
प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676
वीस एक वर्षांपूर्वी आम्ही भारतात राहत होतो. आई-बाबा, भावंड, नातेवाईक सगळे महाराष्ट्रात होते आणि आम्ही दोघे बेंगलोर मध्ये होतो. तेव्हा घेतलेलं एक छोटसं घर अजूनही विकायचं बाकी आहे. आणि आता प्रमोदने ते मनावर घेतलं आहे!
सर्वसाधारणतः सगळ्याच घरांप्रमाणे आमच्या घरी सुद्धा कामाची काहीशी विभागणी आहे. एखादं काम जेव्हा मी किंवा प्रमोद करणार असं ठरतं तेव्हा दुसरा त्यातून अंग काढून घेतो. आम्ही सगळ्या मेजर स्टेप्स विषयी बोलत होतोच, पण मुख्यतः प्रमोदच सगळं बघत होता.
झालं तर मग, प्रमोदची धावपळ चालू झाली. इथून भारतात घर विकायचं म्हणून एजंट शोधला, एजंट ने फोटो वगैरे काढले घराचे, त्यांच्या साइटवर टाकले आणि मग रोज रात्री प्रमोद चे भारतात एजंट बरोबर किंवा बायर बरोबर फोन सुरू झाले. घासाघीस झाली, हो हो नाही नाही झालं आणि शेवटी किंमत ठरली!
इतकं झाल्यावरही प्रमोद मात्र थोडा अस्वस्थ होता.. आणि त्याच्या मनाचा कौल बरोबर होता! बायर न पहिले थोडे पैसे दिले पण त्याला पुढचे पैसे गोळा करायला जमेना, इकडे एजंट ने डील कम्प्लीट झाल्यावर करण्याची कायद्याची काम आणि टॅक्स भरण्यासाठी वगैरे आमच्याकडून घेतलेले पैसे सुद्धा अडकून पडले होते. आता परत प्रमोदच्या डोक्याला त्रास! पुन्हा रात्रीचे कॉल, इमेल्स आणि अस्वस्थपणा! शेवटी आठ पंधरा दिवस मागे पुढे चर्चा होऊन एजंट ने काही पैसे परत केले. प्रमोदनेही त्या बायरचे ॲडव्हान्स पैसे परत केले. अक्कल खाती गेले थोडेफार पैसे असा आम्ही विचार करून आम्ही ते प्रकरण संपवलं!
परवा संध्याकाळी आम्हाला भारतात काही पैसे कोणालातरी ट्रान्सफर करायचे होते. आणि कसं कोण जाणे, पण घाई गडबडीत प्रमोदने चुकीचा payee निवडला - आणि चक्क त्या जुन्या बायरलाच ट्रान्सफर केले परत पैसे! आता तो फार म्हणजे फारच अस्वस्थ झाला, अगदी त्रासूनच गेला. आम्हाला वाटलं आता काही तो पैसे परत द्यायचा नाही चटकन. एवढी वादावादी झाली होती, बहुतेक फार त्रास देणार तो परत आता!! प्रमोदने बँकेत फोन केला. त्यांनी सांगितलं ते प्रयत्न करतील पण ज्याला चुकून पैसे दिले आहेत त्यांनीच ते परत करावे लागतात. साधारण पंचवीस दिवस लागू शकतात. आम्ही म्हटलं, चला आपल्या हातात होतं ते तर करून झालं आहे. आता विचार न केलेलाच बरा. मागचं सगळं आवरून मग आम्ही इव्हिनिंग वॉकला बाहेर पडलो.
परत तासाभरात घरी आलो आणि प्रमोदला मेसेज आला होता - चुकीने ट्रान्सफर झालेले पैसे रिव्हर्ट होऊन परत आलेले होते!
खरंच कोणीही आम्हाला ठरवून मुद्दामून लुबाडलं नाही, फसवलं नाही, इतकच काय तर आमच्याकडून चुकून ट्रान्सफर झालेले पैसे सुद्धा परत केले. झाला तो सगळा त्रास खरच का आम्हाला कोणी दुसऱ्याने दिला होता? का फक्त आम्हाला हवा तेवढा त्रास आम्हीच करून घेतला होता?
ही कथा पण आवडली!
ही कथा पण आवडली!
>>झाला तो सगळा त्रास खरच का आम्हाला कोणी दुसऱ्याने दिला होता? का फक्त आम्हाला हवा तेवढा त्रास आम्हीच करून घेतला होता?>> हम्म! या पद्धतीने विचार करणे आवडले. या निमित्ताने आठवले, माझी आजी म्हणायची - ' त्याने केलं ते त्याला. आपण उगा त्याचा किती त्रास करुन घ्यायचा?'
Thant you स्वाती, तुमची आज्जी
Thant you स्वाती, तुमची आज्जी म्हणायची ते तर अजूनच छान! सहसा कुणी आपल्याला मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून देत नाही, पण असं कधी झालंच, तर असा विचार चांगला आहे - त्याने त्रास दिला - त्याची चूक! अर्थात हे दर वेळी जमत नाही, पण प्रयत्न नक्की करू!
आवडली गोष्ट.
आवडली गोष्ट.