ऋण

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

भांबावतो कल्लोळ.
माझ्या उरात दडू पाहतो.
पाहता पाहता नभही
अलगद झाकोळून येतं.
आपसूक दूरस्थ होणारे
किनारे पाहताना,
भरतीचा ठाव सुटतो...

तुझा माझा मांडलेला
पसारा पाहते.
त्यातून स्वत:ला निर्लेपपणे
बाजूला काढायचं ठरवते.
हळूच एक प्रश्न
डोकं वर काढतो,
विचारतो,
कधी चुकतं करशील
तुमच्या नात्याचं देणं?

परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं,
ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

प्रकार: 

व्व्वा!!!
"आपसूक दूरस्थ होणारे किनारे" - क्या बात!

( तू असंही लिहितेस? Happy
बहुतेक पहिल्यांदाच वाचलंय..)

मस्तच !

Pages