शतशब्द कथा; शशक

शशक पूर्ण करा ... पार्ट २ - नानबा

Submitted by नानबा on 19 September, 2021 - 07:27

गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि मिररमध्ये बॅकसीटवर कलंडलेल्या तरूणाचा पांढराफटक चेहरा दिसला.

प्रेमाकरता कायकाय करावं लागतं! मागच्याच गाडीतून वॅकी येत असेल. खरतर हे सगळं करायला त्याचा ठाम विरोध! पण मी अजिबात लक्ष देणार नाहिये!

कट!

आयुष्यात अशी संधी वारंवार येत नाही जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता दिसते! मग अशा वेळेस मागेपुढे बघण्याइतकी मी पुळचट नाहिये! मागच्या वेळचा भरभक्कम अनुभव गाठीशी आहे आणि प्रायवेट गाडीही!

विषय: 

शशक पूर्ण करा - वासांसि जीर्णानि - मॅगी

Submitted by मॅगी on 16 September, 2021 - 14:53

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

---

शब्दखुणा: 

शशक पूर्ण करा - अभिनंदन- नानबा

Submitted by नानबा on 16 September, 2021 - 00:51

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

वेदना! असह्य वेदना! ह्या अंधारातही आधी किती सुरक्षित वाटत होतं... कोण हे मला बाहेर ढकलतय?
काय माहित बाहेर ऐकू येणारे हे आवाज कुणाचे! गार झोत येतोय! मला नकोय हे जग! मला नाही जायचय बाहेर!
१ २ ३ PUSH
ही घुसमट आता सहन होत नाहीये.. असह्य होऊन मी टाहो फोडला, आकांत मांडला तर ह्यांचे चेहरे किती आनंदी! एकच ओळखीचा वाटणारा स्पर्श.... तिच्याही डोळ्यातून पाणी येतय, पण थकलेला चेहरा किती आनंदी!

शशक पूर्ण करा - अंधार - आस्वाद

Submitted by आस्वाद on 14 September, 2021 - 22:11

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
त्याला आठवतच नव्हतं तो इथे कसा आला. अंधाऱ्या, थंड जागी आल्याचं त्याला जाणवलं आवाजाने झोप उडाली तेव्हा. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला बाटली दिसली. त्याने रिकामीच बाटली तोंडाला लावून पहिली. आपल्याला भूक लागलीय की तहान, त्याला कळेना. बाहेरच्या आवाजाने त्याचा थरकाप उडाला. तोंडातून आवाज निघेना.
दरवाजा उघडल्यावर हळूहळू आवाज आणि उजेड येऊ लागला. क्षणांत दोन हात त्याच्याकडे आले.

शशक पूर्ण करा - भयाण - निरु

Submitted by निरु on 12 September, 2021 - 14:30

शशक पूर्ण करा - भयाण - निरु

"काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....."

दरवाजातून त्याच्याकडे येणाऱ्या, दात विचकणाऱ्या भेसूर मानवी कवट्या..

आपोआपच पेटलेल्या मेणबत्त्यांच्या उजेडात दिसणारी खोलीभर जळमटं..

पाच फुटावर बसलेलं, रोखून पहाणारं लालभडक डोळ्यांचं काळंकुळकुळीत रानमांजर..

खर्रर्र.. खट्ट.. कोपऱ्यातल्या कपाटाचा दरवाजा उघडतोय. स्वतःहून..

त्यातून खुळखुळत बाहेर आलेला सांगाडा त्याच्याकडेच येतोय.. खुरडत..

शशक पूर्ण करा - शिकारी - निरु

Submitted by निरु on 11 September, 2021 - 13:50

शशक पूर्ण करा - शिकारी - निरु

"काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....."

असं जाळं पसरुन ते पांच चतुर, धूर्त शिकारी बाजूच्या खोलीत मजेत बसून राहिले.

त्यांनी पसरलेल्या जाळ्यात सावजं एकामागोमाग एक सापडणार याची त्यांना खात्रीच होती.

ते ही खरं तर एका जाळ्यावरच होते.

त्यांचं कामच होतं दर हंगामात नवी नवी जाळी विणून कधी नवी जुनी सावजं फासायची.

आणि कळून सवरूनही सावजं अडकायचीच.

कधी नकळत, कधी स्वेच्छेने..

शशक - खास दिवस

Submitted by निरंजन कुलकर्णी on 21 September, 2019 - 06:58

मोहन झोपला. उद्याचा दिवस खास होता.

दारावर टकटक झाली. मोहनला जाग आली. घड्याळात पाहिले. बाराला दहा कमी.

यावेळी कोण दार वाजवतय? मनात विचार आला.

दार उघडलं. बाहेर कुणीच नाही. मोहन बाहेर गेला दार वाजवणाऱ्याला शिव्या देत.

कोणीतरी हात पकडला व खेचला. ओढत नेलं व गाडीत टाकलं.

गाडीत चार जण. चेहेऱ्यावर मुखवटे. मोहन घाबरला. गाडी सुसाट निघाली. मैदानासमोर थांबली.

हे तर कॉलेजचं मैदान. मोहनला मैदानावर नेलं. भीतीमुळे तोंडातून शब्द निघेनात.

एकाने हात पकडले तर एकाने पाय. वर उचलला. दोघांनी पार्श्वभागावर लाथा हाणल्या.

शब्दखुणा: 

शशक - फितुरी

Submitted by सामो on 14 September, 2019 - 15:28

मी तुझ्यापाशी प्रत्येक भेद मोकळा केला. मनमोकळेपणे तुला आमच्यातले वाद, संघर्ष, भांडणं, विकोपाचे प्रसंग सांगीतले, त्याच्या आवडी-निवडी , आमचे खाजगी क्षण तुझ्यावर विश्वास ठेउन तुला सांगीतले. आणि तू ......!!! त्याचा असा गैरफायदा घ्यावास? त्याच्याशी सुत बांधुन मला फितूर व्हावस? त्याच्या कानात गरळ ओकून माझ्यापासून त्याला तोडुन, परस्पर लाटावस? काहीच नीतीमत्ता नाही का ग तुला चांडाळणी?
.

विषय: 
शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी - स्वर्गीय आवाज - हर्पेन

Submitted by हर्पेन on 10 September, 2019 - 03:23

हॅलो, कशी आहेस?

मी मजेत. तू सांग, अचानक कशी आठवण काढलीस? कसा आहेस?

मी पण मजेत.. म्हणजे ठीकच आहे. सॉरी मला जमलं नाही तुला भेटायला यायला. आजोबांबद्दल ऐकून वाईट वाटलं.

इट्स ओके, तसं वय झालंच होतं त्यांचे. काही आजार न होता गेले हे बरंच झालं म्हणायचं.

हम्म फार जवळ होतात ना तुम्ही, नक्की सावरल्येस ना आता?

हो. जवळपास महिना झाला आता.

नाही म्हणजे status वाचलं तुझं, "I hear dead people they’re still the best", कसले भासबीस होताहेत का तुला?

.…...

हॅलो सांग ना ?

........

अगं उत्तर का देईनास?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शतशब्द कथा; शशक