पाककृती स्पर्धा २- लसूणी केल(Garlic Kale)- Sonalisl

Submitted by sonalisl on 12 September, 2021 - 17:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ मोठी पाने केल(Kale)
१ मिरची (अजून तिखट हवे असल्यास प्रमाण वाढवा)
५ पाकळ्या लसूण
२-३ चमचे तेल
चवीनुसार मीठ
लोणी लाऊन भाजलेला ब्रेड- १ स्लाईस(मी होल व्हीट घेतला आहे)
बदामाचे काप

क्रमवार पाककृती: 

CFCAB326-A611-4E80-B252-B05E2E38A774.jpeg

केलची पाने स्वच्छ धुऊन मधला जाड भाग काढून टाका आणि ओबडधोबड चिरून घ्या.
लसूण आणि मिर्ची बारीक चिरून घ्या. ब्रेड स्लाईसचे छोटे तुकडे करा.
पॅनमधे तेल तापवून त्यात बारीक चिरलेले लसूण-मिर्ची घाला. नंतर थोड्याच वेळात केलची पाने घालून परता. आच मघ्यम असू द्या.
जरावेळाने पाने खाली बसू लागतील तेव्हा मीठ घाला. परतत रहा. या पानांना पाणी सुटत नाही पण जसजसे परतू तसा या भाजीचा रंग गडद होत जाईल. मग त्यात ब्रेडचे तुकडे घाला.

55CC6F0F-EF55-4035-A615-ACA143385AF3.jpeg

४-५ मिनिटे परतल्यावर भाजी वाटीत काढा आणि वर बदामाचे काप घालून सजवा.

3D0E8DDF-155A-4252-BC5C-1DEAD8BF8CBF.jpeg

करकरीत भाजी, कुरकुरीत बदाम काप आणि मऊ ब्रेड यामुळे मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
एका व्यक्तीसाठी
अधिक टिपा: 

बदाम कापच्या ऐवजी काजू/अक्रोड/भोपळ्याच्या बिया वगैरे असे आवडीप्रमाणे काहीही घालता येईल.
नेहमीच्या ब्रेड ऐवजी पूर्ण गव्हाचा/8grains/15grains ब्रेड वापरता येईल.

माहितीचा स्रोत: 
स्वत:चे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

मस्त

वाह छानच लागेल की. पण एकही इन्ग्रेडियंट (साहित्य) गाळता कामा नये. मुळातच मोजकच साहीत्य आहे त्यात काटछाट करता कामा नये. कारण प्रत्येक चव महत्वाची आहे.
बदामाच्या कापांची आयडीया मस्त वाटली.

वेगळी नाविन्यपूर्ण कृती
हि पाकृ स्पर्धेत दिसत नाहीये कारण ग्रुप "मायबोली गणेशोत्सव २०२१ " नाही सिलेक्ट केलाय. मतदान देता येत नाहीये या पाकृ ला

मतदान सुरू झाले?
७. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी>>> या नियमानुसार शब्दखूण दिली होती. पण ग्रुप सिलेक्ट करायचा राहिला. आता बदल केला आहे. कळवल्याबद्दल धन्यवाद धनुडी.