ताक फुंकून पिणार्याचा किस्सा !

Submitted by Diet Consultant on 22 November, 2012 - 15:01

मानवी मन विचित्र असते. प्रत्येक वेळी ताक फुंकून प्यायची वेळ आली ; कि मग तशीच सवय लागते. आपण मुरतो त्यात. असा वाटत जगायचं असेल तर अशाच पद्धतीने जगायला हवे. हे सत्य आहेच. अर्थात हे सत्य असावे कि नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो !
काहींना ताक फुंकायची वेळ येतच नाही. कारण गुंत्याच्या पलीकडे किवा गुंत्यात राहून लढण्याची किवा डीप्लोमातिक राहता येते त्यांना. केवळ वरून असे राहिले तर स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास होतोच. मात्र देवच्या दयेने ज्यांना खरेच मनाचे बंध मृत माणसाच्या इ. सी. जी प्रमाणे ठेवीता येतात; त्याला हे देवदत्त वरदानच.

मग यातल्या ताक फुन्कानार्यांची अवस्था बिकट असते. पण यात हि एखादे चांगल्या मनाचे , कोवळ्या पालवीचे , आपल्या नेहमीच्या भाषेत अतिसभ्य कोणी मिळाले तर भंबेरी उडते ! कारण इतर सर्व प्रकारच्या माणसांशी वागण्याचे सवयीचे होऊन जाते. पहिली गोष्ट विश्वास बसत नाही. आपल्या भाषेत- " झेपतच नाही ! असा कुठे असू शकत का ! " नंतर वाटते , अशा सभ्य माणसाशी आपण हि मार्दवाने वागावयास हवे. उगीच आगाऊपणा नको.
थोडक्यात काय , गोची होते ती ताक फुकंनार्यांची ! आता खरेच , यासाठी खरा पारखी हवा. ( केवळ आडनावाचा पारखी चालणार नाही :-p ) सभ्य सरळ माणसाला जाणीव च नसते याची. फाटाकड्यान्ची
लवंगी फुटत जातात , छोट्या मोठ्या लढाईत सुद्धा ! सार सांभाळून , सार्यांना सभालायचा प्रयत्न करतो तो बिचारा आड्कतो ! या उतार्याला शेवट नाही , हो ! सारेच केवळ अनुत्तरीत प्रश्न !

http://aayushyaa-ketkiitraj.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेही कोणी लिहू शकते? झेपलेच नाही ! नंतर वाटले, लिहिणारा / री कोणी सभ्य माणूस असेल तर आपणही मार्दवाने वागावयास हवे. उगीच आगाऊपणा नको. म्हणूनच मी यापुढे काहीच लिहित नाहीये! Happy

आयुष्यात विवध प्रसंग घडतात. अनेक व्यक्ती आणि वल्ली सामोर्या जातात. मी अनुभवातून लिहिले. आपण अनुभव आल्यावर याच वाक्यांना ताडू शकता. आगाऊपणा आणि सभ्य यांच्या व्याख्या ताशाच्या तशा उचलून उपयोग नाही. प्रत्येक माणसात एक सभ्य , एक लहान मुल, एक गोड व्रात्य असा आगाव पणा , द्वाड प्रवृत्ती दडलेली असतेच. वरपक्षी वाटले तर कठीण आहे. आपल्या स्वतःला त्यात बसवून बघितले तर फार सोपे !

Happy

@लाजो दी ...... शुद्धलेखनाचे संपूर्ण श्रेय आणि दोष समर्पित @ गुगल ट्रान्सलेटर
@पानसे काका : मी पण नारायण पेठी Happy त्यामुळे तुम्हाला मला खेचण्याचा पूर्ण अधिकार आहे Happy
@निंबु ---- काय ग्ग !!! :-p

"किस्सा" असे शीर्षकात वाचून काहीतरी सत्यघटनेवर आधारीत खुलवून फुलवून मीठमसाला लाऊन रंगवून सांगितलेला किस्सा अपेक्षून आलेलो.............. अगदीच काही निराश नाही केलेत.!