एक कविता

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

वेगवेगळ्या डब्यांची विल्हेवाट लावताना
मला तुझी साध्या जीवनाची व्याख्या उमजते!

इथे सिंगापुरमधे कधी
चॉक्लेट्स-आईसक्रीमचे डबे
तर कधी दह्या-जॅम्सचे डबे,
वेगवेगळ्या प्रकारच्या आणि
विविध रंगाढंगाच्या
सुबक मेणकापडी पिशव्या
घरभर थैमान घालतात!
त्यांना आवरता-आवरता
वेळेचा अपव्यय होतो!

कधीकाळी अशाच गोष्टींचा
तू संग्रह करायचीसं!
मंजनाच्या बाटल्या
दुधाच्या पिशव्या
कागदी पुळक्यातला
कागद आणि दोरा
हाताला लागेल ते ते
नीट जपून ठेवायचीसं!

मग घरात आलेले
पाहूणे असो वा मित्रमैत्रिणी
त्यांना स्वतः केलेले
लोणचे, चटण्या, फराळ
घरात असेल ते जिन्नस
ह्याच डब्यातून-पिशव्यातून
शिदोरी म्हणून बांधून द्यायची!

कालांतराने तुझा मनमिळावूपणा
माणसातली माणूसकी
ह्याच गोष्टीतून लोकांपर्यंत पोहचली!

आज मागे वळून पहाताना
तू शिकवलेली
ही साध्या जीवनाची व्याख्या
मला खर्‍या अर्थपुर्ण जीवनाचे धडे देते!

बी

प्रकार: 

कालांतराने तुझा मनमिळावूपणा
माणसातली माणूसकी
ह्याच गोष्टीतून लोकांपर्यंत पोहचली!

आज मागे वळून पहाताना
तू शिकवलेली
ही साध्या जीवनाची व्याख्या
मला खर्‍या अर्थपुर्ण जीवनाचे धडे देते!>>>>>>>

व्व्वा!

(चुकून एक कविता तीन कविता झाल्या, ते आपले सहज सांगितले, अप्रतिम संवेदना बी)

-'बेफिकीर'!

इयत्ता १०वी .
१) प्रश्न : जीवनाची व्याख्या करा. १० मार्क

उत्तरः
जीवन म्हणजे
मंजनाच्या बाटल्या साठवणे.
दुधाच्या पिशव्या साठवणे.
कागदी पुळक्यातला
कागद आणि दोरा साठवणे.
हाताला लागेल तो तो कचरा साठवणे.
प्लअ‍ॅस्टिकच्या पिशव्यांचा रीयुज करणे ...