विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार----- '' गौरव मायबोलीकरांचा ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 27 November, 2011 - 02:09

मायबोलीवरील एक उत्तम कवी व गझलकार,''क्रांती साडेकर'' यांच्या ''असेही-तसेही'' या गझलसंग्रहास विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार नुकताच जाहिर झाला आहे.
र.५०००/- रोख आणि स्मृतीचिन्ह अश्या स्वरुपातील हा पुरस्कार क्रांती यांना १४ जानेवारी २०१२ रोजी वर्धा इथे प्रदान करण्यांत येणार आहे.

क्रांती यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होवो व असे अनेक पुरस्कार त्यांना लाभोत ही सदिच्छा. Happy

---डॉ.कैलास गायकवाड .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रांतिचे मन:पूर्वक अभिनंदन...आणि ही माहिती इथे दिल्याबद्दल कैलासरावांचे हार्दिक आभार!

मनापासून अभिनंदन क्रांतीजी Happy

कैलासराव,

अशा बातम्या आवर्जून लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आपले अनेक आभार!!

शतश: धन्यवाद ! मला या उपलब्धीपर्यंत पोहोचविण्यात मायबोलीचा मोठा वाटा आहे. माबोकरांचे प्रोत्साहनपर प्रतिसाद, जाणकारांचं मार्गदर्शन, आणि हो, तरही गझल हा धागा या सगळ्यांना या पुरस्काराचं श्रेय आहे! Happy

डॉ. कैलास गायकवाड, ही आनंदाची बातमी माबोकरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खास आभार! Happy

क्रांती तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे.
तुझी मैत्रीण असल्याचा अभिमान वाटतो.
खूप खूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी!!

Pages