हक्का बक्का ( पझल)

Submitted by ब्रह्मांड आठवले on 16 June, 2014 - 23:21

गझलेचा एक शेर वाचनात आला. कवी कोण ते माहीत नाही. शेरप्रकृती सांभाळून उर्वरीत गझल पूर्ण करण्याचा एक तुच्छ प्रयत्न. मूळ कवीची प्रतिभा सर आंखों पर

फसवून चंद्र ज्यांनी कैदेत पार केला
त्यांनीच सूर्य आता चौकात ठार केला

फुंकून आग डोंबा , फुगला ज्वार भाटा
उसवून बर्फ कोणी माठात गार केला

हसवून दाढ राती, भूलेविना निघाली
दिवसा उगाच का हो, जोरात वार केला

खाऊन वाढलेले, उतरे वजन कशाने
बघण्यास स्थळ येता, हा सोमवार केला

ती नायिका विदेशी, सत्तर विवाह केले
आता पुन्हा नव्याने, नवरा "कुमार" केला

- कुमार ब्रह्म

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

मला आवडली गझल Happy

खास करून हा शेर
>>हसवून दाढ राती, भूलेविना निघाली
दिवसा उगाच का हो, जोरात वार के

शरदजी आपला आदर राखून मी सांगेन की ही हजल ह्या प्रकाराची रचना करण्याच्या उद्देशाने केली गेलेली रचना आहे हझल मध्ये आशय विषय हास्योत्पादक असतात त्यावर हसायचे असते तंत्रावर नव्हे तंत्र गांभीर्यानेच पाळले गेले पाहिजे
त्याबाबत गंभीरच असले पाहिजे आणि आग्रहीही

वैवकु

तुमची कळकळ पोहोचली. ही हझल नाही. एका गझलेवर एक ख्यातनाम साहीत्यिक, समीक्षक यांनी शांतपणे वर बोल्ड केलेला शेर उद्धृत करून याचा अर्थ मला कळालेला नाही, कृपया सांगावा असं आवाहन केलं होतं.

फसवून चंद्र ज्यांनी कैदेत पार केला
त्यांनीच सूर्य आता चौकात ठार केला

चंद्र कैदेत पार करणे किंवा सूर्य चौकात ठार करणे म्हणजे काय ? हे खरच समजत नाहीये. गेले काही दिवस अनेक अगम्य शेर असणा-या गझला पाहण्यास मिळताहेत. अशा गझलेचं नाव पझल असं केलं. वर दिलेल्या शेराबरहुकूम बाकिची गझल पूर्ण करण्याचा प्रयत्न फसलेला दिसतोय. कारण नकळत अर्थ कळाला आणि ती गझल असावी असं वाटल्याचं दिसतं. या फझलेत तंत्राला कुणी हसत नाहीये. आनंदकंद वृत्त आहे. स्थ यतीनंतर आल्याने त्यावर जोर पडला म्हणून त्यास गुरू समजलो. चुकीचे असल्यास योग्य शब्द घालता येईल.