नाही. लोकांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत मी वेगवेगळी फुलं, भाज्या बघत बघत जात होतो. खरंतर मी केवडाही शोधत होतो. केवडा विकणारी एकच बाई दिसली. पण तिच्या भोवती बिलकुल गर्दी नव्हती. पुढे पाहिल्यावर काही भय्येही हातात केवडे घेऊन विकताना दिसले. हल्ली कोणीही काहीही विकतो.
विषय:
शब्दखुणा: