आणखी एक कविता

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

संधीप्रकाश

हा कुसुंबी संधीप्रकाश
उतरत जातो
गर्द गहिर्‍या
काळजातल्या डोहात

गडद होत जातो
सभोवार साकळलेला
संदीग्ध अंधार...

एखादा जांभुळी निळा
आकाशी तुकडा
बुडून जातो...
निश्चल झाल्या जळात!

कधीकाळी प्रेम केलेली
दुर निघून गेलेली
वंचित झालेली
जी कधी नव्हतीच आपली
अशी सगळी माणसे
विद्ध हृदयात दाटी करतात!

इतक्यात जमून येत
चांदण मस्त आकाशात
उमलतो चंद्र गव्हाळसा
गंधाळतो साकव वेलीचा
स्पर्शून जातो क्षण सुखाचा!

प्रकार: 

साकव = पूल (माझ्यामते)

कविता मस्त!

(कविता म्हणून प्रकाशित झाली आहे म्हणून कविता मस्त, अन्यथा जे काय आहे ते मस्त)

-'बेफिकीर'!