गद्यलेखन

दिवा विझवू नकोस (रहस्यकथा)

Submitted by वैभव@देशमुख on 9 May, 2021 - 06:30

जंगलाच्या वेशीबाहेर ते दोघे उभे होते. केशव आणि राघव. दोन्ही हात कमरेवर ठेवून, ते आत खोलवर जंगलाकडे बघत होते. जंगलाच्या खोलीचा, घनतेचा अंदाज घेत होते. आज त्यांनी पैज लावली होती होती. आणि ती आजच पूर्ण करायची होती. शाळा नेमकीच सुटल्याने, ते लगबगीने जंगलाकडे आले होते. कोणी आपल्याला पाहिले नाही ना? याची भिती होती. परंतु तसे काही झाले नव्हते. ते दोघे त्या जंगलाच्या वेशीबाहेर उभे होते. सूर्य मावळतीला आला होता. डोंगराआड जाण्याची त्याची लगबग सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी, तो त्या मोठ्या डोंगराआड अदृश्य झाला असता. पैज  पूर्ण करण्याचा काळ नजीक आला होता.

सांजभयीच्या छाया - १० ( अंतिम भाग )

Submitted by रानभुली on 8 May, 2021 - 16:56
Image Courtsey -  https : // freerangestock  dot com

जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !

मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे
टिचकी मारावी ही विनंती

मला राहवलं नाही.
पोटात राहत नाही असं नाही. पण ही गोष्ट मोठ्यांपासून खूप काळ लपवणे मला धोक्याचे वाटले.
आम्ही जो उद्योग केला तो आगाऊपणा मधे मोडत होता.
त्यात ऋतु हा परका. मी सुद्धा परकीच की.

आम्ही आशीच्या मनातून भीती घालवतो असे सांगितले होते. त्यासाठी परवानगी घेतली होती.
मात्र फाईल्स वगैरे मागवणे, स्टडी करणे हे नव्हतं सांगितलं.

सांजभयीच्या छाया - ९

Submitted by रानभुली on 7 May, 2021 - 20:09

(मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती).
https://www.maayboli.com/node/78827

पुढचे दोन दिवस ऋतूशी भेट झाली नाही.
ना त्याचा फोन आला, ना त्याने फोन घेतला.

ते दोन दिवस अस्वस्थतेत गेले. तिस-या दिवशी मग त्याने एक पोलीस पाठवून दिला.
एक फाईल राहिली होती.
मी ती पाहिली होती.
खरं तर वाचली होती.
ती आशीची फाईल होती.

शब्दखुणा: 

भटकंती २

Submitted by deepak_pawar on 7 May, 2021 - 02:06

मंदिराच्या समोर बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही तिघे मी, दया आणि रवी आकाशाकडे तोंड करून असेच पहुडलो होतो. एकदम निरभ्र आकाश, एक सुध्दा काळा ढग नव्हता. निळीतून काढलेल्या सफेद कपड्यासारखं निळसर पांढरं, कुठे कुठे शेवरीच्या झाडाखाली पडलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, त्यावर अगणित चांदण्याचा अंधुक प्रकाश, या सौंदर्यात भर घालण्यासाठी नुकताच उगवलेला पूर्ण चंद्र. दृष्ट लागावी असं ते दृश्य. क्षणभर वाटलं कुणाची नजर लागू नये म्हणून तरी, एखादा काळाकुट्ट ढग हवा होता,. लहान भावाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून, आई त्याच्या गालावर काजळाचा टिळा लावायची. गोऱ्या गालावर तो टिळा खूपच सुंदर दिसायचा.

कोविड डायरीज! - सारांश, लर्निंग आणि डिलर्निंग!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2021 - 15:12

डिस्क्लेमर - विस्कटलेले रॉ विचार वाचायचे नसतील, तर खालचा धागा वाचू नये.

कलूआजी! - संपूर्ण!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2021 - 14:06

बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो.
दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही.
तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं.
म्हातारी गेली, तर मग तेही बंद...
संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो.
रात्र झालेली, भरपूर पाऊस....
कलूआजीचं दार उघडं दिसलं...
कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला.
कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात.
चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते.

शब्दखुणा: 

सांजभयीच्या छाया - ८

Submitted by रानभुली on 6 May, 2021 - 12:36

मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78819

(कथेचा फॉर्मॆट प्रथमपुरूषी आहे म्हणजे ती लेखिकाच आहे असे नाही. नायिके मधे आणि लेखिकेमधे साम्य असू शकतात पण कथानायिका हे स्वतंत्र पात्रं समजावं.)

आशीच्या बोलण्याने मी हादरले होते.
आता कधी एकदा ऋतूला हे सांगते असं झालेलं होतं.

सांजभयीच्या छाया - ७

Submitted by रानभुली on 5 May, 2021 - 14:35

मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया झाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी.
https://www.maayboli.com/node/78798

मला कुणीतरी सावरलं.
एका हाताने माझा जाणारा तोल सावरत कुणीतरी मला स्वतःकडे ओढलं होतं.
पुरूषी स्पर्श !
पण खूप ओळखीचा वाटत होता.
भीतीने माझी गाळण उडाली होती. अंगाचा थरकाप होत होता. पायात कंप सुटला होता. सरळ शंभर एक फूट खाली जाऊन पडणार होते.
त्या आश्वासक स्पर्शाने जिवात जीव आला.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन