काव्यलेखन

दिव्य मराठी या वर्तमानपत्रात माझ्या अल्बमबद्दल..

Submitted by श्यामली on 23 January, 2012 - 02:31

musamba.jpg

सकाळपासून फोन, समस, आणि ई-मेल्सचा वर्षाव चालू आहे...औरंगाबादकरांना कौतुक वाटणं स्वाभाविकच. मजा वाटत्ये या सगळ्याची

ही त्या पानाची लिंक

हे या बातमीच चित्र मायबोलीवर अपलोड करण्यासारखं व्यवस्थित करुन पाठवल्याबद्दल बित्तुबंगाजींना पेशल धन्यवाद Happy

निवृत्तीनंतर..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आता दिवसाचे चोवीस तास
फक्त माझे...माझेच आहेत
त्यात तुझेही चोवीस तास
जमा झाले आहेत!

दिवसाचे अठ्ठेचाळिस तास
संपता संपत नाहीत;
मुलांच्या रिकाम्या खोलीतून डोकावताना
किती पटकन संपले आयुष्य कळत नाही.

चमचाभर उपमा खायला
पुर्वी फुरसत नसायची
तुझ्यासाठी आणलेल्या वेणीतली
फुले कोमेजून जायची

रात्री झोपताना भविष्यातील
स्वप्नांची फुले तू माळायची
मुलांची गोड पापे घेऊन
कुशीत माझ्या विसावायची

आता...
करकरीत सकाळी
करकरीत तिन्हीसांजेला
तू मला विचारतेस,
"एक कप चहा, बशीभर उपमा करु?"
निवांत दुपारी म्हणतेस,
"चल जुने छायाचित्र संग्रह बघू"

प्रकार: 

ऋण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भांबावतो कल्लोळ.
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...

तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?

परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

प्रकार: 

तुझ्या इच्छेविना देवा माझे बापुडे साहस..

Submitted by श्यामली on 10 January, 2012 - 23:54

काही हातून घडावे ऐसा तुझाच मानस
तुझ्या इच्छेविना देवा माझे बापुडे साहस!

IMG_5829.jpg

२ जानेवारी , मेलबॉक्समधे एक मेल येऊन पडली, सिंगरहरी अशा नावानी आलेली. म्हटल काय स्पॅम असणार जाऊच द्या. मग अचानक आठवल की, अरे महिनाभरापूर्वी आपण हरिहरन सरांच्या मॅनेजरला गाण्यासाठी मेल टाकली होती. त्यांच उत्तर आलं की काय चक्क!!!!!

येस्...तीच मेल होती, अमुक तारखेला, दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या स्वतःच्या(च) स्टुडिओमधे रेकॉर्डिंग असेल. अग्ग्ग्ग्ग्ग बाब्बो! जागी आहे का मी नक्की? नक्की हे वाचतेय का?

मी तुझ्याशी काय बोलू सांग ना

Submitted by बेफ़िकीर on 3 January, 2012 - 08:14

मी तुझ्याशी काय बोलू सांग ना

केवढी वर्षे मधे डोकावली

ठीक की होतो बरोबर पण तरी

एकमेकांचे कुठे होतो म्हणा

शोधला मी मार्ग माझा वेगळा

काढली होतीस त्यावर भांडणे

ऐकले नाही तुझे काहीच मी

केवढी आसावली होतीस तू

भीक मागितलीस मी परतायची

मी तुला नाही म्हणालो त्याक्षणी

मान्यही केलेस माझे वागणे

आणि तू बसलीस त्या वाटेवरी

मी परत येईन या आशेमधे

मग तुलाही छंद जडला शेवटी

एकटी जगणे सुखाचे मानुनी

राहिली होतीस त्या वाटेवरी

मात्र मी म्हातारपण झेलायला

सज्ज नव्हतो एकटा तुझियाविना

मग परतलो त्याच वाटेने पुन्हा

आणि तू दिसलीसही तेथे मला

घन भरुन येती....

Submitted by पल्ली on 20 December, 2011 - 00:12

Ghan bharun yeti....jpg

देवकी पंडीत ह्यांच्या सुरेल आवाजात माझ्या आठ गाण्यांचे रेकॉर्डींग मुंबईला 'स्वरलता' स्टुडीओ मध्ये झाले. गाण्यांना संगित दिले आहे नरेंद्र देशपांडे ह्यांनी. आणि संगित संयोजन आहे शैलेश दाणी ह्यांचे. फाऊंटन म्युझिक कंपनीने मार्केटिंगसाठी कौल दिला आणि आता योग्य वेळ पाहून ते सि.डी. प्रकाशित करतील.

आणखी एक कविता

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

संधीप्रकाश

हा कुसुंबी संधीप्रकाश
उतरत जातो
गर्द गहिर्‍या
काळजातल्या डोहात

गडद होत जातो
सभोवार साकळलेला
संदीग्ध अंधार...

एखादा जांभुळी निळा
आकाशी तुकडा
बुडून जातो...
निश्चल झाल्या जळात!

कधीकाळी प्रेम केलेली
दुर निघून गेलेली
वंचित झालेली
जी कधी नव्हतीच आपली
अशी सगळी माणसे
विद्ध हृदयात दाटी करतात!

इतक्यात जमून येत
चांदण मस्त आकाशात
उमलतो चंद्र गव्हाळसा
गंधाळतो साकव वेलीचा
स्पर्शून जातो क्षण सुखाचा!

प्रकार: 

एक कविता

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

वेगवेगळ्या डब्यांची विल्हेवाट लावताना
मला तुझी साध्या जीवनाची व्याख्या उमजते!

इथे सिंगापुरमधे कधी
चॉक्लेट्स-आईसक्रीमचे डबे
तर कधी दह्या-जॅम्सचे डबे,
वेगवेगळ्या प्रकारच्या आणि
विविध रंगाढंगाच्या
सुबक मेणकापडी पिशव्या
घरभर थैमान घालतात!
त्यांना आवरता-आवरता
वेळेचा अपव्यय होतो!

कधीकाळी अशाच गोष्टींचा
तू संग्रह करायचीसं!
मंजनाच्या बाटल्या
दुधाच्या पिशव्या
कागदी पुळक्यातला
कागद आणि दोरा
हाताला लागेल ते ते
नीट जपून ठेवायचीसं!

मग घरात आलेले

प्रकार: 

विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार----- '' गौरव मायबोलीकरांचा ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 27 November, 2011 - 02:09

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन