मायबोली गणेशोत्सव २०२१
हवामानातील बदल (क्लायमेट चेंज) आणि स्त्री आरोग्य
स्त्रियांचे आरोग्य हवामानाशी निगडीत आहे ही बाब हल्ली प्रकर्षाने जाणवत आहे कारण पर्यावरणाचा समतोल ढासळला तशा स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. हवामान बदलांचा परिणाम पुरुषांच्या आणि बालकांच्या आरोग्यावरही होतोच; पण त्याबद्दल चर्चा नंतर कधी करू.
पाककृती स्पर्धा २- लसूणी केल(Garlic Kale)- Sonalisl
शशक पूर्ण करा - भयाण - निरु
शशक पूर्ण करा - भयाण - निरु
"काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....."
दरवाजातून त्याच्याकडे येणाऱ्या, दात विचकणाऱ्या भेसूर मानवी कवट्या..
आपोआपच पेटलेल्या मेणबत्त्यांच्या उजेडात दिसणारी खोलीभर जळमटं..
पाच फुटावर बसलेलं, रोखून पहाणारं लालभडक डोळ्यांचं काळंकुळकुळीत रानमांजर..
खर्रर्र.. खट्ट.. कोपऱ्यातल्या कपाटाचा दरवाजा उघडतोय. स्वतःहून..
त्यातून खुळखुळत बाहेर आलेला सांगाडा त्याच्याकडेच येतोय.. खुरडत..
शशक पूर्ण करा - अधुरी एक कहाणी - स्मिताके
अधुरी एक कहाणी..
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....कित्येक रात्री या दुःस्वप्नाने दचकून उठत होते. आज ते सत्यात उतरलं.
खरोखरच दार सताड उघडं आहे. मध्यरात्रीच निघून गेलात, राजपुत्र?
थोरले राजे "परवानगी नाही" म्हणाले, तरीसुद्धा.
आणि मी? मी "संमती नाही" म्हटल्याने दुःख टळलं असतं?
मला आणि बाळाला झोप लागल्यावर जावं म्हणजे क्लेश कमी होतील, असं वाटलं तुम्हांला?
प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २ - समई/दिवा
मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.
समई/दिवा.
माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - सामो
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला|
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत||
.
आशा ही मनुष्याची खरोखर आश्चर्यकारक अशी बेडी आहे. जे लोक या बेडीमध्ये बद्ध असतात, ते (ध्येय गाठण्यासाठी) धावत असतात आणि जे आशेपासून मुक्त असतात, ते एखाद्या पांगळ्याप्रमाणे (कृतीशून्य) थांबून रहातात.
बकेट लिस्ट वगैरे शब्द माहीतही नसल्याच्या काळात, म्हणजे मी १९-२० वय असण्याच्या, बी एस सी ला असण्याच्या तारुण्याच्या, ध्येयाने झपाटले जाण्याच्या काळात अगदी लसलसून, म्हणजे अत्यंत तीव्रतेने, एक स्वप्न मनात उमलत होतं. त्याबद्दल पुढे येइलच लवकर.
शशक पूर्ण करा - फुफाटा - हाडळीचा आशिक
फुफाटा
काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला आणि बाळाप्पाची तंद्री भंगली.
कोणीतरी तिला केसांना धरून फरफटत आणत होतं. लक्ष्मी ? तो शहारला. आरडतओरडत त्या आडदांडाला ती प्रतिकार करीत होती. ते बाळाप्पासमोर पोहोचले. अशक्त झालेला तो उठू लागला.. भेलकांडला..
आडदांडानं तिला सामोरं केलं. पदर सुटलेल्या तिनं नवऱ्यासमोर लाजेनं मान खाली घातली.
"भेन्चो* ! पैशे आण न् ह्या रां*ला ने. पिंट्या जा, सोड याला.
पिंट्या पुढे झाला.
शशक पुर्ण करा-तंद्री-वीरु
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
"ओ साहेब उठा! घरदार आहे की नाही? इथे वॉशरुममध्ये कोपऱ्यात पुतळ्यावाणी काहुन बसले? सणासुदीला तर घरी जा. तीन दिवस हापीस बंद आहे, जीवाला घोर आमच्या. पार्कींगमध्ये एक गाडी उभीच म्हणुन या हणम्याला सुट्टीवरुन बोलावुन घेतले. तो आत्ता रात्री उगवला." गदागदा हलवत सिक्युरिटीवाला माझ्या तोंडावर पाणी मारत होता."
शशक पूर्ण करा - टाईम ट्रॅव्हलर - व्यत्यय
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
ह्म्म्म... दरवाजा..... म्हणजे बर्याच पुढे आलोय मी पण पृथ्वीवरच असणार.
शिट... टाईम-मशिन मधल्या या बिघाडामुळे आधीच्या प्रवासा आगोदर जो स्फोट झाला त्यात बरेच डायनासोर मेले असतील.
मरुदे च्यायला....
आताची उडी मात्र शेवटचीच असायला हवी.
रिअॅक्टरची उरलीसुरली ताकत लावायला हवी परत जायला. मग या मुर्ख ग्रहाचं जे होईल ते होवो.