कोव्हिडचा उच्छाद सुरु झाला आणि रोज रात्री झोपताना, श्वास लागत असल्याचे भास होउ लागले. आपल्याला उद्याचा दिवस दिसेल का की असा श्वास लागुन आपला आजच रात्री मृत्यु ओढावेल असे विचार अक्षरक्ष: जवळजवळ रोज येऊ लागले. हे श्वास लागणं वगैरे सर्व सायकोसोमॅटिक होते. थोड्याच वेळात पेंग आली की श्वास बरोबर नियंत्रित होत असे व सकाळी उठल्यानंतर हायसे वाटत असे. वर्ल्डोमीटरवरती प्रेत्येक देशामधील मृत्युमुखी लोकांची संख्या कळत होती, दिवसेंदिवस धास्ती वाढत होती.
लेखन स्पर्धा : माझे कौटुंबिक कोविड लसीकरण - {ऋन्मेऽऽष}
मला माझ्या लसीकरणापेक्षा जास्त चिंता माझ्या आईवडीलांच्या लसीकरणाची होती. आता तुम्ही म्हणाल तुच काय एक मोठा श्रावण बाळ लागून गेला आहेस, आम्हाला नाही का आमच्या आईबापाची चिंता? पण मला चिंता होती ते त्यांचे लसीकरण करण्यासाठी आधी त्यांचे वशीकरण करणे गरजेचे होते याची..
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. दरवाजा उघडतो.
पहाटे पहाटे पावसातही, उघडली एकदाची!
काय घेउ आणि काय नको?
लॅटे? मोका? फ्रॅपे?
शॉर्ट? टॉल? ग्रांडे? व्हेन्ति?
थंड? गरम?
व्हॅनिला? पंपकिन स्पाईस? सॉल्टेड कॅरॅमल? हनी?
बदामाचे? नारळाचे? ओटसचे, नेहमीचे दूध?
नेहमीचे दूध फुल फॅट, २%? फॅट फ्री?
बर्फ क्रश्ड ? ऑन रॉक्स?
क्रीमर येस? नो?
शुगर येस? नो?
व्हिप्ड क्रीम येस? नो?
एस्प्रेसो शॉट येस? नो?
.
.
.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो. कुणीतरी आत आल्याची चाहुल. कुठुनतरी दुरून दोन बायकांचा बोलण्याचा आवाज येतोय. त्यांचा साधारण सूर आनंदी, उत्साही वाटतोय. पण तो संवाद माझ्या मेंदुपर्यंत पोहोचतच नाहीये. डोळे उघडायचेदेखिल त्राण नाहीयेत. एवढं गलितगात्र कधीच वाटलं नव्हतं. सात दिवस सात रात्री ह्याच पलंगावर झोपुन काढल्या तरीही हा थकवा जाईल असं वाटत नाही. कोणीतरी एक उबदार गाठोडं माझ्या छातीशी आणुन ठेवलंय. माझ्या गालावर एक मऊ मुलायम स्पर्ष.
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
"काय रे दिवेलागणीची वेळ झाली. किती झोपणार सणासुदीच्या दिवसात?" आईचा आवाज आला
"कसले सणासुदीचे दिवस? बाप्पा तर गेले ना काल?" हे बोलताना आणि समोरच्या रिकाम्या मखराकडे बघतानाही त्याला रडू फुटले.
काहीच सुचत नाहीये . सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
नुसताच लोटलेला असतो तो .
समोर नक्की कोण आहे कळत नाही .
साला ! या आडबाजूला ट्रीपसाठी मला यायचंच नव्हतं . एकाट , निर्जन जागा . खूप रात्र झालेली , दिवे गेलेले . मेणबत्ती नाही अन मोबाईलच्या बॅटऱ्याही उतरलेल्या .
तो एकदम ओरडतो , दाबल्या तोंडाने , ' कोण आहे रे ? '
मी म्हणतो , ' मन्या - मी पश्या '.
तो पुन्हा ओरडतो , ' साल्या ! उठ लवकर तू . मलाही घाईची लागलीये !
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....आणि तो आत येतो.
हं.. काठी! याच्यावर गोळी वाया घालवायला नको. याला मी असंच मारू शकते. धाड धाड…सपाऽऽसप!
अर्रर्र….अजून दोन आले.
थोडं मागे पळते. एका वेळी एकाला मारले पाहिजे. धाड धाड… सपाऽऽसप!
बापरे दुसरा जास्तच जवळ आलाय.
नो..नो..नो. माझी बंदूक..
ठो..ठो.
थॅंक्गॅाड! मेला.
पळा.
पाणी कुठे?
ते काय चमकतेयं? … घेते.
ठोऽऽऽ
शी! मेले मी!!
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
ठपाक ठपाक ठपाक ...
'काय चाललंय काय? मला सांगितलं होत आरामात राहता येत, किडा-मुंगीच भय नाही.'
क्लिक
"हे हे काय अगदी भाजतंय अंग"
"अरे आपण इथे तळघरात आहोत बाहेर थंडी आहे. काही महिन्यांनी बाहेर" मोठ्या पानानी सांगितलं.
"मागच्या जन्मी शेतात काय मस्त आयुष्य होत" मोठा म्हणाला.
"काळजी करू नको मी कालच आलोय, मागच्या जन्मी इथंच होतो" नव्याने सांगितलं
"हुश्श उजेड जरा कमी झाला."
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय.
तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
डोळे दिपले रे...नुसता केशरी रंग भरुन राहिलाय आसमंतात.
हळुहळु डोळे सरावतात तो काय प्रकट होते आहे हे पुढ्यात.
कोण उभे आहे हे माझ्या समोर...तेजस्वी कांती आहे, कमरेला पितांबर आहे,अजानुबाहु, एका खांद्यावर धनुष्य आहे, दुसरीकडे बाणांचा भाता,प्रेमळ डोळे..माझा रामराणा.
त्याच्या तेजाने सगळं लख्ख दिसतय आता.
इतके दिवस या घळीतल्या गुहेत स्वत:ला शोधत होतो,काय करायचं ते समजत नव्हतं,आता सगळं स्पष्ट कळलंय.