गद्यलेखन

आणि घात झाला (रहस्यकथा)

Submitted by वैभव@देशमुख on 20 May, 2021 - 23:10

एक चांगला माणूस बनणे, यापेक्षा जगात दुसरी कोणती मोठी गोष्ट असू शकते? मी तर म्हणेन चांगला माणूस बनणे हीच जगातील सर्वात कठीण गोष्ट असेल. तशी ती कठीण गोष्ट साध्य केल्याचा मला मोठा अभिमान आहे. आणि अभिमान असायलाही हवा. एकदम वाईट प्रवृत्तीचा माणूस जेव्हा, पूर्णपणे चांगला बनतो तेव्हा, त्याच्या त्या परिवर्तनाचा अभिमान वाटायलाच हवा. आणि मला तसा वाटतोही.

शब्दखुणा: 

"तो आणि ती"

Submitted by निरु on 18 May, 2021 - 08:03

"तो आणि ती"

ती गहूवर्णी गोरी आणि तो उजळ सावळा.
दोघांचं लग्न जमलं ते रितसर बघण्याचा प्रोग्रॅम करुनच..
तशी आधीची कुठली ओळख वगैरे नव्हती. प्रेम विवाह वगैरेही काही नाही. खरं तर तेव्हा तशी पध्दतच नव्हती.

त्या शॉर्टकटने जायचं नाही कधी..

Submitted by रानभुली on 15 May, 2021 - 20:00

" बाई कसलं भयानक आहे ना हे सगळं "
' हो ना, अगं तू कुठे वाचतेस असलं ?"
' मी तर अजिबात सुद्धा हात लावत नाही "
" अगं , आमच्या यांना फार घाणेरडी सवय आहे असल्या भूताखेताच्या सिरीयल्स बघायची. स्वतः बघतात आणि मुलालाही बसवतात. ते पण बघत बसतं "
" हो ना, आमच्या कडे पण सेमच, आणि माझ्या सिरीयल्सचा काय राग येतो कुणास ठाऊक ? त्यात हे असलं काही नसतं "
" पण हिने सांगितलं नाही, ही कशी काय वाचायला लागली हे सगळं ?"
"ही माझी नाही. बहुतेक सानपांची कथा आहे"
" कोण ते रामानंद सानप ? मला तर त्यांचं नाव वाचून सुद्धा भीती वाटते. पण बहुतेक का म्हणालीस ?"

शब्दखुणा: 

दैवगती (भाग २)

Submitted by मिरिंडा on 14 May, 2021 - 05:33

जणू कोणी आत येत असल्याची वर्दीच दिली गेली. आतमध्ये मिट्ट काळोख होता. आतून मात्र एक प्रकारचा कुबट वास आला. तीन वर्षांपासूनची गुदमरलेली हवा तोंडावर आली. मॅनेजर एकदम आत जायला धजत नव्हता. त्याला तीन वर्षांपूर्वीचं पळालेलं गिर्हाइक आठवलं. त्या दिवशी रात्री साडे तीनच्या सुमारास घामाघूम होऊन भीतीने डोळे गरगर फिरवीत , थरथर सुटलेला  कौंटरजवळ धावत आलेला तो मध्यमवयीन माणूस त्याला आठवला. त्याचं सामानही त्याने नेलं नव्हतं. अचानक सदाशिवचा आवाज येऊन तो भानावर आला. एक पाय आत टाकीत त्याने अंदाजानेच लायटाचं बटण दाबलं. मंद पिवळसर प्रकाशात  ते दोघे आत उभे राहिले. खोली चांगलीच प्रशस्त होती.

गाईड ( धक्कथा)

Submitted by ------ on 13 May, 2021 - 16:49

"जीव द्यायला गडच सापडला का ?"

स्वतःच्याच नादात असलेली ती या प्रश्नाने थबकली. आवाजाच्या रोखाने तिने पाहीले. जवळपासच्याच गावातला कुणीतरी खेडूत होता. रापलेला वर्ण, पस्तिशीच्या घरातले वय पण केस मागे गेलेले. धारदार नाक, पाणीदार डोळे मात्र अतिशय गबाळा वेष.

मी काहीही करीन याला काय करायचं असा विचार येऊन ती जमेल तितकं उर्मट उत्तर देणार होती. पण त्याच्या नजरेत असं काही होतं की ते उत्तर आवंढ्यासोबत गिळलं गेलं.

" मरण्याची हौस आहे ?"
" तुम्हाला कुणी सांगितलं मी इथे जीव द्यायला आलेय म्हणून ?"

पहिलं गुलाब - भाग २

Submitted by तुषार विष्णू खांबल on 13 May, 2021 - 11:36

पहिलं गुलाब – 2
शब्दरचना - तुषार खांबल

पहिलं गुलाब - भाग १
https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

शब्दखुणा: 

दैवगती

Submitted by मिरिंडा on 10 May, 2021 - 02:43

१९५५/५६ सालची  गोष्ट.  उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा.... साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते.  आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. एस्टी स्टॅंडवरुन तो खांद्यावरची बॅग सांभाळीत हॉटेलच्या शोधात निघाला  होता.  सकाळशिवाय दिवड्याला जाणारी एस्टी नव्हती. हॉटेल मिळालं नाही तर स्टॅंडवरच झोपायचा त्याचा विचार होता....  वडिलोपार्जित घर आणि जेमतेम एकराची शेती असलेला तो .

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन