रिक्षा स्टँड

Submitted by Kiran.. on 12 January, 2012 - 04:26

नमस्कार

काही दिवसांपूर्वी कुणीतरी कुणाच्यातरी विपुत रिक्षा फिरवल्याने झोपमोड झाल्यासारखा तिरसट प्रतिसाद त्याने धाग्यावर दिला. काही जण विपुत रिक्षा फिरवल्यास प्रतिसाद पण विपुतच देतात ;). आपलं लिखाण लोकांपर्यंत पोहोचायला हवं पण काही धाग्यांवर दिसणारे कमिटेड प्रतिसादक आपल्याला लाभत नाहीत अशीही काहींची व्यथा असते.... तर काही जण गप्पांच्या धाग्यावर गप्पा मारायला आले तरी मनामधे मात्र आत्ता देऊ लिंक कि थांबू असे भाव असतात ! तेव्हा हा ताकाला जाऊन भांडं लपवायचा प्रकार टाळण्यासाठी रिक्षा फिरवायची सोय व्हावी आणि प्रवाशांचीही सोय व्हावी या हेतूने हा रिक्षास्टँड ! रिक्षास्टँड असाधारण प्रतिभावंतांसाठी देखील आहे तेव्हां कुणी स्टँडावर रोष धरू नये प्रतिभावंतांची रिक्षा आल्यास स्टँडचा लौकिक वाढेल. तसंच हा स्टँड म्हणजे आपल्यासाठी दीपमाळ आहे अशी समजूतही कुणी (अकारण) करून घेऊ नये ही नम्र विनंती ! मात्र रिक्षा स्टँडवर रिक्षा लावणं हा कमीपणा वाटत असल्यास त्याला समस्त रिक्षा संघटना आणि प्रवासी संघटनांचा नाईलाज आहे.

आपण मात्र आपली रिक्षा बिनधास्त लावा. वाहतं पान असल्याने रिक्षेचा नंबर गेला कि पुन्हा मागे येऊन रांगेत उभे राहू शकता.

रांगेचा फायदा सर्वांना Happy

नियम : अनुभवातून ठरतील तसे !
इथे असे रिक्षावालाज भेटतील
Rickshaw1.jpg

इथे असे पॅसेंजर्स मिळतील
.Jui_Gadkari_Photos.jpgmember1.gif

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users